‘मी उद्योजक होणारचं’ कार्यक्रमात अर्थसंकेतच्या कार्याचा सन्मान

‘मी उद्योजक होणारचं’ कार्यक्रमात अर्थसंकेतच्या कार्याचा सन्मान

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई येथील षण्मुखानंद सभागृह येथे बुधवार दिनांक ५ मार्च २०२४ रोजी भव्य दिव्य शाही सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री श्री उदय सामंत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मराठी भाषेसाठी कार्यरत असणाऱ्या अर्थसंकेत या मराठी बिझनेस न्यूजपेपरच्या कार्याचा श्री एग्नेलोराजेश अथायडे यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला. अर्थसंकेत हे मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक वर्तमानपत्र असून, मराठी माणसाला गुंतवणूक व उद्योजकतेची माहिती मराठीत देण्याचे कार्य हि संस्था गेली दहा वर्षे करीत आहे. अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलवर २००० हुन अधिक गुंतवणूक व उद्योजकतेवरील व्हिडीओ विनामूल्य उपलब्ध आहेत. अर्थसंकेतने आजपर्यंत ५०० हुन अधिक मराठी उद्योजकांचा सन्मान व गौरव केला आहे. विविध उद्योजकीय संस्थाना एका व्यासपीठावर आणायचे काम अर्थसंकेत सातत्याने करत आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे मराठी उद्योजकांचे कार्यक्रम करणारी अर्थसंकेत हि एकमेव संस्था आहे.

felicitation at Mi udyojak honarach
felicitation at Mi udyojak honarach

२७ फेब्रुवारी २०२४ रोजी याचा कार्यासाठी अर्थसंकेतचा ‘उद्योग श्री’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.

मी उद्योजक होणारच – सामान्य लोकांना उद्योजक बनवणारे व्यासपीठ !

Dr Amit Bagwe at Mi udyojak honarach event
Dr Amit Bagwe at Mi udyojak honarach event

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3SHI9y3

शेअर ट्रेडींगची १८ प्रभावी सूत्रे – 18 Rules of Share Trading (Marathi Edition) Kindle Edition – https://amzn.to/3ul6ZvT

18 Effective Rules of Stock Trading Kindle Edition – Click on link to Read Free on Amazon Kindle or buy – https://amzn.to/3HXqUUw – English

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *