मूर्तिकार श्री मनोहर बागवे यांना जीवनगौरव पुरस्कार I

मूर्तिकार श्री मनोहर बागवे यांना जीवनगौरव पुरस्कार I

अर्थसंकेत उद्योजकांची दिवाळी पहाट कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विकोचे श्री संजीव पेंढारकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष श्री शंतनू भडकमकर, अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे व सौ रचना लचके बागवे यांच्या हस्ते मूर्तिकार श्री मनोहर बागवे यांचा इंजिनिअर डॉ. माधवराव भिडे जीवन गौरव २०२२ पुरस्काराने सन्मान करण्यात आला I

मसुरे गाव – मालवण तालुका .. ह्या गावच्या गडघेरा वाडीतील बाळकृष्ण जयराम बागवे मुंबईला आले आणि १९४१ मध्ये श्री गणेश मूर्ती बनवण्यास प्रारंभ केला. त्यांची तीनही मुले शशिकांत, मनोहर आणि सदानंद यांनी त्यांचा वारसा ‘ बागवे आर्ट’ च्या रूपाने चालू ठेवला आहे. त्यातील मूर्तिकार मनोहर बागवे यांनी मूर्तिकलेच्या क्षेत्रात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. वडीलांपासून घरगुती गणेश मूर्ती नेत असलेले भाविक आज ८० वर्षे झाली तरी त्यांच्याकडूनच मूर्ती नेत आहेत, यातच त्यांनी कलेमुळे जपलेले आपुलकीचे नाते प्रकर्षाने दिसून येते. विशेष म्हणजे त्यांनी घरगुती मूर्ती बंद न करता त्याबरोबरच सार्वजनिक गणेश मूर्तीही बनवल्या आणि त्यामध्ये सुद्धा एक वेगळेपण दाखवून ‘बागवे आर्ट’ ह्या नावाचा दबदबा निर्माण केला. त्यांच्या सार्वजनिक गणेशमूर्ती बनवण्याची सुरुवात ‘लालबागच्या राजा’ पासून झाली. १९९० ते १९९६ पर्यंत त्यांनी लालबागचा राजा बनवला. या बरोबरच गणेशगल्ली, डोंगरी, खेतवाडी ६वी गल्ली. १०वी गल्ली, मध्य भायखळा, उमरखाडी, प्रगती सेवा मंडळ, घाटकोपर, भाईंदर आणि अश्या अनेक मंडळांसाठी वेगळ्या आशयसंपन्न गणेश मूर्ती त्यांनी बनवल्या.

२०१० मध्ये सुरुवात झालेला ‘मुंबईचा राजा ‘ हा सन्मान प्रथम त्यांच्याच ४ उंदरांच्या रथात बसलेल्या गणेशगल्लीतील सार्वजनिक गणेशमूर्तीला मिळाला. लागोपाठ २०१३ मध्ये त्यांनी बनवलेल्या डोंगरीच्या राजाला हा सन्मान पुन्हा मिळाला. २०१६ मध्ये लोकमान्य टिळकांच्या १२५ व्या पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्र शासनाने जिल्हानिहाय गणेश स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या ‘ न भूतो न भविष्यति ‘ अश्या एकमेव स्पर्धेत बागवे आर्टच्या मनोहर बागवे ह्यांना संपूर्ण बृहन्मुंबई जिल्ह्यातून शिवडीच्या राजासाठी सर्वोत्कृष्ट मूर्तिकार म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस ह्यांच्या हस्ते शासनाचा पुरस्कार मिळाला. त्याच वर्षी UIOSA ऑस्ट्रेलिया ह्या मंडळासाठी १५ फुटाची मूर्ती घडवली. पुन्हा २०२२ मध्ये त्याच मंडळासाठी मुंबईतूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून परदेशात जाणारी सर्वात मोठी २४ फुटाची गणेश मूर्ती ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा मान त्यांच्या बागवे आर्टला मिळाला..

असे अनेक सन्मान पुरस्कार मिळाले तरी जमिनीवर पाय ठेवून त्यांची कला गगनाला गवसणी घालत आहे. याबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पोतदार, देसाई, समीर चंदा, नितीश रॉय अश्या अनेक कला दिग्दर्शकांबरोबर कामे केली आहेत. याबरोबरच त्यांनी चित्रकलेचा, संगीताचा, कवितेचा छंदही जोपासला आहे. अजूनही सांगायची विशेष गोष्ट म्हणजे त्यांना पुरातन लेणी, मंदिरे, ऐतिहासिक गड-किल्ले अश्या सांस्कृतिक वारस्यामध्ये रुची असून त्याचा गाढा अभ्यास आहे. त्यासाठी या कलेतून वेळ काढून जुन्या कलेची वैशिष्ट्ये शोधण्यासाठी ते भ्रमंती करत असतात. यासाठी अभ्यास दौरेही आयोजित करतात. हे सगळे करत असताना ह्या कलेच्या प्रवासात ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊनच वाटचाल करत आहेत.

मूर्तिकार श्री मनोहर बागवे संपर्क – ९९६९७४३९०२

शनिवार २९ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘अर्थसंकेत उद्योजकांची दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी मंदीर नाट्यगृह, दादर पश्चिम, मुंबई येथे सकाळी ७ ते १० या वेळेत कार्यक्रम पार पडला.

अर्थसंकेत – मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक वर्तमानपत्र – https://arthsanket.in/

अर्थसंकेत संपर्क – http://Wa.me/+918082349822

Mahohar Bagwe
Mahohar Bagwe

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *