महापुरुष बालदीप मंडळ परळ I अर्थसंकेत यशोगाथा I महाराष्ट्र गौरव I

महापुरुष बालदीप मंडळ हि परळ सारख्या कामगार विभागात दिवंगत शिवसेना कार्यसम्राट आमदार कै विठ्ठल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली परळ सारख्या कामगार विभागात स्थापन झालेली ४० वर्षांहुन जुनी नोंदणीकृत सेवाभावी संस्था.

उपक्रम,सामाजिक कार्यक्रम व स्पर्धा –
संस्थेतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हास्तरीय बालचित्रकाला स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा , नेत्र चिकित्सा शिबीर, विनामूल्य आरोग्य शिबीर , क्रीडा स्पर्धा , विनामूल्य पुस्तक पेढी , विध्यार्थी दत्तक योजना असे अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम सातत्याने संस्था राबवत आहे.

ग्लोबल युगातील संधी व मार्गदर्शन – गेल्या काही वर्षांपासून आजची सामाजिक परिस्थिती, तरुणांची मानसिकता , तंत्रज्ञानामुळे होणारे समाजातील बदल यावर सखोल अभ्यास करून संस्थेने गेल्या काही वर्षांपासू , १०वी /१२वी नंतर काय ? , मोबाईल पासून दूर कसे राहावे , खेळाचे महत्व व युवा वर्ग, पालकांसाठी माझं काही चुकतंय का ? कार्यशाळा , चुकलेल्या वाटा व योग्य दिशा अशा अनेक मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले .

मराठी माणसांनी तरुणांनी व्यवसाय करावा यासाठी व्यापक मोहीम त्याचबरोबर समाजातील म्हणजेच मराठी कुटुंबामध्ये व्यवसायाप्रती असलेली अनास्था दूर करण्यासाठी व्यापक कार्यक्रम संस्थेतर्फे हाती घेण्यात आले , मराठी मुलांनी बदलत्या आधुनिक व डिजिटल युगातील तांत्रिक ज्ञान आत्मसात करून स्वतः चा व्यवसाय करावा व नोकरी करणारे नाही तर रोजगार देणारे व्हावे व आपली आपल्या कुटुंबाची व पर्यायांनी समाजाची प्रगती साध्य करावी यासाठी विविध विनामूल्य कार्यशाळा व कोर्सेसचे सातत्याने आयोजन केले, यामध्ये विनामूल्य CCTV दुरुस्ती , दुरुस्ती , सोशल मीडिया मार्केटिंग कोर्से, असे १ महिना कालावधीचे सखोल ज्ञान देणारे कोर्स चे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येते.

ग्लोबल जगातील संधी ओळखून त्याप्रमाणे तरुणांनी विशेषतः मराठी तरुणांनी व्यवसाय करावा यासाठी मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले … या सर्व उपक्रम व कार्यशाळांमुळे आजच्या या लॉकडाऊनच्या कठीण परिस्थितीत सकारात्मक परिणाम दिसून आला—- या उपक्रमात सहभागी झालेल्या अनेक विध्यार्थ्यानी स्वतःचे व्यवसाय सुरू केले व आपल्या पायावर न डगमगता उभे राहिले हि खूप मोठी जमेची बाजू प्रकर्षाने दिसून आली …

या सर्व उपक्रमामुळे महापुरुष बालदीप मंडळ हे उधोजक घडविणारी सामाजिक संस्था म्हणून नावा रूपाला आली हे विशेष अशाच प्रकारे विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाबरोबरच व्यवसायाभिमुख उपक्रम संस्थेतर्फे यापुढे हि राबविण्यात येतील

महापुरुष बालदीप मंडळ हि परळ Contact – 9820971766

Maha Gaurav 2021
Maha Gaurav 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book Back cover
Whatsapp Marketing Back cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *