ठाण्यात ‘एम. के. घारे ज्वेलर्स’चे कोरम मॉल मध्ये ८ वे दालन सुरू
ठाणे : गेल्या ९३ वर्षांपासून ग्राहकांच्या विश्वासाचा वारसा जपणाऱ्या ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ यांनी ठाण्यातील प्रतिष्ठित Korum Mall येथे आपल्या नव्या भव्य दालनाचा शुभारंभ शनिवार, दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी केला.
परंपरा, विश्वास आणि आधुनिकतेचा सुंदर संगम साधणाऱ्या या नव्या दालनात नव्या पिढीच्या आवडी-निवडींना साजेसे ट्रेंडी आणि आधुनिक दागिन्यांचे खास कलेक्शन, प्रशस्त जागा आणि सोयीस्कर खरेदीचा अनुभव उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दैनंदिन वापरातील आकर्षक लाईट वेट दागिन्यांपासून ते लग्नसमारंभासाठीच्या खास कलेक्शन्सपर्यंत, तसेच लहान मुलांपासून संपूर्ण कुटुंबासाठी सोनं, चांदी आणि डायमंड ज्वेलरीच्या विविध आकर्षक डिझाइन्सचा विस्तृत संग्रह येथे उपलब्ध आहे.
१९३३ पासून शुद्धता, गुणवत्ता आणि विश्वासाची परंपरा जपणाऱ्या ‘एम. के. घारे ज्वेलर्स’च्या या नव्या दालनातून ठाण्यातील ग्राहकांना दागिन्यांच्या खरेदीचा एक नवा आणि अविस्मरणीय अनुभव मिळणार आहे.
शुभारंभानिमित्त मर्यादित कालावधीसाठी सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर २५% पर्यंत सूट तसेच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर ५०% सूट जाहीर करण्यात आली आहे.
ठाण्यातील दागिन्यांच्या विश्वात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे…
आजच Korum Mall येथे आवर्जून भेट द्या!
📍 पत्ता : युनिट नंबर १४, अप्पर ग्राउंड लेवल, कोरम मॉल, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे (पश्चिम) – ४००६०६
📞 संपर्क : +९१ ९७९७९७८०८४


