टाटा पॉवरला नफ्यात ९०% ची वाढ I
टाटा पॉवरला नफ्यात ९०% ची वाढ
टाटा पॉवरने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल- जून तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ९०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८८३.५४/- कोटी आहे.
उत्पन्नात वाढ झाल्याने कंपनीला हा नफा झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ४६५.६९/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
या तिमाहीत कंपनीला रु. १४,६३८.७८/- कोटींचे एकूण उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १०,३१०.२१/- कोटी होती.
या तिमाहीत एकूण खर्च रु. १४,६६०.१४/- कोटी असून कंपनी २०२२-२३ करिता रु.१४,०००/- ची भांडवली गुंतवणूक करणार आहे व रु.१०,०००/- करोडची गुंतवणूक रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात करणार आहे.
कंपनीने तामिळनाडू शासनासोबत ४ – गिगावॅट सोलर सेल व मोड्युल प्लांट चे सेट अप करणार आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स



