सकल देशांतर्गत उत्पन्नात ८.४% ची वाढ I GDP 8.4% I

दुसऱ्या तिमाहीत भारताच्या सकल देशांतर्गत उत्पन्नात ८.४% ची वाढ

दुसऱ्या कोरोना व्हायरस लाटेनंतर देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्नात ८.४% ची वाढ झाली असून मागील वर्षी आर्थिक व्यवहार घटल्याने हे प्रमाण ७% हुन खाली होते. लॉक डाउन चे निर्बंध उठविल्याने व वॅक्सीन घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्था पुनरुजीवीत झाली. २०२१ आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पन्न रु. ३५,७३,४५१/- करोड असून २०२० आर्थिक वर्षात ते रु. ३५,६१,५३०/- करोड होते.

आर्थिक व्यवहार पुन्हा पूर्ववत झाल्याचे या तिमाहीत विविध सूचक मापदंडाद्वारे सिद्ध झाले आहे. रेल्वे मालवाहतूक ,सिमेंट उत्पादन, वीज मागणी, पोर्ट कार्गो, इ वे बिल, जीएसटी , टोल कलेक्शन या मापदंडाद्वारे हे लक्षात आले आहे.

गुंतवणुकीतील वाढ हि ग्रॉस फिक्स कॅपिटल फॉर्मेशन या मापदंडाद्वारे मोजली जाते. त्यात ११% ची वाढ झाली आहे. शासकीय खर्च ८.७% ने वाढला आहे.
FMCG कंपन्यांनी किमतीत वाढ केली असून इनपुट कॉस्ट मध्ये वाढ झाली आहे. क्रूड ऑइल किमतीत देखील मोठी वाढ झाली आहे.

RBI च्या मते, महागाई ५.३% ने वाढेल असा अंदाज आहे. खाद्यतेलाच्या व क्रूड ऑइल च्या किमतीत वाढ हि चिंतेची बाब असल्याचे RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले. सौथ आफ्रिके मध्ये सापडलेल्या नव्या व्हायरस मुळे लॉक डाउन होण्याची शक्यता त्यांनी दर्शवली.

gdp nov 2021
gdp nov 2021

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Dr Surabhi Vaidya
Dr Surabhi Vaidya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *