बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड म्हणून ‘छत्रपती शिवाजी’ज क्रिएटिव्ह सोल्युशन्स’ची निवड
सार्वजनिक मतदानाद्वारे बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड म्हणून ‘छत्रपती शिवाजी’ज क्रिएटिव्ह सोल्युशन्स’ची निवड लोकांनी केली आहे. मुंबई येथे झालेल्या भव्य दिव्य सोहळ्यात अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे व एजिलस डायग्नॉस्टिक्सचे डॉ. अविनाश फडके यांच्या हस्ते श्री. विकास देशमुख आणि सौ. तनुजा विकास देशमुख यांचा सन्मान करण्यात आला.

२०१३ मध्ये विकास देशमुख आणि तनुजा विकास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली ‘छत्रपती शिवाजी’ज क्रिएटिव्ह सोल्युशन्स’ ही संस्था रुग्णालय व्यवस्थापन आणि विमा दाव्यांच्या (Insurance Claims) क्षेत्रात मोलाचे कार्य करत आहे. अनेक रुग्णालयांना शासकीय विमा योजनांची अंमलबजावणी आणि क्लेम सेटलमेंट प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी
CSCS तज्ज्ञ मार्गदर्शन पुरवते. पारदर्शक व्यवहार आणि वेळेत मिळणारा क्लेम यामुळे ही संस्था रुग्णालये आणि रुग्ण या दोघांसाठीही विश्वासार्ह ठरली आहे. आरोग्य सेवा क्षेत्रातील प्रशासकीय गुंतागुंत सोपी करून रुग्णालयांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यात CSCS चा मोठा वाटा आहे.
8 राज्यांमध्ये 50 हून अधिक हॉस्पिटल्स मध्ये CSCS सेवा पुरवत आहे. ह्यात 413 हून अधिक आरोग्य सेवकांची (ज्यात २५ हून अधिक तद्न्य डॉक्टरांचा समावेश) टीम आहे.

🗳️ सार्वजनिक मतदानाद्वारे ब्रँड निवड या उपक्रमात ७ दिवसांची पारदर्शक सार्वजनिक मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. अर्थसंकेतच्या व्हॉट्सअॅप चॅनेलद्वारे घेतलेल्या मतदानात ब्रँड्सची निवड तीन प्रमुख श्रेणींमध्ये करण्यात आली.
💡 संकल्पनेमागील उद्दिष्ट ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’ या उपक्रमाची सुरुवात २०१७ मध्ये करण्यात आली. मराठी उद्योजकांनी आपली ब्रँड ओळख जागतिक स्तरावर निर्माण करावी, ब्रँड व्हॅल्यूचे महत्त्व समजावे आणि लोकशाही पद्धतीने ग्राहकांच्या मतांवर आधारित ब्रँड निवड व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
यंदा Single Click Voting System सुरू करून प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सर्वांसाठी सुलभ करण्यात आली. ग्राहक, गुंतवणूकदार, विक्रेते आणि सर्वसामान्य नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी होता येते.

- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स

