गोदरेज सेक्युरिटिज सोल्युशन्सने त्यांची भौतिक सुरक्षा उत्पादनांची श्रेणी वाढवित ‘स्मार्ट फॉग’ आणि ‘अॅक्यूगोल्ड’ ही दोन उत्पादने बाजारात आणली I

गोदरेज सेक्युरिटिज सोल्युशन्सने त्यांची भौतिक सुरक्षा उत्पादनांची श्रेणी वाढवित ‘स्मार्ट फॉग’ आणि ‘अॅक्यूगोल्ड’ ही  दोन उत्पादने बाजारात आणली

~वित्तीय संस्था आणि दागदागिन्यांच्या व्यावसायिकांसाठी  ब्रॅंडने सिक्युर स्पेसेस ४.० मध्ये नवीनतम आणि कल्पक असे ‘स्मार्ट फॉग’ आणि ‘अॅक्यूगोल्ड’ हे उत्पादन बाजारात आणले~

भारत२१ फेब्रुवारी२०२३: गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज आणि बॉयसचा एक विभाग असलेल्या गोदरेज सेक्युरिटिज सोल्युशन्सने त्यांच्या सिक्युर स्पेसेस ४.० या कार्यक्रमामध्ये त्यांचे नवीनतम व कल्पक असे ‘स्मार्ट फॉग’ आणि ‘अॅक्यूगोल्ड’ हे उत्पादन आज बाजारात आणले.

          स्मार्टफॉग ही एक शक्तिशाली फॉगिंग सुरक्षा प्रणाली आहे, जी घुसखोरांना वाटेतच रोखण्यास सक्षम आहे; तर ‘अॅक्यूगोल्ड’ सोन्याच्या दागिन्यांना कोणतीही इजा न पोहोचवता अत्यंत अचूकपणे सोन्याची शुद्धता निर्धारित करण्यासाठी सुसज्ज आहे. या दोन्ही नवकल्पनांच्या रचना उत्पादनांची भौतिक सुरक्षा श्रेणी अजून वरच्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी आणि संस्थांमधील सुरक्षांमध्ये एक लीडर म्हणून पुढे येण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. गोदरेज सेक्युरिटिज सोल्युशन्स अशा तंत्रज्ञान आणि उत्पादनांद्वारे वित्तीयसंस्था आणि दागदागिन्यांच्या क्षेत्रात सुरक्षेसंबंधी कायापालट करण्यास उत्सुक आहे.

          ग्रामीण ग्राहकांना लक्ष्य करणाऱ्या प्रादेशिक ग्रामीण बँक शाखा आणि खासगी बँकांच्या वाढत्या उपस्थितीमुळे संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शिवाय, सोन्यांचे दागिने उत्पादन करणाऱ्या यूनिट्स मध्ये सोने आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवण्याच्या व्यवस्थेसाठी तिजोऱ्या आणि मजबूत सुरक्षित दरवाज्यांची जोरदार मागणी आहे. याशिवाय, हल्ली गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने सोनारांमध्ये उच्च दर्जाच्या तिजोरी आणि सुरक्षा दरवाज्यांमधील तांत्रिक दृष्ट्‍या प्रगत सुरक्षा प्रणालींबाबत जागरूकता निर्माण झाली आहे.

          या प्रसंगी बोलताना गोदरेज सेक्युरिटिज सोल्युशन्सचे व्यवसाय प्रमुख  श्री. पुष्कर गोखले म्हणाले, गोदरेज सेक्युरिटिज सोल्युशन्समध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सतत नवनवीन आणि प्रभावी उपाय प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही संपूर्ण भारतामध्ये भौतिक सुरक्षा उत्पादनांच्या श्रेणीतील वाढ आणि त्यांची मागणी पाहिली आहे. आम्ही संस्थांच्या सुरक्षाविषयक उत्पादनांच्या विभागामध्ये आमच्या भौतिक सुरक्षा उत्पादनांचा विस्तार करीत आहोत. सध्या आम्ही सुरुवातीच्या टप्प्यावर आहोत आणि आमच्या रोड शो आणि प्रात्यक्षिकांमध्ये मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे आम्हाला पुढील दोन वर्षांच्या काळात ५००० यूनिट्स (दोन्ही उत्पादनांसाठी) वार्षिक विक्री  आणि महसुलात २५% ची वाढ अपेक्षित आहे. ‘स्मार्ट फॉग’ आणि ‘अॅक्यूगोल्ड’ हे उत्पादन बाजारात आणून आम्ही आमच्या ग्राहकांना अत्याधुनिक, सर्वसमावेशक आणि एकात्मिक सुरक्षा उपाय प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये सुरक्षित वाटून मनःशांती मिळेल. आम्हाला खात्री आहे कीया दोन्ही नावीन्यपूर्ण आणि कल्पक उत्पादनांमुळे ब्रॅंडला यशस्वी वाटचाल करण्यास मदत होईल आणि भारताच्या वेगाने वाढणाऱ्या भौतिक सुरक्षा उत्पादनांच्या श्रेणीतील वाढीमध्ये हे दोघेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

          स्मार्ट फॉग ही भारतीय बाजारपेठेत सादर केलेली एक अशा प्रकारची पहिलीच संकल्पना आहे. हे क्रांतिकारी उत्पादन बँका आणि ज्वेलर्सच्या क्षेत्रात एकूण सुरक्षा परिसंस्थेत अतिरिक्त सुरक्षा देईल. कोणतीही तिजोरी अनधिकृतपणे उघडण्याचे प्रयत्न झाल्यास ते शोधण्यासाठी हे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करते. प्रणाली ट्रिगर करण्यासाठी  रीमोट क्लाउड आधारित अॅप्लिकेशन आणि वायरलेस तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. ट्रिगर केल्यावर स्मार्ट फॉग माणसांसाठी निरुपद्रवी मात्र दहशत निर्माण करणारे कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड ग्लायकॉलपासून बनवलेले दाट धुके उत्सर्जित करते. यामुळे समोरचे काहीही दिसत नाही आणि त्यामुळे गुन्हेगाराला थांबवता येऊन कर्मचाऱ्यांना आवश्यक पावले उचलण्यास पुरेसा वेळ मिळतो.

          अॅक्यूगोल्ड ही सर्वात प्रगत आणि अचूक सोन्याची शुद्धता चाचणी मशीन आहे. अॅक्यूगोल्ड हे अशा प्रकारे डिझाईन केले आहे की, ते दागिन्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान न करता त्यांच्यातील शुद्धतेचे प्रमाण तपासते, ज्यामुळे ते सोन्याची शुद्धता निर्धारित करणाऱ्या सर्वोच्च अचूक साधनाच्या शोधात असणाऱ्या बँका, ज्वेलर्स आणि वित्तीयसंस्था यांच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरते.

सिक्युर स्पेसेस हा गोदरेज सेक्युरिटिज सोल्युशन्सचा आजच्या बदलत्या धोक्यांच्या प्रकारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वापरकर्त्यांना अजून जास्त चांगले व सर्वोत्तम सुरक्षा उपायांकडे वळवण्यासाठी आणि त्याबाबत जागरूक करण्यासाठी चालविलेला एक उपक्रम आहे. २०२१ मधील मागील आवृत्ती बँकिंग क्षेत्राभोवती केंद्रित होती, ज्यामध्ये बँकिंग उद्योगाला त्यांच्या संस्थांच्या सुरक्षेमध्ये कसे बदल करणे आवश्यक आहे यावर चर्चा करण्यासाठी उद्योगातील दिग्गज एकत्र आले होते.

Godrej Security Solutions
Pushkar Gokhale – Business Head at Godrej Security Solutions

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *