अर्थसंकेत प्रस्तुत ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६’ कार्यक्रम उत्साहात संपन्न !

अर्थसंकेत प्रस्तुत ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६’ कार्यक्रम उत्साहात संपन्न !

ब्रँड बनण्यासाठी सातत्य व संयम अत्यावश्यक – प्रदीप लोखंडे

मराठी माणसाने जगभर ब्रँड नेला पाहिजे – एग्नेलोराजेश अथायडे

व्यवसायात कंप्लायन्स पाळणे अत्यावश्यक – डॉ. अविनाश फडके

‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड (MahaBrand)’ हा अर्थसंकेत प्रस्तुत एक भव्य आणि प्रतिष्ठित बिझनेस सन्मान सोहळा असून, महाराष्ट्रातील विश्वासार्ह आणि लोकप्रिय ब्रँड्सचा गौरव याद्वारे करण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योग, स्टार्टअप्स आणि कौटुंबिक व्यवसायांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी, ग्राहकांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण गुणवत्तेबद्दल सन्मानित करण्यात आले. उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रँड्सना ट्रॉफी आणि गौरव पत्रिका देऊन सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या ब्रँडची प्रतिष्ठा आणि ओळख अधिक दृढ झाली. हा सोहळा केवळ पुरस्कार वितरण नसून, महाराष्ट्रातील उद्योजकता, ब्रँड बिल्डिंग आणि ग्राहकांच्या विश्वासाचा उत्सव ठरला.

महाराष्ट्रातील विविध भागातील विविध व्यवसायातील ब्रँड्सना सार्वजनिक मतदान प्रक्रियेद्वारे लोकांनी दिलेल्या मतांनुसार विविध श्रेणींमध्ये सत्कार करण्यात आला. सात दिवस अर्थसंकेतच्या व्हाट्सऍप चॅनेल वर घेण्यात आलेल्या या मतदानात तीन श्रेणींमध्ये प्रत्येक ब्रँडला मतदान करण्यात आले. १. मोस्ट पॉप्युलर ब्रँड २. मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड ३. बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड.

मोस्ट पॉप्युलर ब्रँड श्रेणीमध्ये – विको लॅबोरेटोरी, पितांबरी, योजक फूड्स, अंग्रेजी ढाबा, खो गो, देव मसाले यांची निवड जनतेने केली.

मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड श्रेणीमध्ये – एम ई पी एल, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट, ऍडमार्क मल्टिव्हेंचर्स यांची निवड जनतेने केली.

बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड श्रेणीमध्ये – छत्रपती शिवाजी’ज क्रिएटिव्ह सोल्युशन्स, फिनशॅक, जनसेवा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी ली., वास्तू रविराज, हिंदुस्थान को-ऑप क्रेडिट सोसायटी ली. यांची निवड जनतेने केली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एजिल्स डायग्नॉस्टिक्सचे डॉ. अविनाश फडके, रूरल रिलेशन्सचे श्री. प्रदीप लोखंडे, सेंट अँजेलोज ग्रुपचे श्री. एग्नेलोराजेश अथायडे, येस बँकेचे उपाध्यक्ष श्री. दीपक शर्मा व जी एस महानगर बँकच्या चेअरपर्सन गीतांजली शेळके व अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय नाही, असे मत अमित बागवे यांनी मांडले. दीपक शर्मा यांनी लघु उद्योजकांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. जी एस महानगर बँकेच्या गीतांजली शेळके यांनी महिलांनी स्वतःचे घर विकत घ्यावे यासाठी बँकेतर्फे विशेष कर्ज योजना राबवत असल्याचे सांगितले.

डॉ. अविनाश फडके यांनी २०० कोटींचा ब्रँड ५० कोटीला कसा विकत घेतला याचा किस्सा सांगितला. अथायडे यांनी कोणताही व्यवसाय उधारीवर करणे टाळा असा संदेश दिला तर प्रदीप लोखंडे यांनी ब्रँड बनण्यासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याचे मार्गदर्शन उपस्थित उद्योजकांना केले.

आयकॉनिक ब्रँड पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. आयकॉनिक ब्रँड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने ‘याश्त कन्सल्टन्ट प्रायव्हेट लिमिटेड’चा व चौगुले विद्यालय डोंबिवली यांचा सन्मान करण्यात आला. आयकॉनिक स्टार्ट अप ब्रँड पुरस्काराने ‘स्मिताज सिलेक्शन स्वामींनी’ व आयकॉनिक सायन्स कोचिंग ब्रँड ऑफ मुंबई पुरस्काराने ‘शिव सायन्स क्लासेस’चा सन्मान करण्यात आला.

आपण जेव्हा ब्रँड हा शब्द बोलतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर मोठमोठी नावं येतात, जसे कि, आय फोन, मर्सिडीज, रोल्स रॉयस, रोलेक्स. भारतीय ब्रँड म्हटले कि टाटा, बिर्ला अशी नावं समोर येतात. परंतु, मराठी उद्योजकांचे सुद्धा जगप्रसिद्ध ब्रँड आहेत, पण ते हवे तसे समाजमनावर बिंबवले गेले नाहीत. या सगळ्याचा विचार करून २०१७ साली महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड उपक्रमाची सुरुवात अर्थसंकेतचे संस्थापक अमित बागवे यांनी केली. या उपक्रमाच्या माध्यमातून मराठी उद्योजकांच्या ब्रँडसाठी लोकशाही पद्धतीने सार्वजनिकरित्या मतदान घेण्याची सुरुवात झाली.

तीन श्रेणी ठेवण्याचे उद्दिष्ट हे होते कि, सर्वसामान्य जनता एखाद्या ब्रँडला कोणत्या नजरेने बघते हे त्यातून कळते व त्या व्यवसायाला जर सुधारणा करणे आवश्यक असेल तर, त्याप्रमाणे सुधारणा करता येईल. २०१७ ते २०१९ मतदान प्रक्रिया वेबसाईट द्वारे राबवली जात होती. यात २०२६ मध्ये बदल करून सिंगल क्लिक व्होटिंग सुरु केले. ज्यामुळे प्रत्येकाला व्होटिंग प्रक्रिया बघता येते. कोणत्या ब्रँडला, कोणत्या श्रेणीत किती मते मिळाली आहेत वगैरे. मग ग्राहक असो, गुंतवणूकदार असो, व्हेंडर असो कि नातेवाईक आणि मित्रपरिवार असो सगळे या मतदानात सहभागी होऊ शकतात आणि मतदान बघूही शकतात.

Mahabrand 2026 News
Mahabrand 2026 News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *