वजन कमी करणे म्हणजे उपासमार नव्हे – आहारतज्ज्ञ राखी तोडणकर I

वजन कमी करणे म्हणजे उपासमार नव्हे – आहारतज्ज्ञ राखी तोडणकर

शब्दांकन श्री प्रशांत असलेकर ९३२२०४९०८३

मुंबईतील भांडुप या उपनगरात एक पब्लिक लिमिटेड कंपनी होती. तिच्यात साधारणत 500 कामगार काम करीत होते. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना कॅन्टीनचे जेवण आणि आरोग्यविषयक अनेक सुविधा पुरवत होती. तसेच नियमितपणे कामगारांची आरोग्य तपासणी करीत असे. तरीही कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या होत्या. बहुसंख्य कर्मचाऱ्यांना ब्लडप्रेशर, कोलेस्टेराल, धाप लागणे वगैरे समस्या होत्या. अनेकांचे पोट वाढले होते. त्याचा त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला होता. काहींची दृष्टी कमजोर झाली होती. या समस्यांमुळे आणि सततच्या आजारपणांमुळे रोज सरासरी दहा टक्के कर्मचारी गैरहजर असायचे. त्याचा प्रॉडक्शनवर परिणाम झालेला होता. ते घटले होते. तेव्हा कंपनीने विचार केला की नेमके काय चुकत आहे ? आपण कर्मचाऱ्यांची एवढी काळजी घेऊनही कर्मचारी सतत आजारी का पडतात ? याबाबत त्यांनी ठाण्याच्या आहारतज्ज्ञ राखी तोडणकर यांची काही कॉर्पोरेट   सेशन्स आयोजित केली. त्यांचा झालेला परिणाम बघून नंतर कामगारांचे आरोग्य सुधारण्याची जबाबदारीच राखी तोडणकर यांच्यावर सोपवली.

राखी यांनी कंपनीच्या कॅन्टीनचे निरीक्षण केले. तेथिल मेन्यू तपासला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की कॅन्टीनच्या जेवणामुळेच कर्मचाऱ्यांच्या सगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. राखी तोडणकर यांनी कामगारांचा आहारच बदलला. त्यांनी कॅन्टीन कॉन्ट्रेक्टरद्वारे कॅन्टीनमध्ये बनवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांत बदल केले. कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त नैसर्गिक, जीवनसत्त्वयुक्त आणि चरबीमुक्त आहार देणे सुरू केले. तो सात्विक आणि सकस केला. पुढे सहा महिन्यांनंतर केलेल्या सर्व्हेमध्ये सगळ्याच कामगारांच्या आरोग्यात कमालीचा फरक पडलेला दिसून आला. ही राखी तोडणकर यांच्या आहारशास्त्रातील ज्ञानाची आणि सुयोग्य सल्ल्याची कीमया होती.

Rakhee Todankar
Rakhee Todankar

आज मुंबईतील अनेक मोठ्या कंपन्या, पोलीस विभाग आणि काही सरकारी आस्थापनासुध्दा  राखी तोडणकर यांच्याकडून आहारविषयक सल्लासेवा घेतात. अनेक कंपन्या त्यांच्याकडून आपल्या कॅन्टीन्सचे कॅफेटेरिया असेसमेंट करून घेतात. त्यांची ट्रेनिंग्ज आणि सेशन्सही आयोजित करतात. मराठी व हिंदी नाट्य-चित्रपट क्षेत्रातील अनेक अभिनेते आणि राजकारणीही त्यांच्याकडून आहारविषयक सल्ला घेतात. गोपनीयतेमुळे त्यांची नावे उघड करता येत नाहीत.

हे यश राखी तोडणकर यांना मिळाले कारण त्यांनी आहारविषयक अभ्यासक्रमातच विशेष प्रावीण्य संपादन केले आहे. एका विचित्र योगायोगामुळे त्यांना डायेटीशिन या क्षेत्राची आवड निर्माण झाली. एका मध्यमवर्गीय चौकोनी परिवरात जन्मलेल्या राखी लहानपणी कराटे शिकायच्या. तेव्हा त्यांची ताकद कमी पडायची. त्यांना एका डायेटीशियनचा सल्ला घ्यावा लागला. त्या सल्लानुसार आहारात केलेल्या बदलांमुळे त्यांच्या परफार्मन्समध्ये कमालीची वाढ झाली. त्या पुढे कराटेत ब्लॅक बेल्ट विनर बनल्या. तेव्हाच त्यांनी आपण मोठेपणी डायटीशियन व्हायचे असे ठरवून टाकले. त्या ध्येयाला अनुसरूनच त्यांनी आजवर वाटचाल केली आहे. पुढे त्यांनी एसएनडीटी विद्यापीठातून फूड सायन्स आणि न्यूट्रीशन या विषयात एम. एस. सी केले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही जिम्स, वेट लॉस सेंटर्स आणि फार्मा कंपन्यांत अनुभवासाठी नोकरी केली. ती करीत असताना त्या डायेटीशियन म्हणून खासगी प्रॅक्टीसही करीत असत. श्री. राजीव तोडणकर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांच्या आणि घरच्यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी डायटीशियन आणि न्यूट्रीशन स्पेशालिस्ट म्हणून स्वतंत्र व्यवयासाला सुरूवात केली. आज ठाण्यात वृंदावन सोसायटी येथे त्यांचे स्वत:चे ‘ राखी तोडणकर – हेल्थ मी ‘ या नावाने क्लिनिक आहे. तसेच त्या बांद्र्यालाही एका ठिकाणी कन्सल्टींग करतात.

चंगळवादी जीवनशैली, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खाल्ले जाणारे जंक आणि इन्स्टंट फूड, स्पर्धात्मक जगात करिअर आणि पैशाच्या मागे लागून शरीराचे केलेले नुकसान, सॉफ्टवेअर  क्षेत्रातील अनियमित कामकाज, मद्यपानाला मिळालेली प्रतिष्ठा यामुळे सगळ्या समाजाचेच आरोग्य सध्या बिघडले आहे. त्यावर सुनियोजित आहार-विहार हाच खरा खात्रीचा उपाय आहे. तो दीर्घकाळ आणि नियमितपणे करण्याचा विषय आहे. पण आता इन्स्टंट फूडप्रमाणेच आरोग्यही ताबडतोब, कमी श्रमांनी मिळावे असे लोकांना वाटते. त्यामुळेच सध्या वेट लॉस हा एक परवलीचा शब्द उदयाला आला आहे. मध्यमवर्गीय लोकांत फिटनेसचा विचार वाढतोय. विशेषत: महिलांना स्लीम होण्याची तीव्र इच्छा असते. पण त्यात पुरेसे गांभीर्य vनसते. काहीवेळा ते एक खूळ ठरते. त्या इच्छेपोटी महिला आणि पुरूषही कुणाचे तरी ऐकून-वाचून आपल्या आहाराबाबत काहीही उलटसुलट प्रयोग करीत असतात. काहींच्या मते वेट लॉस म्हणजे स्वत:ची उपासमार करून घेणे किंवा नो कॅलरी फूड खाणे. डायट चिवडा वगैरे प्रकार सध्या बोकाळले आहेत. जिम जॉइन  करणे, मशिनवर धावणे, कॅलरीज बर्न करणे वगैरे निरनिराळे प्रकार याबाबतीत केले जातात.

rakhee tadankar photo no. 1
rakhee tadankar photo no. 1

आहारतज्ज्ञ राखी तोडणकर यांच्या मते वेट लॉस म्हणजे उपासमार नव्हे. वजन हा एकूण आरोग्याचा एक भाग आहे. शरीर हे अनेक घटकांचे बनलेले असते. केवळ वेट लॉस एवढे मर्यादित ध्येय डोक्यात ठेवून आहारात विचित्र बदल केल्याने शरीराचे इतर भाग म्हणजे हाडे, स्नायू कमजोर होऊ शकतात. हिमोग्लोबिन कमी होऊ शकते. चेहऱ्यावरचे तेज कमी होते. सुरकुत्या येतात. तज्ज्ञ डायटीशियनच्या सल्ल्यानुसारच वजन कमी करण्याचा प्रयत्न केला पाहीजे.

आहारतज्ज्ञ राखी तोडणकर यांच्याकडे शेकडो लोक आपल्या आरोग्यविषयक समस्या विचारायला येतात. त्या आपल्या क्लायंटसच्या जीवनशैलीचा पूर्ण अभ्यास करतात. त्या आपल्या क्लायंटस् ना कुठल्याही प्रकारच्या पावडरी, बाह्य औषधे, फूड सप्लिमेंटस् देत नाहीत. उलट आहारबदलातून नैसर्गिकरित्या मिळणारे घटकद्रव्ये कशी वाढतील यावर त्यांचा भर असतो. त्या क्लायंटस् ना ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये खायचा सल्ला देतात. तसेच प्रत्येकाने रोज एक तासभर चालले पाहीजे असा त्यांचा आग्रह असतो. त्यांच्या मते चालणे हा एक परिपूर्ण व्यायाम आहे. सर्व वयोगटातील लोक तो करू शकतात. हल्ली काही रेडीमेड पौष्टीक पदार्थ उदा. भाजणीचे पीठ, डिंकाचे-पंचखाद्याचे लाडू, कोकम सरबते मिळू लागली आहेत. राखी तोडणकर म्हणतात की सर्व बाजारू गोष्टींत त्या दीर्घकाळ टिकाव्यात म्हणून प्रिझर्व्हेटीव्हज घातलेले असतात. त्यामुळे त्या गोष्टी टाळाव्यात. या गोष्टी घरी बनवलेल्याच उत्तम असतात. ताकसुध्दा घरी बनवलेलेच प्यावे. राखी तोडणकर या रेनबो फूड म्हणजे विविध रंगांच्या भाज्या किंवा सलाड खाण्यावर आणि ऋतुमानानुसार मिळणाऱ्या भाज्या आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. त्यांचा सल्ला आहे की राजगिरा, ज्वारीच्या घरी बनवलेल्या लाह्या हे एक उत्तम डायट फूड असू शकते.

एक आहारतज्ज्ञ म्हणून राखी तोडणकर यांनी त्यांच्या व्यवसायात चांगले यश संपादन केले आहे. त्यांचा क्लायंटबेस विस्तृत आणि समाजातील सर्व थरांत पसरलेला आहे. राखी तोडणकर यांनी वेळोवेळी विविध मासिके आणि नियतकालिकांत आहारविषयक लेखन केले आहे. ई टीव्हीच्या हेल्दी रेसिपी कार्यक्रमातही त्यांनी अनेकदा दर्शकांशी संवाद साधला आहे. ठाण्यातील परिणिता 2.0 आनलाईन ब्युटी पिजेटमध्ये त्या स्पर्धकांच्या आहारविषयक मार्गदर्शक होत्या. अर्थसंकेत उद्योग मासिकाकडून 2020 साली  ‘ बेस्ट हेल्थ अँड  वेलनेस स्टार्टअप – फिमेल ‘ साठी त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

त्यांचे पती राजीव तोडणकर हे एक आयटी प्रोफेशनल आहेत. राखी यांच्या यशात कुटुंबियांचा मोठा वाटा आहे. राखी तोडणकर यांना पर्यटनाची आवड आहे. देश आणि विदेशांत त्यांनी भरपूर भ्रमंती केलेली आहे. भविष्यात आपल्या क्लिनिकमध्ये उत्तम प्रशिक्षित स्टाफची नियुक्ती करून व्यवसाय वाढवण्याचा त्यांचा मानस आहे.

राखी तोडणकर यांच्या मते पोटावरील चरबी वाढू न देणे हेच उत्तम आरोग्याचे खरे लक्षण आहे. कोणत्याही व्यक्तीचे आरोग्य उत्तम राखण्यात आहाराचा वाटा ऐंशी टक्के आणि व्यायामाचा वीस टक्के असतो. आहार योग्य असेल तर एकूण आरोग्य आपोआपच उत्तम राहते. तुमच्या आहारविषयक कोणत्याही समस्येबाबत मार्गदर्शन करायला त्या नेहमीच तत्पर असतात.

       संपर्क – राखी तोडणकर – हेल्दी मी —– 97028 73530

            Email – rakhee.09@gmail.com

Website – www.rakheetodankar.com

Facebook – https//www.facebook.com/NutritionistRakhee

                                Instagram –  https://instagram.com/nutritionist_rakhee?igshid=qkd3v9d1vwo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *