वास्तू रविराज I सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६ I
अर्थसंकेत प्रस्तुत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड उपक्रमात झालेल्या सार्वजनिक व्होटिंग मध्ये बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड म्हणून ‘वास्तू रविराजची निवड लोकांनी केली आहे.

डॉ. रविराज अहिरराव आणि डॉ. मंजुश्री अहिरराव यांनी स्थापन केलेली ‘वास्तुरविराज’ ही भारतातील एक अग्रगण्य वास्तुशास्त्र सल्लागार आणि प्रशिक्षण संस्था आहे.
या संस्थेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक वास्तूंसाठी कोणतीही तोडफोड न करता शास्त्रोक्त वास्तु उपाय सुचवणे. पारंपारिक वास्तुज्ञान आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घालत त्यांनी जगभरातील हजारो लोकांना समृद्धीचा मार्ग दाखवला आहे.
केवळ सल्लागारच नव्हे, तर एक नामांकित ‘ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ म्हणूनही ही संस्था प्रसिद्ध आहे. आज या मराठी संस्थेने आपल्या अचूक मार्गदर्शनामुळे जगभरात आपला ठसा उमटवला आहे
🗳️ सार्वजनिक मतदानाद्वारे ब्रँड निवड
या उपक्रमात ७ दिवसांची पारदर्शक सार्वजनिक मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. अर्थसंकेतच्या व्हॉट्सअॅप चॅनेलद्वारे घेतलेल्या मतदानात ब्रँड्सची निवड तीन प्रमुख श्रेणींमध्ये करण्यात आली.
💡 संकल्पनेमागील उद्दिष्ट
‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’ या उपक्रमाची सुरुवात २०१७ मध्ये करण्यात आली. मराठी उद्योजकांनी आपली ब्रँड ओळख जागतिक स्तरावर निर्माण करावी, ब्रँड व्हॅल्यूचे महत्त्व समजावे आणि लोकशाही पद्धतीने ग्राहकांच्या मतांवर आधारित ब्रँड निवड व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
यंदा Single Click Voting System सुरू करून प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सर्वांसाठी सुलभ करण्यात आली. ग्राहक, गुंतवणूकदार, विक्रेते आणि सर्वसामान्य नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी होता येते.
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स

