महिंद्रा लॉजिस्टिक्स D&I उमेदवारांच्या कौशल्य वाढीवर करणार लक्ष केंद्रित I

महिंद्रा लॉजिस्टिक्स D&I उमेदवारांच्या कौशल्य वाढीवर करणार लक्ष केंद्रित

~ LGBTQIA समुदायातील व्यक्तींच्या कौशल्य विकास आणि प्रशिक्षणासाठी अनेक वर्षांच्या गुंतवणुकीसाठी बांधील

 ~ उपक्रमाचा एक भाग म्हणून चालू आर्थिक वर्षात २०० D&I उमेदवारांची विविध कौशल्ये विकसित करण्यासाठी GTT फाउंडेशनशी सहयोग

मुंबई, ३० जून २०२२: भारतातील सर्वात मोठ्या इंटीग्रेटेड ३पीएल (थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स) सुविधा पुरवठादारांपैकी एक असलेल्या महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेड (एमएलएल) ने विविधांगी आणि सर्वसमावेशक (D&I) धोरणाप्रती असलेली बांधिलकी दर्शवताना चालू आर्थिक वर्षासाठी वैविध्यपूर्ण नियुक्तीचे प्रमाण १५% इतके असल्याचे उघड केले. कंपनीने देशभरातली २०० व्यक्तींना विविध कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करण्यासाठी GTT फाउंडेशनशी सहयोग करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यायोगे आजवर दुर्लक्षित राहिलेल्या कौशल्याचा लाभ घेत वाढता सहभाग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय वैविध्याचा उत्सव साजरा करणाऱ्या एकतेची भावना स्वीकारून D&I नियुक्तीला बळकटी दिली जाईल.

कंपनीला LGBTQIA समुदायाकडून सातत्याने आपल्या आणि व्यवसाय भागीदारांच्या विविध कामकाजांसाठी  भरती करण्यात अभिमान वाटत आहे. २०० व्यक्तींना प्रशिक्षित करण्यासाठी एमएलएल GTT फाउंडेशनशी सहयोग करत आहे. त्यामध्ये LGBTQIA समुदायातील व्यक्तींचा समावेश आहे. कंपनी समाजातील व्यक्तींना डिजिटल मार्केटिंग, डेटा एंट्री, टेलि कॉलिंग, त्यांची सॉफ्ट स्किल्स वाढवणे यासारख्या कौशल्यांचे प्रशिक्षण देईल.

महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  श्री. रामप्रवीण स्वामिनाथन म्हणाले, “आम्ही LGBTQIA समुदायातील व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती आणि सर्वसाधारण पार्श्वभूमीच्या महिलांच्या कौशल्य विकास आणि प्रशिक्षणाकरता अनेक वर्षांच्या गुंतवणुकीसाठी वचनबद्ध आहोत. २०० व्यक्तींना प्रशिक्षित करण्यासाठी जीटीटी फाउंडेशनसह आमचा सहयोग हा या वचनबद्धतेचा पहिला टप्पा आहे. आम्ही प्रतिभा जोडण्याच्या आमच्या धोरणांद्वारे विविधतेला प्रोत्साहन आणि महत्त्व देत राहू आणि आमचे कर्मचारी, सहयोगी, व्यावसायिक भागीदार आणि ग्राहक यांच्यामार्फत या समुदायांमध्ये विविध कौशल्ये विकसित करू.”

जीटीटी फाऊंडेशनच्या विश्वस्त डॉ. उमा गणेश म्हणाल्या, “जीटीटी फाउंडेशन उपेक्षित समुदायांसोबत काम करत आहे ज्यामुळे त्यांना रोजगार आणि शाश्वत उपजीविका निर्माण करण्यात मदत होईल. या अनुषंगाने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, तेलंगणा, हरियाणा, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशमधील एलजीबीटीक्यू समुदाय, दिव्यांग व्यक्ती आणि सर्वसाधारण पार्श्वभूमीतून आलेल्या महिला यांच्यासाठी रोजगारक्षमता प्रशिक्षण वाढवण्यासाठी महिंद्रा लॉजिस्टिकसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. २०० कुटुंबांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या या मदतीबद्दल आम्ही महिंद्रा लॉजिस्टिकचे आभार मानतो.”

आपल्या पाच वर्षांच्या रोडमॅपशी सुसंगत कंपनीने सक्रियपणे वेगवेगळ्या दिव्यांगांना रोजगार दिला आहे आणि कर्मचार्‍यांसाठी संवेदनशीलता सत्रे आयोजित केली आहेत. दिव्यांगांना नियुक्त करण्याच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी पायाभूत सुविधा ऑडिट केले आहेत आणि त्यांच्या कामकाजात सुलभतेसाठी त्यानुसार कार्य केले आहे. V.E.E.R (वेटरन एम्प्लॉयमेंट, एंगेजमेंट अँड रिटेन्शन) कार्यक्रम अंतर्गत माजी सैनिकांच्या ३ बॅचमध्ये एमएलएलने JCOS/NCOS, कर्नल या पदावरील अधिकारी आणि माजी सैनिक नियुक्त केले आहेत.

विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्रात लिंग विविधता हे एक आव्हान आहे. ही दरी भरून काढण्यासाठी महिंद्रा लॉजिस्टिक्स ‘उडान’ हा एक विशेष उपक्रम सुरू करणाऱ्या क्षेत्रातील अग्रणी आहे. उडान हा दुसरे  करिअर (कमबॅक) कार्यक्रम आणि सर्व स्तरांवर, कार्ये आणि विभागांमध्ये महिलांसाठी दुसरा करिअर इंटर्नशिप कार्यक्रम आहे. उडान कार्यक्रमांतर्गत ज्या महिलांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या त्यापैकी काहींना पूर्णवेळ रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Mahindra Logistics
Mahindra Logistics

About Mahindra Logistics

Mahindra Logistics Limited (MLL) is an integrated third-party logistics (3PL) service provider, specializing in supply chain management and enterprise mobility. MLL serves over 300+ corporate customers in 500+ clients and operating locations across various industries like Automobile, Engineering, Consumer Goods and E-commerce. The Company pursues an “asset-light” business model, providing customised and technology enabled solutions that span across the supply chain and mobility of enterprises.

For more information, visit www.mahindralogistics.com 

About Mahindra

Founded in 1945, the Mahindra Group is one of the largest and most admired multinational federation of companies with 260,000 employees in over 100 countries. It enjoys a leadership position in farm equipment, utility vehicles, information technology and financial services in India and is the world’s largest tractor company by volume. It has a strong presence in renewable energy, agriculture, logistics, hospitality, and real estate. The Mahindra Group has a clear focus on leading ESG globally, enabling rural prosperity and enhancing urban living, with a goal to drive positive change in the lives of communities and stakeholders to enable them to Rise. Learn more about Mahindra on www.mahindra.com  / Twitter and Facebook: @MahindraRise/. For updates subscribe to https://www.mahindra.com/news-room

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe
Avadhut sathe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *