ग्लेनमार्ककडून ट्रॅस्टूझूमॅब उपचारातील किमतीत घट, भारतातील एचइआर २ पॉझिटिव्ह स्तन कर्करोग रुग्णांसाठी उपचार अधिक किफायती आणि सुलभ होणार I

ग्लेनमार्ककडून ट्रॅस्टूझूमॅब उपचारातील किमतीत घटभारतातील एचइआर २ पॉझिटिव्ह स्तन कर्करोग रुग्णांसाठी उपचार अधिक किफायती आणि सुलभ होणार


• ट्रूमॅब या ब्रँड नावाने मार्केटिंग होणाऱ्या औषधाची नवी किंमत प्रत्येक ४४० मिग्रॅ बाटलीसाठी १५,७४९ रुपये असेल
•  किमतीत ही घट केल्यामुळे ट्रूमॅबची प्रत्येक मिग्रॅमागे किंमत ३५ रुपयांपर्यंत कमी होईल, त्यामुळे देशातील एचइआर २ पॉझिटिव्ह स्तन कर्करोगावरील ते सर्वात किफायती औषध ठरेल

मुंबई जून २०२३ : एकात्मिक, संशोधन आधारित, जागतिक औषध कंपनी असलेल्या ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्सने आज एचइआर २ पॉझिटिव्ह स्तन कर्करोग रुग्णांसाठी भारतात ट्रूमॅब (Trumab) या ब्रँड नावाने मार्केटिंग होणाऱ्या ट्रॅस्टूझूमॅब (Trastuzumab) या औषधाच्या किमतीत घट करण्याची घोषणा केली. ट्रूमॅबच्या प्रत्येक ४४० मिग्रॅ बाटलीची नवी किंमत १५,७४९ रुपये असेल. त्यामुळे ते देशातील सर्वात किफायती उपलब्ध पर्याय ठरेल.

ट्रॅस्टूझूमॅब हे मोनोक्लोनल अँटिबॉडी असून एचइआर २ पॉझिटिव्ह स्तन कर्करोगाचा तो अनेक वर्षांपासून मुख्य उपचार राहिला आहे. भारतातील अनेक रुग्णांसाठी ट्रॅस्टूझूमॅबची किंमत हा एक महत्त्वाचा अडथळा ठरत आला आहे. बाजारात उपलब्ध असलेले ट्रॅस्टूझूमॅबच्या बहुंताश ब्रँडची किंमत ही प्रत्येक ४४० मिग्रॅ बाटलीसाठी ४०,००० ते ५४,००० दरम्यान आहे. रुग्णाला किमान १८ सायकल (१२ महिने) उपचार करावे लागतात, हे लक्षात घेतले तर उपचारांचा सरासरी खर्च हा स्तनाच्या कर्करोगाच्या आरंभी ४ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंत जातो आणि पुढच्या/मेटास्टॅटिक केसेसमध्ये तो ५ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. अनेक कुटुंबांसाठी, विशेषतः भारतात जिथे औषधोपचारांच्या एकूण खर्चापैकी ५२ टक्के हा खिशातून करावा लागतो, हा एक मोठा आर्थिक बोजा ठरू शकतो.

ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्स लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि इंडिया फार्म्यूलेशन्सचे प्रमुख आलोक मलिक म्हणालेग्लेनमार्कमध्ये आमचा हा विश्वास आहे, की प्रत्येकाला दर्जेदार औषधोपचार मिळायला हवेत, मग त्यांची आर्थिक स्थिती कशीही असो. ट्रूमॅब या आमच्या जीवरक्षक औषधाची किंमत कमी करणे हे त्या दिशेने टाकलेले पाऊल होय. यामुळे केवळ सुलभता वाढेल, असे नाही तर भारतातील स्वखर्चाने उपचार करणाऱ्या ७५ टक्क्यापेक्षा अधिक एचइआर २ पॉझिटिव्ह स्तन कर्करोग रुग्णांना एक आशा मिळेल.”


एचइआर २ पॉझिटिव्ह स्तन कर्करोग : स्तनांच्या सर्व पेशींमध्ये ह्यूमन एपिडर्मल ग्रोथ फॅक्टर रिसेप्टर २, ज्यांना सर्वसामान्यपणे एचइआर २ म्हटले जाते, अतिरिक्त प्रमाणात असून त्यांची चाचणी केली जाते. एचइआर २ प्रोटीन हे पेशींची वाढ कशी व्हावी आणि विभाजन कसे व्हावे यावर नियंत्रण ठेवणारे रिसेप्टर असतात. जेव्हा स्तनांच्या कोशिकांमध्ये अतिरिक्त एचइआर २ रिसेप्टर्स असतात (ओव्हरएक्सप्रेशन) तेव्हा स्तनातील पेशी अत्यंत झपाट्याने वाढू शकतात. ही वाढ अनियंत्रित होऊन ट्यूमर बनू शकते. एचइआर २ पॉझिटिव्ह अशी निश्चिती झालेला स्तनांचा कर्करोग झपाट्याने वाढतो, पसरतो (मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर) आणि पुन्हा येतो. हा प्रोटीन कर्करोगाच्या पेशींना वाढण्यास व पसरण्यास मदत करतात. ट्रॅस्टूझूमॅब हे 

एचइआर २ प्रोटीनना जखडून ठेवून त्यांच्या कार्याला प्रतिबंध करते.

भारतातील एचइआर २ पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरचा प्रसार : ग्लोबोकॉन २०२० च्या अहवालानुसार, स्तनाचा कर्करोग हा भारतातील सर्वांत सर्वसामान्यपणे निदान होणारा कर्करोग असून सर्व प्रकरणांमध्ये त्याचे प्रमाण १३.५ टक्के आहे. दरवर्षी अंदाजे १.७८ लाख नवीन प्रकरणांचे निदान केले जाते आणि ५ वर्षांमध्ये ४.५ लाख प्रकरणे आढळली आहेत. भारतीय लोकांमध्ये एचइआर २ पॉझिटिव्ह असण्याचे प्रमाण २६ टक्के ते ५० टक्के दरम्यान आहे.

Glenmark
Glenmark

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *