गोदरेज एरोस्पेसने डीआरडीओ टर्बोजेट इंजिनचे आठ मॉडयूल्स तयार करण्याची ऑर्डर मिळवली I

गोदरेज एरोस्पेसने डीआरडीओ टर्बोजेट इंजिनचे आठ मॉडयूल्स तयार करण्याची ऑर्डर मिळवली

~या दर्जाचे इंजिन बनविणारी पहिली खासगी कंपनी बनली

मुंबई, २१ फेब्रुवारी २०२३: गोदरेज समूहाची एक प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयस ने आज जाहीर केले की, गोदरेज एरोस्पेस ही पहिली भारतीय खासगी कंपनी आहे ज्याने हवाई अनुप्रायोगांसाठी डीआरडीओ टर्बोजेट इंजिनच्या आठ मॉडयूल्स तयार करण्याचे कंत्राट मिळवले. गोदरेज एरोस्पेसने त्यांच्या मजबूत पायाभूत सुविधा, अद्वितीय सामग्रीसह काम करण्यात प्रवीणता आणि रॉकेटसाठी द्रव इंजिन तयार करण्याचा अनेक दशकांचा अनुभव तसेच जागतिक विमान वाहतूक कंपन्यांची सेवा यामुळे २५ हून अधिक कंपन्यांशी स्पर्धा करत हे कंत्राट मिळविले. 

          हा उपक्रम भविष्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प भारतात स्वदेशी तत्वावर बनवण्याच्या संधी उपलब्ध करून देईल. भारतामध्ये उत्पादनासाठी जागतिक कंपन्यांच्या वाढत्या स्वारस्यामुळे गोदरेज एरोस्पेस विविध प्रकारच्या इंजिनांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे.

          या महत्त्वपूर्ण उपलब्धीवर भाष्य करताना  गोदरेज एरोस्पेसचे सहयोगी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख श्री. माणेक बहरामकामदिन म्हणाले, “डीआरडीओ इंजिनचे मॉडयूल्स तयार करण्याच्या प्रकल्पाची ऑर्डर जिंकल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहेजे एरोस्पेस क्षेत्रातील आमच्या क्षमता आणि उत्तम कौशल्याचे प्रमाण आहे. हे यश भारताला एरोस्पेस उत्पादनात स्वावलंबी बनवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देते आणि अशाप्रकारे देशाच्या आर्थिक विकासामध्ये सुद्धा योगदान देते. विमान वाहतूक आणि संरक्षण क्षेत्रातील जागतिक कंपन्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि उद्योगाच्या वाढीस हातभार लावण्यासाठी आम्ही आमच्या व्यापक अनुभवाचा आणि क्षमतांचा लाभ घेण्यास उत्सुक आहोत.”

          या अनुभवामुळे भविष्यातील अन्य प्रकल्पांना नागरी विमान वाहतूक इंजिनसाठी मॉडयूल विकसित करण्याचा मार्ग मोकळा होईल. गोदरेज एरोस्पेस भारत सरकारच्या मेक-इन-इंडिया उपक्रमात योगदान देण्यासाठी आणि स्वदेशी प्रगत लढाऊ जेट इंजिन विकसित करण्यात भारताला स्वयंपूर्णता मिळवण्यात मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे. कंपनीने  एरोस्पेस आणि संरक्षण प्रकल्पांसाठी सुमारे ५०० कोटींची गुंतवणूक केली आहे आणि तिच्या उत्पादन प्रक्रियेत नवीन प्रक्रिया आणि पद्धतींचा समावेश केला आहे. 

Godrej aerospace
Godrej aerospace

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *