इंडियन पाम ऑइल सस्टेनिबिलिटी फ्रेमवर्क (IPOS) अंतर्गत इंडियन ऑइल पाम प्रमाणपत्र मिळविणारी गोदरेज अॅग्रोव्हेट ही देशातील पहिली कंपनी

इंडियन पाम ऑइल सस्टेनिबिलिटी फ्रेमवर्क (IPOS) अंतर्गत इंडियन ऑइल पाम प्रमाणपत्र मिळविणारी गोदरेज अॅग्रोव्हेट ही देशातील पहिली कंपनी

मुंबई, १० जानेवारी २०२३: गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड ही देशातील पहिली कंपनी बनली आहे जिला त्यांच्या पाम तेल व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या शाश्वत कार्यपद्धतींसाठी एका स्वायत्त आंतरराष्ट्रीय प्रमाणन संस्थे द्वारे इंडियन पाम ऑइल सस्टेनिबिलिटी फ्रेमवर्क (IPOS) अंतर्गत इंडियन पाम ऑइल पडताळणी प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

      हे प्रमाणपत्र गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडच्या ऑइल पाम प्लांटेशन व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) श्री. सौगता नियोगी यांना प्रदान करण्यात आले.

      पाम तेलाचा जगातील सर्वात जास्त ग्राहक असलेला भारत आपल्या वस्तूंच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी स्वतःच्या महत्वाकांक्षी योजनांसह पुढे जात आहे.

      सॉल्व्हेंट एक्स्ट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने सॉलिडारिडॅड, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ऑइल पाम रिसर्च आणि सोपोप्रॅड (SOPOPRAD) यांच्या सहाय्याने आयपीओएस फ्रेम वर्क (IPOS) तयार करवून देऊन भारतीय उद्योग क्षेत्रासाठी  पर्यावरणास अनुकूल, आर्थिक दृष्ट्‍या व्यवहार्य आणि सामाजिक दृष्ट्‍या फायदेशीर अशा मार्गदर्शक तत्वांचा संच उपलब्ध करून दिला आहे.

होणारा विकास हा पर्यावरणीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून शाश्वत आहे याची खात्री करून शेतकऱ्यांचे कल्याण हे यामागील उद्दिष्ट आहे.

गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेडच्या ऑइल पाम प्लांटेशन व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) श्री. सौगता नियोगी यावेळी म्हणाले, “पाम तेल व्यवसायातील तीस वर्षांपेक्षा जास्त अनुभवासह गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड हे भारतातील सर्वात मोठे कच्च्या पाम तेलाचे उत्पादक आणि विकसक आहेत. पाम तेलाच्या उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी आमची कंपनी महत्त्वाची भूमिका बजावते आणि त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना शाश्वत पाम तेल लागवड पद्धतींबाबत प्रशिक्षित करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो. शेतकऱ्यांना उत्पादकता वाढविणारी, किफायतशीर शेती व्यवस्थापन कौशल्ये शिकण्यासाठी मदत करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा परिणाम म्हणजे हे प्रमाणपत्र आहे. आमच्या प्रयत्नांना मान्यता दिल्या बद्दल आम्ही इंडियन पाम ऑइल सस्टेनिबिलिटी फ्रेमवर्क (IPOS) चे आभारी आहोत आणि नजीकच्या भविष्यात अजून मोठे टप्पे गाठण्यासाठी उत्सुक ही आहोत.”

गेल्या काही वर्षात गोदरेज अॅग्रोव्हेटने आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, गोवा, महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, छत्तीसगड आणि मिजोराम मध्ये पाम प्लांटेशन (पाम चे मळे) विकसित केले आहे. नुकतेच, गोदरेज अॅग्रोव्हेटने खाद्य तेलांवरील मिशन ऑइल पाम (NMEO-OP) योजनेअंतर्गत आसाम, मणिपूर, त्रिपूरा या भागात तेल पाम लागवडीच्या विकासासाठी आणि त्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या राज्य सरकारांसोबत सामंजस्य करार (मेमोरॅन्डम ऑफ अन्डरस्टँडिंग MoUs) केले आहेत. हे सामंजस्य करार तेल पाम उत्पादनाची शाश्वत वाढ आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून भारताच्या खाद्यतेल मोहिमेचे उत्प्रेरक बनण्याच्या कंपनीच्या दीर्घकालीन धोरणाला पूरक व सुसंगत आहेत.

Godrej Agrovet
Godrej Agrovet

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *