दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
९२ वर्षांचा विश्वास, परंपरा आणि उत्कृष्टतेची चमक – एम. के. घारे ज्वेलर्स दागिन्यांची खरेदी म्हणजे केवळ सौंदर्य नव्हे, तर विश्वास,
Read more९२ वर्षांचा विश्वास, परंपरा आणि उत्कृष्टतेची चमक – एम. के. घारे ज्वेलर्स दागिन्यांची खरेदी म्हणजे केवळ सौंदर्य नव्हे, तर विश्वास,
Read moreमुंबई, ६ जून, २०२६: L’Oréal India ने आज आपल्या सर्वात मोठ्या ‘ब्युटी स्किलिंग सेंटर’ची सुरुवात केल्याची घोषणा केली. हे सेंटर ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’ (सीआयआय) सोबतच्या एका विशेष धोरणात्मक भागीदारीअंतर्गत तयार करण्यात आले आहे. हे केंद्र L’Oréal चा प्रमुख कार्यक्रम ‘ब्युटी फॉर अ बेटर लाईफ’अंतर्गत काम करेल. ही मोठी गुंतवणूक भारताच्या कौशल्य विकास इकोसिस्टममध्ये एक मोठा बदल घडवून आणेल; जी गरजू आणि वंचित घटकातील महिलांना व्यावसायिक कौशल्ये, आर्थिक स्वातंत्र्य आणि शाश्वत उपजीविकेचे मार्ग उपलब्ध करून देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवेल. ४,२६७ चौरस फुटांवर पसरलेले हे सेंटर दरवर्षी सुमारे ३,००० लोकांना प्रोफेशनल हेअरड्रेसिंग, मेकअप आर्टिस्ट्री आणि ब्युटी सर्व्हिसेस यामध्ये प्रशिक्षित करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे. सहयोगी स्वयंसेवी संस्था आणि सलोन इंडस्ट्रीसोबत मिळून काम करताना, L’Oréal चा ‘ब्युटी फॉर अ बेटर लाईफ’ कार्यक्रम जागतिक दर्जाचे व्यावसायिक प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन, नोकरी मिळवून देण्यासाठी मदत आणि प्रशिक्षकांसाठी विशेष विकासाच्या सुविधा प्रदान करतो. L’Oréal India चा ‘स्किल इंडिया‘ आणि ‘मेक इन इंडिया‘ प्रति संकल्प L’Oréal India गेल्या ३१ वर्षांपासून भारतात कार्यरत आहे आणि या काळात त्यांनी देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आता, या नवीन ‘ब्युटी स्किलिंग सेंटर‘ची सुरुवात हा त्यांच्या याच प्रवासातील एक मोठा टप्पा आहे. या उद्घाटनाच्या निमित्ताने, L’Oréal India ने आपला पहिला ‘सामाजिक-आर्थिक प्रभाव अभ्यास‘ अहवालही प्रसिद्ध केला, जो भारतीय अर्थव्यवस्थेसोबत कंपनीचे असलेले गहिरे नाते दर्शवतो. पॅरिसमधील इकॉनॉमिक रिसर्च कन्सल्टन्सी Asterès द्वारे Asterès Impact Model (MIA) चा वापर करून केलेल्या या अभ्यासातील मुख्य निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत: कौशल्य विकासाच्या प्रभावाचा पुरावा: गुंतवणुकीवर २५ पट सामाजिक परतावा गेल्या एका दशकात, L’Oréal ने ३.३ मिलियन हेअरड्रेसर्सच्या कौशल्याला नवसंजीवनी दिली आहे आणि आपल्या ‘ब्युटी फॉर अ बेटर लाईफ‘ कार्यक्रमाच्या माध्यमातून ४२,००० महिलांना मदत केली आहे. आज, भारतातील टॉप स्टायलिस्टपैकी जवळपास ६०% महिला आहेत — हा वैविध्य आणि लैंगिक समानतेप्रती L’Oréal च्या वचनबद्धतेचा एक मोठा पुरावा आहे. L’Oréal India चे नॉन–एक्झिक्युटिव्ह चेअरमन असीम कौशिक म्हणाले: “सर्वसमावेशक आणि शाश्वत प्रभाव निर्माण करण्याच्या L’Oréal India च्या दृष्टिकोनामध्ये कौशल्य विकास हा नेहमीच मुख्य भाग राहिला आहे. भारतात सौंदर्य उद्योग जसजसा विकसित आणि मोठा होत आहे, तसतशी सेवा, किरकोळ विक्री आणि उद्योजकता या क्षेत्रांमध्ये व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षित प्रतिभावंतांची मागणी सातत्याने वाढत आहे. आमचे नवीन ‘ब्युटी स्किलिंग सेंटर‘ महिलांना उद्योगाच्या गरजेनुरूप कौशल्ये, भविष्यासाठी सज्ज क्षमता आणि अर्थपूर्ण करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याची आमची वचनबद्धता दर्शवते — आणि यासोबतच ते भारताच्या सौंदर्य अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्येही योगदान देईल.”
Read moreमुंबईतील सर्वाधिक विश्वासार्ह रिअल इस्टेट विकसकांपैकी एक असलेल्या रुस्तमजी ग्रुपने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कवळे चेक डॅम प्रकल्पाला पाठबळ देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टसोबत भागीदारी केली आहे. दि. 7 जून 2026 रोजी उद्घाटन होणाऱ्या या प्रकल्पामुळे जलसुरक्षेत सुधारणा होणे, कृषी उत्पादकता वाढणे आणि 18 गावांमधील जवळपास 1,800 शेतकरी कुटुंबांसाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण होणे अपेक्षित आहे. दीर्घकालीन पाण्याची उपलब्धता राहावी या दृष्टीने विकसित करण्यात आलेला उपाय म्हणून हा चेक डॅम पावसाचे पाणी साठवून त्याचे संवर्धन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हंगामी पर्जन्यमान मुबलक असूनही या प्रदेशात सतत पाणीटंचाई उद्भवते. या समस्येला तोंड देण्यास यामुळे मदत होईल. शाश्वत समाज विकासासाठीच्या आपल्या सातत्यपूर्ण बांधिलकीचा भाग म्हणून रुस्तमजी महाराष्ट्रातील आदिवासी पट्ट्यातील या परिवर्तनकारी उपक्रमाला पाठिंबा देत आहे. येथे वर्षभर उपलब्ध असलेल्या मर्यादित पाण्यामुळे जीवनमान आणि कृषी विकासावर मर्यादा आल्या आहेत. या धरणामुळे वरच्या दिशेने जवळपास दोन किलोमीटरपर्यंत पाणी साठवले जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भूजल पुनर्भरणास चालना मिळेल आणि वर्षभर पाण्याची उपलब्धता वाढेल. समाजाच्या सक्रिय सहभागातून राबविण्यात येणारा हा प्रकल्प स्थानिक मालकीभावाला प्रोत्साहन देतो तसेच त्याची दीर्घकालीन शाश्वतता आणि परिणामकारकता सुनिश्चित करण्यात मदत करतो. सुमारे 70.58 लाख रु. च्या एकूण प्रकल्प गुंतवणुकीसह या उपक्रमातून जलविषयक शाश्वत पायाभूत सुविधांद्वारे दीर्घकालीन परिणाम साधण्यासाठी विकास क्षेत्रातील भागधारक, स्थानिक समुदाय आणि संस्थात्मक भागीदार यांच्यातील सहयोगात्मक प्रयत्न दिसून येतात. हा प्रकल्प केवळ तत्काळ पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच नव्हे, तर या प्रदेशासाठी दीर्घकालीन सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय लाभ निर्माण करण्यासाठीदेखील डिझाइन करण्यात आला आहे. या उपक्रमाबाबत भाष्य करताना रुस्तमजी ग्रुपच्या मुख्य शाश्वतता अधिकारी श्रीमती नम्रता नुलवाला म्हणाल्या, “अर्थपूर्ण शाश्वततेचा पाया समाजासाठी दीर्घकालीन परिणाम निर्माण करण्यात आहे यावर रुस्तमजीमध्ये आमचा विश्वास आहे. विशेषतः ग्रामीण भागांमध्ये उपजीविकेची साधने ही नैसर्गिक साधनसंपत्तीशी घट्टपणे जोडलेली असतात. तिथे जलसुरक्षा ही आर्थिक लवचिकता आणि सामाजिक प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाच्या सक्षम घटकांपैकी एक आहे. कवळे चेक डॅम प्रकल्प हा विकास आणि स्वावलंबनाच्या संधी निर्माण करत व्यवस्थेतील मूलभूत आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सहकार्यपूर्ण आणि परिणामकेंद्रित हस्तक्षेपांची ताकद दाखवून देतो. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टची रोटेरियन म्हणून सहकार्यपूर्ण आणि उद्देशप्रेरित उपक्रम किती प्रभाव निर्माण करू शकतात हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. कवळे चेक डॅम प्रकल्पाला पाठबळ देऊन रुस्तमजीचे उद्दिष्ट दीर्घकालीन सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय मूल्य निर्माण करणाऱ्या लवचिक ग्रामीण परिसंस्थांच्या विकासात योगदान देणे आहे. या उपक्रमातून समाज प्रणीत, विस्तारक्षम आणि दीर्घकालीन परिवर्तन घडवून आणण्यासाठी उभारलेल्या उपाययोजनांद्वारे शाश्वत विकासासाठी असलेली आमची व्यापक बांधिलकी दिसून येते.” या भागीदारीबाबत भाष्य करताना रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या अध्यक्ष कु. प्रज्ञा मेहता म्हणाल्या, “कवळे चेक डॅम प्रकल्प हा समाजाच्या विकासासाठी समान उद्दिष्ट आणि दीर्घकालीन दृष्टीकोन घेऊन संस्था एकत्र आल्यास काय साध्य होऊ शकते याचे एक प्रभावी उदाहरण आहे. शाश्वत परिवर्तनाची सुरुवात मूलभूत गरजांची पूर्तता करण्यापासून होते आणि जलसुरक्षा ही आरोग्य, उपजीविका, शिक्षण आणि आर्थिक प्रगतीसाठी सर्वात महत्त्वाच्या सक्षम घटकांपैकी एक आहे यावर रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टमध्ये आमचा ठाम विश्वास आहे. या परिवर्तनकारी उपक्रमासाठी दिलेल्या सढळ, उदार आणि दूरदृष्टीपूर्ण पाठिंब्याबद्दल आम्ही रुस्तमजी ग्रुपचे मनःपूर्वक आभारी आहोत. केवळ जलसंवर्धन उपायसुविधेच्या पलीकडे जात कवळे चेक डॅममध्ये स्थानिक आदिवासी आणि शेतकरी समुदायांसाठी जीवनवाहिनी बनण्याची क्षमता आहे. हा प्रकल्प सामाजिक-आर्थिक विकासाला गती देईल, उपजीविका बळकट करेल, वर्षभर शेतीसाठी लागणाऱ्या कामाला पाठबळ देईल आणि भूजल पुनर्भरण व परिसंस्था संवर्धनाद्वारे पर्यावरणीय पुनर्संचय करणात योगदान देईल. रुस्तमजीसोबतची आमची भागीदारी अर्थपूर्ण आणि दीर्घकालीन परिणाम निर्माण करण्याच्या सामायिक बांधिलकीचे प्रतिक आहे. हा केवळ पायाभूत सुविधा प्रकल्प नाही. लवचिकता मजबूत करण्यासाठी, स्थानिक समुदायांना सक्षम करण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करण्यासाठी डिझाइन केलेला समाज प्रणीत प्रयत्न आहे. या उपक्रमाचे हे विशेष महत्त्व आहे. ‘सर्व्हिस अबव्ह सेल्फ’ या रोटरीच्या तत्त्वज्ञानाची आणि जबाबदार विकासासाठी असलेल्या रुस्तमजीच्या बांधिलकीची सांगड घालून या भागासाठी दीर्घकालीन सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय मूल्य सादर करणारे सहकार्याचे एक आदर्श मॉडेल निर्माण करण्याचा आम्हाला विश्वास आहे. उद्देशप्रेरित भागीदारी पुढील अनेक पिढ्यांसाठी दीर्घकालीन परिवर्तन घडवू शकते हे दाखवून देत हा प्रकल्प खऱ्या अर्थाने ‘टुगेदर वी राईज’ आणि ‘युनाइट फॉर गुड’ या भावनेचे मूर्त रूप आहे.” अशा उपक्रमांद्वारे, रुस्तमजी समाज बळकट करून, पर्यावरण विषयक जबाबदारीला प्रोत्साहन देऊन आणि भारताच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये अर्थपूर्ण योगदान देऊन बांधकाम व्यवसायाच्या पलीकडे मूल्यनिर्मिती करण्याच्या आपल्या बांधिलकीला पुढे नेत आहे.
Read moreमहाराष्ट्रीय संस्कृतीत पेज़ण आणि जोडवी यांना विशेष महत्त्व आहे. परंपरा, सौंदर्य आणि स्त्रीच्या साजशृंगाराचे प्रतीक असलेल्या या दागिन्यांना आधुनिक डिझाईनची
Read moreमुंबई : एसएससी आणि एचएससी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा टक्केवारी, गुणवत्ता यादी आणि शैक्षणिक स्पर्धेची चर्चा सुरू झाली
Read moreअर्थसंकेत प्रस्तुत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड उपक्रमात झालेल्या सार्वजनिक व्होटिंग मध्ये बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड म्हणून ‘वास्तू रविराजची निवड लोकांनी केली
Read moreमोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड म्हणून ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंटची निवड लोकांनी केली आहे. माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी आणि
Read moreबेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड म्हणून जनसेवा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीची निवड लोकांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील ऐतिहासिक कुंडल येथे
Read moreअर्थसंकेत प्रस्तुत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड उपक्रमात झालेल्या सार्वजनिक व्होटिंग मध्ये मोस्ट पॉप्युलर ब्रँड म्हणून ‘योजक फूड्सची निवड करण्यात आली. २०१९
Read moreअर्थसंकेत प्रस्तुत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड उपक्रमात झालेल्या सार्वजनिक व्होटिंग मध्ये मोस्ट पॉप्युलर ब्रँड म्हणून अंग्रेजी ढाबाची निवड लोकांनी केली आहे.
Read more