गोदरेज प्रॉपर्टीजने विकत घेतला राज कपूर यांचा मुंबईतील चेंबूर येथील बंगला I

गोदरेज प्रॉपर्टीजने विकत घेतला राज कपूर यांचा मुंबईतील चेंबूर येथील बंगला

मुंबईस्थित रिअल इस्टेट डेव्हलपर या महत्वपूर्ण प्रतिष्ठित ठिकाणी प्रीमियम निवासी प्रकल्प विकसित करेल

मुंबई, १७ फेब्रुवारी २०२३: भारतातील आघाडीच्या बांधकाम विकसकांपैकी एक गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जीपीएल) (BSE scrip id: GODREJPROP) ने प्रीमियम निवासी प्रकल्प विकसित करण्यासाठी राज कपूर यांचा चेंबूरमधील बंगला विकत घेतल्याचे आज जाहीर केले.

ही साइट देवनार फार्म रोड, चेंबूर, मुंबई येथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) च्या शेजारी असून चेंबूरच्या सर्वात प्रिमियम निवासी परिसरांपैकी एक मानली जाते. ही जमीन महान भारतीय अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते राज कपूर यांचे कायदेशीर वारस असलेल्या कपूर कुटुंबाकडून खरेदी करण्यात आली होती.

गोदरेज आरकेएस हा प्रीमियम मिक्सड यूज प्रकल्प विकसित करण्यासाठी मे २०१९ मध्ये गोदरेज प्रॉपर्टीजने कपूर कुटुंबाकडून मुंबईतील चेंबूर येथील आर.के. स्टुडिओचे अधिग्रहण केले होते. हा प्रकल्प २०२३ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पांडे म्हणाले, “आम्हाला आमच्या पोर्टफोलिओमध्ये या प्रतिष्ठित प्रकल्पाची भर घालताना आनंद होत आहे आणि ही संधी आम्हाला दिल्याबद्दल कपूर कुटुंबाचे आम्ही आभारी आहोत. गेल्या काही वर्षांपासून प्रीमियम विकासाची मागणी जोर धरत आहे. या प्रकल्पामुळे आम्हाला चेंबूरमधील आमचे स्थान आणखी मजबूत करता येईल. येथील रहिवाशांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणारा आणि या जागेची शान उंचवणारा एक उत्कृष्ट निवासी समाज तयार करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवू.”

रणधीर कपूर म्हणाले, “आमच्या कुटुंबासाठी चेंबूरमधील या निवासी जागेचे भावनिक आणि ऐतिहासिक महत्त्व खूप आहे. या जागेच्या विकासाच्या पुढील टप्प्यासाठी हा समृद्ध वारसा पुढे नेण्याकरता आम्हाला पुन्हा एकदा गोदरेज प्रॉपर्टीजशी संलग्न होताना आनंद होत आहे.”

जवळच्या अंतरावर व्यावसायिक आणि किरकोळ दुकाने यांसह आरोग्य सेवा केंद्रे, शैक्षणिक संस्था, मनोरंजन आणि करमणूक केंद्रे अशा चांगल्या पायाभूत सुविधा यांचा समावेश असलेले चेंबूर हे एक प्रस्थापित निवासी ठिकाण आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि ईस्टर्न फ्रीवेच्या जवळ हे स्थळ असून बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC), मुंबईची मध्य आणि पश्चिम उपनगरे, दक्षिण मुंबई सायन-पनवेल हायवे मार्गे, ठाणे आणि नवी मुंबई यांना या ठिकाणाहून चांगली कनेक्टिव्हिटी आहे.

 About Godrej Properties Limited:

Godrej Properties brings the Godrej Group philosophy of innovation, sustainability, and excellence to the real estate industry. Each Godrej Properties development combines a 126-year legacy of excellence and trust with a commitment to cutting edge design, technology, and sustainability. In FY 2021, Godrej Properties emerged as the largest developer in India by the value and volume of residential sales achieved. Godrej Properties has deeply focused on sustainable development. In 2010, GPL committed that all of its developments would be third party certified green buildings. In 2020 and again in 2021 and 2022, the Global Real Estate Sustainability Benchmark ranked GPL #1 globally amongst listed residential developers for its sustainability and governance practices. In 2017, GPL was one of the founding partners of the Sustainable Housing Leadership Consortium (SHLC), whose mission is to spread sustainable development practices across the Indian real estate sector. In recent years, Godrej Properties has received over 300 awards and recognitions, including the Porter Prize 2019, The Most Trusted Real Estate Brand in the 2019 Brand Trust Report, Builder of the Year at the CNBC-Awaaz Real Estate Awards 2019, and The Economic Times Best Real Estate Brand 2018.

raj kapoor bunglow
raj kapoor bunglow

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *