एयु स्मॉल फ़ायनान्स बॅंक आणि फ़िनकेअर स्मॉल फ़ायनान्स बॅंकेद्वारे विलीनीकरण जाहिर I

एयु स्मॉल फ़ायनान्स बॅंक आणि फ़िनकेअर स्मॉल फ़ायनान्स बॅंकेद्वारे विलीनीकरण जाहिर: यामुळे आर्थिक समावेशनाचे एक मजबूत असे साधन निर्माण होईल 

➢   दोन  मजबूत धोरणात्मक आणि चांगल्याप्रकारे चालविल्या  जाणाऱ्या एसएफ़बी चे विलीनीकरण

➢   संपूर्ण भारतभरात रिटेल बॅंकिंची फ़्रेन्चायझी तयार करण्याकरिता दोन  भौगोलिक स्तरावर पूरक अशा संस्थांना उत्पादनांमध्ये वाढ करता येऊ शकेल म्हणून विलीनीकरण

➢   विशेषत: ठेवी, तंत्रज्ञान आणि कालांतराने स्केलवर आधारीत परिणामकारकते मध्ये समन्यवय साधला जाईल

➢   सगळ्याच स्टॉकचे विलीनीकरण ज्यामध्ये फ़िनकेअर एसएफ़बी  चा प्रत्येकी 2,000 शेअर्सकरिता एयु फ़िनकेअर एसएफ़बी चे 579 शेअर्स मिळतील

एयु स्मऑल फ़ायनान्स बॅंक लिमिटेड(“AU SFB”)चा संचालक मंडळाद्वारे आणि फ़िनकेअर स्मॉल फ़ायनान्स बॅंक लिमिटेड (“Fincare SFB”) चा संचालक मंडळाद्वारे, वेगवेगळ्या बैठकींचे आयोजन केले गेले, ज्यामध्ये एयु एसएफ़बी आणि फ़िनकेअर एसएफ़बी चे संपूर्णपणे विलीनीकरण करण्याचे मान्य करण्यात आले.   

विलीनीकरणाची योजना ही बॅंकिंग नियामक कायदा, 1949 चा विभाग 44ए अंतर्गत करण्यात आलेली असून, एयु SFB आणि फ़िनकेअर SFB चा  भागधारकांच्या आणि रिझर्व बॅंक ऑफ़ इंडियाअंतर्गत असलेल्या बॅंकिंग नियामक कायदा आणि भारतीय स्पर्धा आयोगाचा मान्यतेशी संबंधित आहे.

आवश्यक असलेल्या मान्यता मिळविल्यानंतर फ़िनकेअर एसएफ़बी हे एयु एसएफ़बी सह विलीनीकृत होईल आणि फ़िनकेअर एसएफ़बी चा भागधारकांना त्यांच्या शेअर्सचा ऐवजी एयु एसएफ़बी चे शेअर्स उपलब्ध होतील ज्याकरिताचा शेअर स्वॅप रेशो हा फ़िनकेअर एसएफ़बी द्वारे मान्य केला गेला आहे. फ़िनकेअर एसएफ़बी चे सगळे कर्मचारी हे एयु एसएफ़बी कुटुंबाचा एक भाग बनतील.

विलीनीकरणाचा अटी

एयु एसएफ़बी चा आणि फ़िनकेअर एसएफ़बी चा संचालक मंडळाद्वारे अनुक्रमे एकमेकांचा व्यवसायातील कार्यकारी पैलूंचा आणि परिणामांचा योग्य तो विचार केला आहे.

अटींनुसार फ़िनकेअर एसएफ़बी चे प्रवर्तक असलेल्या फ़िनकेअर बिझनेस सर्व्हिसेस लिमिटेड (“FBSL”) द्वारे विलीनीकरण होण्यापुर्वी भारतीय चलनानुसार 700 कोटी रूपये फ़िनकेअर एसएफ़बी ला देऊ करतील.

वॅल्युअर्स एलएलपीचे बन्सी एस.मेहता आणि  आरबीएसए व्हॅल्युएशन ॲडवायझर एलेलपीमधील, स्वतंत्र व्हॅल्युअर अनुक्रमे एयु एसएफ़बी  आणि फ़िनकेअर एसएफ़बी  द्वारे नेमण्यात आले असून, त्यांचा शिफ़ारसीनुसार शेअर एक्सचेंज रेशो ठरविण्यात आला आहे ज्याकरिताची मान्यता ही प्रत्येक संचालक मंडळाद्वारे देण्यात आलेली आहे. शेअर एक्सचेंज रेशोकरिता जेएम फ़ायनान्शीयल लिमिटेडने एयु एसएफ़बी ला फ़ेअरनेस मत दिले तर फ़िनकेअर एसएफ़बी ला फ़ेअरनेस मत हे आयआयएफ़एल सिक्युरिटीज लिमिटेडद्वारे देण्यात आले.

त्यानुसार, फ़िनकेअर एसएफ़बी चा भागधारकांना फ़िनकेअर एसएफ़बी चा 2,000 शेअर्सचा तुलनेत एयु एसएफ़बी चे 579 शेअर्स उपलब्ध होतील. विलीनीकरणानंतर अस्तित्वात असलेल्या फ़िनकेअर एसएफ़बी चा भागधारकांची ~9.9% ची भागीदारी एयु एसएफ़बी  मध्ये असेल.

ICICI सिक्युरीटीज लिमिटेड आणि अर्पवुड कॅपिटल प्रायवेट लिमिटेड हे व्यवहाराकरिता फ़िनकेअर एसएफ़बी चे आर्थिक सल्लागार होते तर अम्बित प्रायवेट लिमिटेड आणि मिरई असेट कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायवेट लिमिटेड हे एयु एसएफ़बी करिता आर्थिक सल्लागार होते. एझेडबी ॲन्ड पार्टनर्स हे एयु एसएफ़बी  चे कायदेशीर सल्लागार होते तर अनग्राम पार्टनर्स हे फ़िनकेअर एसएफ़बी  चे कायदेशीर सल्लागार होते. KPMG आणि PwC हे अनुक्रमे एयु एसएफ़बी  आणि  आणि फ़िनकेअर एसएफ़बी  करिता परिश्रम सल्लागार होते.

श्री. राजीव यादव, एम.डी आणि सीईओ फ़िनकेअर एसएफ़बी यांना विलीनीकरणानंतर एयु एसएफ़बी चे डेप्युटी सीईओ म्हणून नेमले जाईल. ते एयु एसएफ़बी चे एम.डी आणि सीईओ श्री. संजय अगरवाल यांना रिपोर्ट करतील. श्री. यादव हे एयु एसएफ़बी च्या फ़िनकेअर युनिटचे काम बघतली, ज्यामध्ये फ़िनकेअर एसएफ़बी चा जवळ जवळ सगळ्याच व्यवहारांचे काम बघितले जाईल. याशिवाय ते एकत्रितपणे एयु च्या एम.डी आणि सीईओंसह एयु एसएफ़बी चा आयटी आणि डिजिटल युनिटचे देखील काम बघतील, ज्यामुळे विलीनीकरणानंतर सहजतेने आयटी व्यवहार होऊ शकतील. आपली नवी भूमिका पार पाडते वेळी, श्री. यादव यांना एयु एसएफ़बी चा संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये देखील बोलविले जाईल.

श्री. दिव्य सेहगल, फ़िनकेअर चे नामांकित संचालक हे एयु एसएफ़बी चा संचालक मंडळामध्ये सामील होतील ज्यामुळे विलीनीकरणानंतरचा कार्यभाग हा सहज आणि सोप्यापद्धतीने पुढे नेता येऊ शकेल.

एयु एसएफ़बी  चे सध्याचे एक्झिकिटीव संचालक असलेले श्री. उत्तम टिबरवाल यांना एयु एसएफ़बी  चे एक्झिकिटीव संचालक तर असतीलच तसेच त्यांना डेप्युटी सीईओ म्हणून बढती दिली जाईल.

AU SFB merger with Fincare SFB
AU SFB merger with Fincare SFB

धोरणात्मक तर्क

हे दोन सामायीक, विकासाची इच्छा असलेल्या दोन मजबूत एसएफ़बी आहेत, ज्यांच्यामध्ये समान अधिकार, एकत्रित मूल्ये , पूरक भौगोलिक समानता आणि उत्तम उत्पादनांची साधने आहेत ज्यामुळे बॅंकिंग फ़्रेन्चायझी खऱ्या अर्थाने संपूर्ण भारत व्यापू शकेल. विलीनीकरण झालेल्या या संस्थेमध्ये 98 लाखापेक्षा अधिक ग्राहक, तसेच 43,000 कर्मचारी आणि 2,334 टच पॉईंट्स 25 राज्य आणि केंद्र शासित प्रदेश मिळू असतील.

या विलीनीकरणामुळे एयु एसएफ़बी चा पोर्टफ़ोलियोमध्ये अजून विविधतेसह,  फ़िनकेअर एसएफ़बी  चा ग्रामीण भागापर्यंतचा विकास, केंद्रित मायक्रोफ़ायनान्स, गहाण ठेवी आणि सोने तारण व्यवसायाची जोड मिळेल ज्यामुळे आर्थिकतांचे अधिकार केंद्रित होत सूक्ष्म उद्योजक आणि लहान एन्टरप्रायझेस पर्यंत पोहोचू शकतील. या विलीनीकरणामुळे फ़िनकेअर एसएफ़बी ला ग्रामीण आणि निम-शहरी विभातील अधिक चांगले नेटवर्क तयार करण्याकरिता मदत मिळेल आणि एयु एसएफ़बी चा मजबूत अशा उत्पादनांमुळे आणि डिजिटल क्षमतांमुळे ठेवी आणि अग्रस्थानी असणाऱ्या फ़ेन्चायझीजमध्ये वाढ देखील होईल.

या विलनीकरणातील लक्षणीय समन्वयामुळे ठेवी, तंत्रज्ञान आणि स्केलवर आधारीत परिणामकारकता सुधारेल आणि कालांतराने आर्थिकतेमधील महत्वाची भूमिका पार पाडली जाईल. याशिवाय दोन्ही बॅंकांना “ग्रेट प्लेस टू वर्क” प्रमाणीकरण देखी GPTW संस्थेद्वारे सातत्याने 2021 ते 2023 देण्यात आले आहे आणि म्हणून लोकांकरिता आणि संस्कृतीशी साधर्म्य हा या विलीनीकरणाचा यशा केंद्र बिंदू असणार आहे.

संभाव्य विलीकरणाबद्दल बोलताना, एयु एसएफ़बी  चे एम.डी आणि सीईओ असलेले श्री. संजय अगरवाल म्हणाले, “ दोन यशस्वी आणि उत्तम पद्धतीने कार्यरत असलेल्या तसेच आर्थिकतांचा प्रवर्तनामध्ये समान अधिकार असलेल्या एसएफ़बी  फ़ेन्चायझींना एकत्र येताना बघून मला अतीशय आनंद होतो आहे. हे फ़क्त विलीनीकरण नसून समान मूल्ये, समान ध्येय आणि भविष्याचे लक्ष्य असलेल्या दोन संस्थांचे विलीनीकरण आहे. राजीव आणि त्यांची टीम ही अनुभवी असून देशातील उत्तम MFI टीम्स पैकी एक आहे, ज्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये विविध अडचणींचा आणि आव्हानांचा सामना करत चांगला व्यवसाय आणि मजबूत तंत्रज्ञानावर आधारीत एसएफ़बी  फ़्रेन्चायझी उभी केली आहे. आम्ही फ़िनकेअरचा सगळ्याच कर्मचाऱ्यांचे एयु एसएफ़बी  कुटुंबाचा एक भाग होण्याकरिता स्वागत करतो आहोत आणि आमचा पुढील एकत्रित प्रवासाकरिता उत्सुक देखील आहोत.”

फ़िनकेअर एसएफ़बी चे एम.डी आणि सीईओ असलेले श्री. राजीव यादव म्हणाले, “ प्रमुख आर्थिकता असलेली फ़्रेन्चायझी, ग्राहकांना उपयुक्त ठरणारी उत्पादने आणि मजबूत अशा डिजिटल क्षमतांसह आमचा पाया भक्कम आहे. या संभाव्य विलीनीकरणामुळे दोन यशस्वी

संस्था उत्तम पद्धतीने कार्य करतील. आमचा ग्राहकांना या विलीनीकरणाचा नक्कीच फ़ायदा होईल, कारण यामुळे आमचे अस्तित्व अधिक वाढेल आणि उत्पादनांचा विविधतेमुळे त्यांचा विशेष गरजा देखील पूर्ण होती. या विलनीकरणामुळे एक नवा प्रवास सुरू होणार आहे ज्यामध्ये संपूर्ण भारतात विकास होण्यास मदत होईल, एयु एसएफ़बी शी हात मिळवणी केल्यामुळे संजय आणि त्यांच्या टीमचा भक्कम असा फ़्रेन्चायझी अनुभव आम्हाला मिळणार आहे, आम्हाला खात्री आहे की यामुळे जागतिक दर्जाची बॅंक मजबूत अशा आर्थिकतेसह राष्ट्रीय फ़्रेन्जायझी नक्कीच बनेल.” 

एयु एसएफ़बी चे अध्यक्ष, श्री. आर व्ही वर्मा यावेळी बोलताना म्हणाले, एयु स्मॉल फ़ायनान्स बॅंक आणि फ़िनकेअर स्मॉल फ़ायनान्स बॅंकेचा विलीनीकरणाची जाहिर घोषणाकरता आम्हाला अतीशय आनंद होतो आहे, या विलनीकरणामुळे दोन मजबूत आणि चांगल्या चालणाऱ्या आणि देखेरेख असलेल्या एसएफ़बी एकत्र येणार आहे.

या धोरणात्मक विलनीकरणामुळे आमच्या पूरक अशा भौगोलिक स्तरामध्ये वाढ होईल आणि आम्ही अशी उत्पादने ग्राहकांना देऊ शकू, ज्यामुळे खऱ्या अर्थाने आम्ही संपूर्ण भारताच्या रिटेल बॅंकिंग फ़्रेन्जायझीची निर्मीती आम्हाला करता येऊ शकेल. आम्ही आकर्षक समन्वय साधत, ठेवी, तंत्रज्ञान आणि स्केल वर आधारीत परिणामकारकतेवर भर देणार आहोत ज्यामुळे आमचा ग्राहकांना आणि भागधारकांना फ़ायदा होऊ शकेल. 

फ़िनकेअर स्मॉल फ़ायनान्स बॅंकेचे , गैर- कार्यकारी संचालक आणि पुर्वीचे संस्थापक असलेले, श्री.प्रमोद काबरा यावेळी बोलताना म्हणाले, “ दोन उत्तम बॅंकांच्या परिवर्तनात्मक विलीनीकरणाचे हे उदाहरण असून, दोन्ही बॅंकांची ओळख ही उद्योगात अग्रेसर राहाण्यासह, विकास आणि लाभदायकाची आहे. वाढत्या आलेखानुसार, एक वैविध्य पूर्णता, बाजारपेठेतील उत्तमता आणि व्यवसायिक तज्ञांचा अनुभवासह उद्योजक भावनांचे देखील विलीनीकरण होत असल्याने ग्राकांना उत्तम मूल्ये मिळतील आणि कर्मचाऱ्यांना चांगले आणि प्रगतीशील असे भविष्य उपलब्ध होईल.”

फ़िनकेअर एसएफ़बी  चे गुंतवणूकार ट्रू नॉर्थ ने विलीनीकरणाकरिता उत्साह दर्शविला. संभाव्य समन्वयाबद्दल उत्साहित असलेले, आणि ट्रू नॉर्थमधील भागीदार  श्री.दिव्य सेहगल म्हणाले, “ फ़िनकेअरचा 2010 पासूनचा प्रवास बघता अतीशय आनंद होतो आहे, दोन MFI चा विलीनीकरणाने सुरू झालेली, ही स्मॉल फ़ायनान्स बॅंक, साध्या स्मॉल फ़ायनान्स बॅंकेचा परवान्याने सुरू होते एक मोठी बॅंक बनली. भविष्यात अधिक मजबूत, मोठे आणि अभिमानास्पद संस्था बनण्याकरिता विलनीकरणांना नक्कीच मान्यता दिली जाईल”.

एयु स्मॉल फ़ायनान्स बॅंकेचे, कार्यकारी संचाल श्री. उत्तम टिबरेवाल म्हणाले, “ एयु स्मॉल फ़ायनान्स बॅंक आणि फ़िनकेअर स्मॉल फ़ायनान्स बॅंकेचे विलीनीकरण हे ग्राहकांना अधिक चांगल्या आर्थिक सेवा प्रदान करण्याचा दृष्टीकोनातून उचललेले एक महत्वाचे पाऊल आहे. दोन्ही बॅंकांची ताकद एकत्र केल्याने, आम्ही आमचा कामामध्ये विविधता घेऊन येऊ शकू, विशेषत: ग्रामीण आणि निम-शहरी विभागांमध्ये. या विलीनीकरणामुळे आर्थिकतेप्रती असलेल्या आमचा बांधिलकी मध्ये वाढ होईल आणि  अधिक चांगले आणि परिणामकारक असे बॅंकिंगचे वातावरण निर्माण होण्यास मदत मिळेल”.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

One thought on “एयु स्मॉल फ़ायनान्स बॅंक आणि फ़िनकेअर स्मॉल फ़ायनान्स बॅंकेद्वारे विलीनीकरण जाहिर I

  • November 4, 2023 at 5:21 pm
    Permalink

    Spot on with this write-up, I absolutely believe this web site needs
    far more attention. I’ll probably be back again to read more, thanks for the info!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *