खो गो’चा मोस्ट पॉप्युलर ब्रँड पुरस्काराने सन्मान

अर्थसंकेत प्रस्तुत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड उपक्रमात झालेल्या सार्वजनिक व्होटिंग मध्ये लोकांनी खो गो’ची मोस्ट पॉप्युलर ब्रँड म्हणून निवड केली. मुंबईत झालेल्या सन्मान सोहळ्यात पोस्टकार्ड मॅन ऑफ इंडिया श्री. प्रदीप लोखंडे व अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे यांच्या हस्ते श्री. मुरलीधर रेडकर यांचा सन्मान करण्यात आला.

खो गो’ला मिळालेला हा सन्मान त्यांच्या ग्राहकांमधील विश्वास आणि लोकप्रियतेचा ठसा उमटवणारा ठरला आहे.

‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड (MahaBrand)’ हा अर्थसंकेत प्रस्तुत एक भव्य आणि प्रतिष्ठित बिझनेस सन्मान सोहळा असून, महाराष्ट्रातील विश्वासार्ह आणि लोकप्रिय ब्रँड्सचा गौरव याद्वारे करण्यात आला. व्यवसायांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी, ग्राहकांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण गुणवत्तेबद्दल सन्मानित करण्यात आले. उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रँड्सना ट्रॉफी आणि गौरव पत्रिका देऊन सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या ब्रँडची प्रतिष्ठा आणि ओळख अधिक दृढ झाली. हा सोहळा केवळ पुरस्कार वितरण नसून, महाराष्ट्रातील उद्योजकता, ब्रँड बिल्डिंग आणि ग्राहकांच्या विश्वासाचा उत्सव ठरला.

🗳️ सार्वजनिक मतदानाद्वारे ब्रँड निवड या उपक्रमात ७ दिवसांची पारदर्शक सार्वजनिक मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. अर्थसंकेतच्या व्हॉट्सअॅप चॅनेलद्वारे घेतलेल्या मतदानात ब्रँड्सची निवड तीन प्रमुख श्रेणींमध्ये करण्यात आली.

यंदा Single Click Voting System सुरू करून प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सर्वांसाठी सुलभ करण्यात आली. ग्राहक, गुंतवणूकदार, विक्रेते आणि सर्वसामान्य नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी होता येते.

💡 संकल्पनेमागील उद्दिष्ट ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’ या उपक्रमाची सुरुवात २०१७ मध्ये करण्यात आली. मराठी उद्योजकांनी आपली ब्रँड ओळख जागतिक स्तरावर निर्माण करावी, ब्रँड व्हॅल्यूचे महत्त्व समजावे आणि लोकशाही पद्धतीने ग्राहकांच्या मतांवर आधारित ब्रँड निवड व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

Kho Go
Kho Go

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *