सिडको एक्झिबिशन सेंटर ,वाशी येथे केंद्रिय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांचे हस्ते महाइंडेक्स मेगा इंडस्ट्रीयल एक्झिबिशनचे उदघाटन I

सिडको एक्झिबिशन सेंटर ,वाशी येथे केंद्रिय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांचे हस्ते महाइंडेक्स मेगा इंडस्ट्रीयल एक्झिबिशनचे उदघाटन

माननीय कपिल पाटील केंद्रीय राज्य मंत्री, पंचायतराज, भारत सरकार यांनी आज महा इंडेक्स या मेगा इंडस्ट्रीयल एकाझीबिशनचे उदघाटन केले व उद्योजकांच्या स्टॉल्स ना त्यांनी भेट दिली ,ते आपल्या भाषणात त्यांनी महाइंडेक्स च्या भव्य आयोजनाबद्दल कोसिआ व टीम चे कौतुक केले ते पुढे म्हणाले की एनएमआरएल, रक्षा मंत्रालय तसेच एल अँड टी डिफेन्स सारख्या खाजगी क्षेत्रातील विविध कंपन्यांना एकत्र आणून लघु उद्योगांसाठी महाइंडेक्सरुपी महाकुंभ भरवला हे फार मोठे काम आहे असे त्यांनी विशेषतः नमूद केले ते पुढे म्हणाले की भारतीय लघु व इतर उद्योगांच्या वृद्धीसाठी अशा महाइंडेक्स सारख्या प्रदर्शना ची अत्यंत गरज आहे अशी माननीय पंतप्रधानांची इच्छा आहे. देशाच्या वृद्धीसाठी गावा गावांमध्ये रोजगार निर्मिती व्हायला हवी. कोसीआच्या ने इतर क्षेत्रातील उद्योगांसाठी केलेल्या या प्रयत्नांमुळे छोट्या छोट्या गावांमध्ये रोजगार निर्मिती होण्यास नक्कीच मदत होईल.

कोसीआने अनेक कंपन्याना एकत्र आणून एक क्लस्टर करावे व एकत्र जमीन घ्या आणि तिथे अख्खी इंडस्ट्रियल टाउनशिप बनवा त्याच्यासाठी त्यांनी भूमीवर्ल्ड या भिवंडीतील पायभूत क्षेत्रातील उद्योग समूहाचे पण कौतुक केले ते म्हणाले की पहिल्याच वर्षी तुम्ही एवढे चांगले प्रदर्शन केलं आहे पुढील वर्षी तुम्हाला नक्कीच याच्या ती चौपट ते पाचपट मोठे आयोजन करायला लागेल आणि एमएसएमई ला अशा प्रदर्शनांमुळे नक्कीच फायदे होतील.

आज महाइंडेक्स ला इंडोनेशिया, मलेशिया व मॉरिशस ह्या तीन देशांच्या राजदूतांनी व प्रतिनिधींनी भेट दिली

उदघाटन समयी सिडबी चे महाव्यवस्थापक श्री अंजनीकुमार श्रीवास्तव व लार्सन आणि टूब्रो डिफेन्स चे वरिष्ठ उपाध्यक्ष अमित कुळकर्णी तसेच कोसीआ चे अध्यक्ष श्री संदीप पारीख व टिसाच्या। अध्यक्षा सुजाता सोपारकर उपस्थित होते

Maha index inauguration
Maha index inauguration

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *