ई एस जी अहवाल: केवळ मोजमाप हा कृतीला पर्याय आहे का ?

ई एस जी अहवाल: केवळ मोजमाप हा कृतीला पर्याय आहे का ?

गायत्री दिवेचा, सीएसआर प्रमुख- गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड अँड असोसिएट कंपनीज

सारांशईएसजी (एन्वायरमेंट, सोशल, गवर्नन्स- पर्यावरण, सामाजिक, प्रशासन) अहवालांमध्ये शाश्वततेच्या मानकांची जास्त गर्दी आणि त्यावरच अति भर दिसून येत आहे.  ईएसजीबाबतची वचनबद्धता आणि प्रगती खूप साऱ्या सर्वसमावेशक अशा निर्देशकांच्या आधाराने दाखवणे हा ईएसजी अनिवार्यतेवर उपाय नाही, किंबहुना त्यामुळे फार थोडी प्रगती होते.

            या दोन दशकांमध्ये काय बदल झाला? २००३ साली तीन वैश्विक रिपोर्टिंग मानके होती. आता २०२३ मध्ये ‘वैश्विक’ मानके दुप्पट झाली आहेत. भारत आणि यूरोप मधील अनुक्रमे बीआरएसआर (BRSR) आणि इआरएसआर (ERSR) सारख्या प्रदेश विशिष्ट मानकांपासून जीआरइएसबी (GRESB) सारख्या उद्योग-विशिष्ट मापदंडांपर्यंत आहेत. ही मानके कंपनीची ईएसजी कामगिरी मोजतात. संस्था या मानकांना किती प्रमाणात आणि कसे न्याय देतात यावर गुंतवणूकदार त्यांचे गुंतवणुकीबाबतचे अधिकाधिक निर्णय घेत आहेत.  गुंतवणूकदार उच्च ईएसजी गुणांक असणाऱ्या संस्थांमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत आणि ज्या संस्था ईएसजी गुणांकामध्ये उत्तम कामगिरी दाखवू शकत नाहीत त्यापासून गुंतवणूकदार दूर जात आहेत.    

            याचा परिणाम म्हणून, जगभरातील मोठ्या व्यावसायिक संस्थांमध्ये शाश्वततेचे अहवाल आणि त्याचे ऐच्छिक प्रकटिकरण महत्त्वपूर्ण झाले आहे. वास्तविक परिणामकारक कृतींपेक्षाही उत्तरदायित्व दाखवणारे हे अहवालच अग्रक्रम मिळवत आहेत. 

            एक समस्या अशी आहे की, वेगवेगळे जागतिक आणि राष्ट्रीय शाश्वतता अहवाल मानके आणि निर्देशांक नेहमीच एकमेकांना पूरक असतात असे नाही. त्यांच्यामध्ये भिन्नता ही आहे आणि काही एकमेकांच्या मध्ये देखील येतात आणि ही मानके भारतातील बीआरएसआर (BRSR) साठी आवश्यक ८० हून अधिक निर्देशके, डाऊ जोन्स सस्टेनिबिलिटी इंडेक्स मधील २०० पेक्षा जास्त निर्देशक आणि सीडिपी अंतर्गत ९० पेक्षा जास्त घटकांच्या दरम्यान कोठेही असू शकतात. हे कंपन्यांसाठी अहवाल जाहीर करताना त्रासदायक ठरतात.

            एमएससीआय ने अलीकडेच या ट्रेंड वर एक आलेखासह शोधनिबंध प्रकाशित केला, ज्याने प्रश्न उपस्थित केला आहे की ईएसजी मापनासाठी एवढी ‘वैश्विक’ मानके का गरजेची आहेत.

Picture 1

            काही ईएसजी मानके खरोखरच वैश्विक आहेत. जसे की, स्कोप एक आणि दोन द्वारे दरवर्षी उत्सर्जित होणाऱ्या कार्बनडायऑक्साइडचे प्रमाण; तर काही संपूर्ण उद्योगक्षेत्रात, सर्व भौगोलिक क्षेत्रांमध्ये आणि मूल्य साखळी मध्ये संबंधित नसतात.

            ईएसजी मानके आणि चौकट एक जबाबदार व्यवसाय म्हणजे नेमके काय आहे यासंबंधी व्यापक अपेक्षा निर्माण करण्याकडे झुकतात. पण हे लक्षात घेतले पाहिजे की, अहवाल हा परिणामाला पर्याय होऊ शकत नाही.

‘गेटिंग ग्रीन डन’ या पुस्तकाचे लेखक श्री. ऑडेन शेंडलर यांनी हे अतिशय सुंदर व समर्पक मांडले आहे. ते लिहितात, “पर्यावरण किंवा सामाजिक परिणाम सुधारण्याच्या साधनांऐवजी मोजमाप आणि अहवाल हेच अंतिम ध्येय झाले आहेत. हे असे आहे की, एखाद्या व्यक्तीने डायटिंग करण्याचे ठरविले . त्यासाठी त्याने अगदी नियमितपणे कॅलरिज मोजणे चालू केले पण त्या व्यक्तीने आहार मात्र न बदलता तोच घेत राहिला.”

पर्यावरणास हानिकारक अशा पद्धतींमध्ये गुंतलेली एखादी संस्था त्यांच्या भागधारकांना केवळ दाखविण्यासाठी शाश्वत मानकांद्वारे त्यांचे मार्ग बदलून  दाखवू शकते. 

याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे, भारतात औद्योगिक क्षेत्रांमध्ये पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा वापराची पातळी राज्यानुसार आणि कामकाजाच्या आकारानुसार मोठ्या प्रमाणात भिन्न आहेत. एखाद्या संस्थेच्या महत्वाकांक्षा, हेतु आणि नूतनीकरण क्षमतेकडे वळण्याची तयारी याचा ते पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा वापर म्हणून अहवाल देत असलेल्या गोष्टींशी काहीही संबंध नसतो. मानके आणि चौकट कोणत्याही प्रकारे या वास्तविकतेचा विचार करत नाहीत.

सर्व मानक संस्थांसाठी मजबूत, तुलना करण्यायोग्य आणि (भौगोलिक व क्षेत्र विशिष्ट) म्हणजे योग्य संबंधित मानके आणि ईएसजी मानकांसाठी आणि अहवालासाठी वैश्विक चौकटीकडे वाटचाल करणे यांना उच्च प्राधान्य असले पाहिजे. केवळ वचनबद्धता म्हणून नाही तर कृती आणि प्रगतीसाठी  आंतरराष्ट्रीय मानकांबरोबर पूरक व संरेखित होणे ही काळाची गरज आहे. आता, ईएसजी अहवाल कथा ही झाडांसाठी लाकूड पाहण्यास अक्षम अशी काहीशी आहे. 

Gayatri Divecha Godrej
Gayatri Divecha Godrej

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *