नव्या पोर्टल मधील त्रुटींमुळे अनेकांच्या टॅक्स रिफंड रकमेत घट I Income Tax refund issue I

नव्या पोर्टल मधील त्रुटींमुळे अनेकांच्या टॅक्स रिफंड रकमेत घट

आपणास २०-२१ करिता फाईल केलेल्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये क्लेम केलेल्या रकमेहून कमी रिफंड रक्कम मिळाली आहे का? बऱ्याच टॅक्स पेयर च्या बाबतीत असे घडले असून त्यांच्या बँक खात्यात क्लेम केलेल्या रकमेहून कमी रक्कम जमा झाली आहे. कारण नव्या इन्कम टॅक्स पोर्टल ने फॉर्म २६ AS मधील उपलब्ध टॅक्स क्रेडिट हिशोबात घेतले नसल्याने हे घडले आहे.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून आलेल्या इन्टिमेशन नोटीस ने याकरिता दिलेले कारण यात स्पष्ट केले आहे. फॉर्म २६ AS मध्ये TDS ची पार्शिअल अमाऊंट नसल्याने हे घडल्याचे सांगितले.

क्लेम केलेली टीडीएस रक्कम हि फॉर्म २६ AS मधील रकमेइतकी आहे. फॉर्म २६ AS हा इन्कम टॅक्स पोर्टल वरून डाउनलोड केला जाऊ शकतो. प्रोसेसिंग सॉफ्टवेअर व पोर्टल वर उपलब्ध डेटा यामध्ये ताळमेळ नसल्याचे दिसून आले आहे.

टॅक्स२वीन.इन चे मुख्य कार्यकारी अधिकारी, अभिषेक सोनी म्हणाले, अश्या १० हुन अधिक केसेस निदर्शनास आल्या आहेत जिथे क्लेम केलेल्या रकमेहून कमी रक्कम टॅक्स पेयर ना मिळाली आहे.

ITR फीलिन्ग करताना TDS रक्कम अपडेट केली जात असूनही इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ITR चे प्रोसेसिंग आधी उपलब्ध डेटा वरून घेत आहेत. व फॉर्म 26AS मधील माहिती पहिली जात नाही.

जसे . एका पॅन नंबर करिता आर्थिक वर्षात एकूण TDS रक्कम रु.४८,३३१/- आहे . तर TDS क्रेडिट रु. ३८,६२४/- आहे. टॅक्स क्रेडिट रु. ९७०७/- हे टॅक्स डिपार्टमेंट ने रिजेक्ट केले आहे.

जर आपल्याला क्लेम केलेल्या रकमेहून कमी रिफंड रक्कम मिळाली असल्यास या परिस्थितीत करदात्यांना सेक्शन १५४ नुसार, रेक्टिफिकेशन रिक्वेस्ट पाठवून उर्वरित टॅक्स रिफंड क्लेम करावा लागेल.

Income Tax portal
Income Tax portal

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Dr Surabhi Vaidya
Dr Surabhi Vaidya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *