गोदरेज इंटेरियोच्या ‘होमस्केप्स’ सर्वेक्षणानुसार ‘मी टाइम’साठी भारतीयांची पसंती घराला I

गोदरेज इंटेरियोच्या होमस्केप्स सर्वेक्षणानुसार मी टाइमसाठी भारतीयांची पसंती घराला

~ कंपनीने केलेल्या होमस्केप्स या सर्वेक्षणानुसार फर्निचरवरून लक्षात येते ग्राहकाचे व्यक्तिमत्त्व

आधुनिक भारताच्या बदलत्या आणि वेगवान जगात लोकांचा घराकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही झपाट्याने बदलत असल्याचे निरीक्षण गोदरेजच्या होमस्केप्स या सर्वेक्षणात नोंदवण्यात आले आहे. गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज अँड बॉयसच्या गोदरेज इंटेरियो या व्यवसाय विभागाने हे सर्वेक्षण केले आहे. त्यासाठी करण्यात आलेल्या संशोधनात ग्राहकाचे व्यक्तिमत्त्व आणि पसंती तसेच त्यांची मूल्य घर सजावटीमध्ये प्रतिबिंबित होतात असे निरीक्षम मांडण्यात आले आहे. घरे आणि वैयक्तिक विकास यांच्यात खोल नाते असल्याचे मतही यात मांडण्यात आले आहे.

या सर्वेक्षणाच्या नोंदींमध्ये ग्राहकाची बदलती मानसिकता, वैयक्तिक गरजांसाठी लागणाऱ्या जागेचे महत्त्व आणि त्याचे वैयक्तिक विकासाशी असलेले नाते इत्यादी बाबी मांडण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे ‘मी टाइम’- स्वतःसाठीचा वेळ घरातच व्यतीत करण्यास पसंती देणाऱ्या भारतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बहुसंख्य भारतीय घरातूनच काम करत सोबत वैयक्तिक जीवनाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे ‘वैयक्तिक वेळ’ ही गरज बनली आहे. ‘होमस्केप्स’ या सर्वेक्षणानुसार जास्तीत जास्त भारतीय घरातच स्वतःसाठी एक जागा तयार करून तिथे फक्त स्वतःचा निवांत वेळ घालवण्यास उत्सुक आहेत. विशेष म्हणजे, घर सजावटीचे नियोजन करताना सर्वात आधी स्वतःसाठीच्या स्वतंत्र कोपऱ्याचा विचार करणाऱ्या भारतीयांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. किंबहुना या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तीनपैकी एक सहभागीने – मुंबई आणि कोलकाता येथील अनुक्रमे ३७ टक्के आणि ३१ टक्के, तर बेंगळुरूमधील २७ टक्के नागरिकांनी आपल्या पहिल्या घराचे स्वप्न पाहाताना सर्वात आधी एकट्याने वेळ घालवण्यासाठी स्वतंत्र कोपऱ्याचा विचार केल्याचे मान्य केले.

या ट्रेंडविषयी गोदरेज इंटेरियोचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख स्वप्नील नगरकर म्हणाले, ‘होमस्केप्समध्ये ग्राहक, त्यांचे कुटुंब आणि त्यांचे घर यांच्यातील भावनिक नाते दर्शवण्यात आले आहे. या सर्वेक्षणात ग्राहकांच्या अस्तित्वाशी संबंधित सर्वात महत्त्वाच्या पैलूचे – त्यांच्या आयुष्याचे प्रतिबिंब असलेल्या त्यांच्या घराशी निगडीत भावना दर्शवण्यात आल्या आहेत. सर्वेक्षणादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार ग्राहकांचा कल व्यवहार्यता आणि सौंदर्य अशा दोन्ही गोष्टींवर असून आपले घर कार्यक्षम, अभिरूचीने सजवलेले आणि स्वागतार्ह असावे असे त्यांना वाटत असल्याचेही सांगण्यात आले आहे. गोदरेज इंटेरियोमध्ये सौंदर्याच्या पलीकडे जाणारे, आधुनिक भारतीय जीवनशैलीला साजेशी वैशिष्ट्ये असलेले फर्निचर बनवले जात असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आमचे फर्निचर घराचा आणि पर्यायाने जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग बनते व ते स्टाइल आणि उपयुक्तता यांचे प्रतीक ठरते.’

त्याशिवाय या सर्वेक्षणानुसार बाहेरच्या जगातील कोलाहलापेक्षा दूर घराला पसंती देण्यात कोलकाता, बेंगळुरू आणि मुंबई ही शहरे आघाडीवर आहेत. २२ टक्के जणांना असे वाटते, की त्यांचे घर निवांत वेळ घालवण्यासाठी, शांत झोप घेण्यासाठी, ध्यानधारणा करण्यासाठी, बाल्कनीतील बागेत वेळ व्यतीत करण्यासाठी सर्वोत्तम असते. कोलकाता (५६ टक्के), बेंगळुरू (४० टक्के) आणि मुंबई (३९ टक्के) येथील अर्ध्यापेक्षा जास्त सहभागींनी गेल्या दोन- तीन वर्षांत त्यांच्या घरात छोटा बगीचा तयार केला आहे. अर्ध्या म्हणजेच ४६ टक्के सहभागींनुसार – त्यांनी घरीच व्यायाम किंवा योग करण्यास सुरुवात केली आहे. त्याशिवाय ५६ टक्के सहभागींनी घरात आपल्या आवडत्या खुर्चीवर किंवा कट्ट्यावर नाहीतर लिव्हिंग रूममध्ये बसून कॉफीचा आस्वाद घेण्याची इच्छा व्यक्त केली.

हे सर्वेक्षण बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैद्राबाद, कोलकाता, मुंबई आणि कोलकाता अशा सात शहरांत करण्यात आले व त्यात २८२२ भारतीय सहभागी झाले होते.

About Godrej Interio:

Godrej Interio is India’s leading premium furniture brand in both home and institutional segments with a strong commitment to sustainability and centers of excellence in design, manufacturing and retail. 

Alantra Recliner by Godrej Interio
Alantra Recliner by Godrej Interio

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/48vnlQB

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3SHI9y3

शेअर ट्रेडींगची १८ प्रभावी सूत्रे – 18 Rules of Share Trading (Marathi Edition) Kindle Edition – https://amzn.to/3ul6ZvT

18 Effective Rules of Stock Trading Kindle Edition – Click on link to Read Free on Amazon Kindle or buy – https://amzn.to/3HXqUUw – English

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *