कोलते- पाटीलतर्फे आर्थिक वर्ष २५ पर्यंत ९००० कोटी रुपयांचे प्रकल्प लाँच करणार असल्याची घोषणा I

कोलते- पाटीलतर्फे आर्थिक वर्ष २५ पर्यंत ९००० कोटी रुपयांचे प्रकल्प लाँच करणार असल्याची घोषणा

~ आर्थिक वर्ष २५ पर्यंत मुंबई आणि बेंगळुरू येथून ३० टक्के विक्री

~ पुणे, मुंबई आणि बेंगळुरू येथे २६ दशलक्ष चौरस फुटांच्या जागेचा विकास

कोलते- पाटील डेव्हलपर्स लिमिटेड (BSE: 532924, NSE: KOLTEPATIL; KPDL) या पुण्यातील आघाडीच्या रियल इस्टेट कंपनीने पुढील १४ महिन्यांत पुणे, मुंबई आणि बेंगळुरू येथे मिळून एकूण ९,००० कोटी रुपयांचे प्रकल्प लाँच करणार असल्याची महत्त्वाकांक्षी घोषणा केली आहे. हा धोरणात्मक विस्तार उच्च क्षमता असलेल्या मायक्रो- मार्केट्समध्ये आपले अस्तित्व मजबूत करण्याच्या आणि पर्यायाने बाजारपेठेतील शेअर वाढवण्याच्या कोलते- पाटील डेव्हलपर्सच्या सध्याच्या योजनेचा भाग आहे.

विशेषतः कोलते- पाटील डेव्हलपर्सनी पुण्यावर जास्त भर देत महत्त्वाच्या प्रदेशांत लक्षणीय विस्तार केला आहे. पुण्यातील आगामी प्रकल्प लाँच अंदाजे ६,४०० कोटी रुपयांचे आहे. पुण्यातील निवासी गृहप्रकल्पांची बाजारपेठ सातत्याने विस्तारत असून त्याला आर्थिक उलाढाल तसेच पायाभूत सुविधांच्या विकासात झालेली वाढ पूरक ठरत आहे.

शहरी पायाभूत सुविधांचा विकासदर्जेदार राहाणीमान, वाजवी खर्च आणि वाढते दरडोई उत्पन्न यांमुळे या शहराच्या विकासाला चालना मिळत आहे तसेच विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होत आहे. केपीडीएलचे आगामी प्रकल्प पुण्यातील किवळेपिंपळे- निळखबाणेरखराडीहिंजवडी आणि एनआयबीएम रोड यांसारख्या मायक्रो- मार्केट्समध्ये धोरणात्मक पद्धतीने वसवण्यात येत आहेत. या बाजारपेठा औद्योगिक क्षेत्रापासून जवळ असल्याने तसेच तेथील कनेक्टिव्हिटी आणि सामाजिक पायाभूत सुविधा दर्जेदार असल्यामुळे निवासी प्रकल्पांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान मुंबईतील प्रकल्प लाँचची क्षमता आर्थिक वर्ष २५ पर्यंत अंदाजे २५०० कोटी रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज आहे. मुंबईतील एकूण १५ रिडेव्हलपमेंट प्रकल्पांसह (२ पूर्ण, २ सध्या सुरू आणि ८ नियोजित) कंपनीने आर्थिक वर्ष २५ पर्यंत पुणे बाजारपेठेतून विक्री विभाजन ७० टक्के आणि मुंबई व बेंगळुरूचे मिळून ३० टक्के असेल असे ध्येय ठेवले आहे.

हे कोलते- पाटील यांच्या विभागीकरण करण्याच्या ध्येयाशी सुसंगत आहे. विक्री गायडन्सचे आर्थिक  वर्ष २५ मधील ध्येय ३५०० कोटी रुपये, तर आर्थिक वर्ष २६ मधील ध्येय ४५०० कोटी रुपये असेल. 

नोव्हेंबर २०२२ मध्ये कोलते- पाटील डेव्हलपर्स यांनी मारूबेनी कॉर्पोरेशन, जपान यांच्यासह सहकार्य केल्याचे व त्याद्वारे पुण्यातील पिंपळे- निळख या मायक्रो मार्केटमधील केपीडीएल यांच्या निवासी प्रकल्पासाठी २०६.५ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवल्याचे जाहीर केले होते.

त्याशिवाय कोलते- पाटील यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये मारूबेनी कॉर्पोरेशन यांच्यासह मुंबईतील मायक्रो- मार्केट कलिनासाठी ११०.९ कोटी रुपयांचा दुसरा करार केला आहे. या भागिदारींवरून कोलते- पाटील यांची आर्थिक आघाडी सांभाळून दमदार विकास करण्याची, रियल इस्टेट क्षेत्रात कंपनीला यशस्वी स्थान मिळवून देण्याची बांधिलकी दिसून आली आहे.

कोलते- पाटील डेव्हलपर्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल तळेले म्हणाले, ‘   ‘क्रिएशन, नॉट कन्स्ट्रक्शन’ या तत्वाप्रती आमची बांधिलकी एखाद्या बांधकामाचे लँडमार्कमध्ये रुपांतर करण्याचा आमचा अनोखा दृष्टीकोन दाखवणारी आहे. आमचे कौशल्य आजवर विकसित केलेल्या २६ दशलक्ष चौरस फुटांच्या विकासावरून दिसून आले असून सध्या आमचे ३३.५ दशलक्ष चौरस फुटांचे प्रकल्प सुरू आहेत. त्यात दमदार ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू (जीडीव्ही) २५,००० कोटी क्षमतेचा समावेश आहे. पुण्यातील लाइफ रिपब्लिक टाउनशीप प्रकल्प हा आमचा प्रमुख प्रकल्प दर्जा आणि बाजारपेठेतील मागणीनुसार पुरवठा करण्याची आमची क्षमता अधोरेखित करणारा आहे. आर्थिक वर्ष २४ च्या नऊ महिन्यांत साध्य करण्यात आलेली १.७ दशलक्ष चौरस फुटांची विक्रीपूर्व आकडेवारी गुणवत्तेप्रती आमच्या बांधिलकीला मिळालेली पावती आहे. त्याशिवाय आम्ही नुकत्याच केलेल्या कामगिरीमध्ये एमएमआर भागात रिडेव्हलपमेंटचे दोन प्रकल्प मिळवणे आणि अंदाजे ५४५ कोटी रुपयांचे अपेक्षित उत्पन्न यांचा समावेश आहे. या शहरातील आमचे अस्तित्व आणखी बळकट करण्याच्या धोरणाचाच हा एक भाग आहे. हे प्रकल्प बाजारपेठेतील आमच्या स्थानाशी सुसंगत आहेत आणि त्याद्वारे ग्राहकांबरोबरचे नाते बळकट करण्याचे तसेच त्यांना चांगले मूल्य मिळवून देत सोसायटी रिडेव्हलपमेंटमध्ये धोरणात्मक उपक्रमांचा परिणाम वाढवण्याचे ध्येय आहे. यापुढील प्रवासातही पुणे, एमएमआर आणि बेंगळुरू या महत्त्वाच्या बाजारपेठांमधील आमचे स्थान मजबूत करण्यावर, नवे मापदंड प्रस्थापित करण्यावर आणि कंपनीला या क्षेत्रात आघाडी मिळवून देण्यावर आमचा भर असेल.’

तंत्रज्ञानात धोरणात्मक गुंतवणूक करत कोलते- पाटील यांनी कायमच बांधकामाला वेग देण्यावर, डेटावर आधारित निर्णय घेण्यावर आणि सर्वसमावेशक अनुभव देण्यावर भर दिला आहे. यावरून ग्राहकांना वेळेत डिलीव्हरी तसेच निर्दोष सेवा देण्याप्रती कंपनीची वचनबद्धता दिसून आली आहे. दर्जेदार डेव्हलपर्सच्या मागणीला प्रतिसाद देत कंपनीने आपल्या उच्च स्थानाच्या मदतीने ग्राहकांशी असलेले नाते आणखी उंचावत त्यांना जास्तीत जास्त मूल्य मिळवून दिले आहे.

तीन शहरांत कार्यरत असलेली ही कंपनी तपशीलवार नियोजनाच्या मदतीने यशस्वीपणे विभागीकरण करत आहे आणि पुणेमुंबई व बेंगळुरूसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठांत नवे प्रकल्प लाँच करत आहे.

Representation picture from Kolte-Patil Developers -Opula Project
Representation picture from Kolte-Patil Developers -Opula Project

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/48vnlQB

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3SHI9y3

शेअर ट्रेडींगची १८ प्रभावी सूत्रे – 18 Rules of Share Trading (Marathi Edition) Kindle Edition – https://amzn.to/3ul6ZvT

18 Effective Rules of Stock Trading Kindle Edition – Click on link to Read Free on Amazon Kindle or buy – https://amzn.to/3HXqUUw – English

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *