फेडेक्स तर्फे भारतात शून्य उत्सर्जन लास्ट माईल डिलिव्हरीचे शाश्वतता उद्दिष्ट पुढे नेण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने तैनात I

फेडेक्स तर्फे भारतात शून्य उत्सर्जन लास्ट माईल डिलिव्हरीचे शाश्वतता उद्दिष्ट पुढे नेण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने तैनात

नवी दिल्ली, १० जानेवारी २०२३: फेडेक्स कॉर्प. (NYSE: FDX) ची उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस वाहतूक कंपनी FedEx Express (FedEx) २०४० पर्यंत जागतिक स्तरावर कार्बन न्यूट्रल कामकाज साध्य करण्याच्या आपल्या उद्दिष्टाचा भाग म्हणून दिल्लीत ३० टाटा एसीई इव्हीएस् (TATA Ace EVs) इलेक्ट्रिक डिलिव्हरी वाहने तैनात करत आहे.

इलेक्ट्रिक वाहने (EV) सादर करणे हा FedEx साठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण कंपनीने २०४० पर्यंत तिचे संपूर्ण पार्सल पिकअप आणि डिलिव्हरी फ्लीट शून्य-उत्सर्जन इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करण्याची योजना आखली आहे. FedEx चे २०२५ पर्यंत जागतिक पिकअप आणि वितरण वाहन खरेदीमध्ये ५०% वाहने इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी कंपनीने वाहन तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी आणि पॅकेजेसने संपूर्ण भरलेल्या नियमीत मार्गावर वाहनांच्या कार्यात्मक परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यासाठी भारतात ईव्ही चाचण्या घेतल्या. या चाचण्यांच्या आधारे, FedEx फ्लीटमध्ये भर पडलेले प्रत्येक नवीन इलेक्ट्रिक वाहन दरवर्षी १.३ टन कार्बन उत्सर्जन वाचवेल असा अंदाज आहे.

“FedEx मध्ये आमची महत्त्वाकांक्षी शाश्वतता उद्दिष्टे आहेत आणि हरित जगासाठी पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्याकरता टप्प्याटप्प्याने वाहन विद्युतीकरणाचा दृष्टीकोन हा आमच्या रोडमॅपचा एक महत्त्वाचा भाग आहे”, असे FedEx Express इंडिया ऑपरेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक सुवेंदू चौधरी म्हणाले. “ई-कॉमर्सची वाढती लोकप्रियता म्हणजे आमची कार्ये अधिक शाश्वत होण्यासाठीचे परिवर्तन हे नेहमीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. आमच्या ताफ्याचे विद्युतीकरण आमच्या कामकाजामध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने खूप पुढे जाईल आणि त्याच वेळी तीच सेवा शाश्वतपणे वितरित करेल,” असेही ते म्हणाले.

इलेक्ट्रिक वाहने ई-कार्गो दळणवळणासाठी तांत्रिकदृष्ट्या प्रगत, स्वच्छ आणि स्मार्ट उपायसुविधा देतात. वेळेवर आणि कार्यक्षम लास्ट माईल डिलिव्हरीची मुख्य गरज पूर्ण करण्याबरोबरच इलेक्ट्रिक वाहने निव्वळ शून्य कार्बन फूटप्रिंट साध्य करण्यासाठी आपल्या कर्तव्यदक्ष ग्राहकांच्या भविष्याप्रती बांधिलकी आणि आकांक्षा पूर्ण करण्यात मदत करतात. लॉजिस्टिक उद्योगाच्या मागणीनुसार त्यांचा कंटेनर वजनाने हलका, टिकाऊ साहित्याचा बनलेला आहे.

FedEx ने कमिशन केलेल्या संशोधनानुसार, भारतातील दहा पैकी नऊ ग्राहकांना व्यवसायात शाश्वत वितरणाची अपेक्षा आहे आणि ज्यांचे शाश्वत कामकाज आहे त्यांना अधिक व्यवसाय मिळण्याची शक्यता आहे. दहापैकी आठ जण प्रभावी पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासन (ESG) धोरण असलेल्या कंपन्यांकडून खरेदी करण्यास प्राधान्य देतात.’

२००३ मध्ये FedEx ही जगातील पहिली डिलिव्हरी कंपनी होती जिने पिकअप आणि डिलिव्हरीसाठी हायब्रीड वाहने वापरली आणि १९९४ मध्ये कंपनीने कॅलिफोर्नियामध्ये आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन – अॅसिड बॅटरीवर चालणारे वाहन वापरले. FedEx सुधारित इंधन कार्यक्षमता मानके आणि पर्यायी-इंधन वाहनांच्या व्यावसायिक उपयोजनाला समर्थन देण्यासाठी धोरणे यांचे समर्थन करत आहे.

FedEx deploys electric vehicles in India
FedEx deploys electric vehicles in India

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *