तुमच्या स्प्लिट एयर कंन्डिशनरच्या उत्तम आणि इष्टतम थंडाव्यासाठी सूचना I

तुमच्या स्प्लिट एयर कंन्डिशनरच्या उत्तम आणि इष्टतम थंडाव्यासाठी सूचना

तुमच्या स्प्लिट एयर कंन्डिशनरच्या उत्तम आणि इष्टतम थंडाव्यासाठी सूचना – श्री. अर्णब बागची, वरिष्ठ उपाध्यक्ष- सेवा, गोदरेज अप्लायन्सेस

उन्हाळा आला आहे आणि तुमचा ए.सी. एखाद्या जादू प्रमाणे काम करण्याची वेळ आली आहे. अनेक प्रदेशांमध्ये वाढत्या प्रचंड तापमानामुळे उष्णतेपासून आराम मिळविण्यासाठी एअर कन्डिशनर हे घरातील आवश्यक उपकरण झाले आहे. अशा कडक उन्हाळ्यामध्ये तुम्हाला आरामदायी आणि सक्रिय राहण्यासाठी एका कार्यक्षम व सुस्थितीतील एअर कन्डिशनरची गरज आहे. मात्र तुमचा ए. सी. या उन्हाळ्यात अशी सर्वोत्तम सेवा देण्यासाठी तयार आहे का याची खात्री कशी कराल?

      तर, अधिकृत तंत्रज्ञांकडून तुमच्या ए.सी. साठी आधीच प्रतिबंधात्मक देखभालीची सेवा घेणे अत्यंत श्रेयस्कर आहे. त्याशिवाय तुमच्या एअर कन्डिशनरमधून सर्वोत्तकृष्ट कामगिरी मिळावी यासाठी घरीच काही सुचनांचे अनुसरण करा.

तुमच्या ए.सी. चे थंडावा देण्याचे काम इष्टतम व सुयोग्य व्हावे यासाठी गोदरेज अप्लायन्सेसच्या सेवा विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. अर्णब बागची यांच्याकडून काही सूचना:

एखादे व्यावसायिक ए.सी. देखभाल सेवा तुम्हाला पुढील गोष्टी देऊ शकते:

· स्प्लिट एसीच्या घराच्या आतील यूनिटची देखभाल- तुमच्या ए.सी. मध्ये कोणतीही समस्या नसली तरीही वर्षातून दोनदा ही सेवा घ्या. तंत्रज्ञ ए.सी. एअर फिल्टर आणि व्हेंट्स मध्ये साचलेली सर्व धूळ साफ करेल आणि इष्टतम थंडावा सुनिश्चित करण्यासाठी कूलंट प्रेशर (शीतलकाचा दाब) तपासेल. याव्यतिरिक्त, तुम्ही ओल्या सेवेची (वेट सर्व्हिस) निवड करू शकता; ज्यामध्ये हात पोहोचण्यास कठीण असलेल्या कॉइल्सच्या आतील भगत स्वच्छ करण्यासाठी वॉटर जेट पंपसह घरच्या आतील युनिटला स्वच्छ करणे समाविष्ट आहे. धूळ किंवा कोणत्याही बाहेरील कणांमुळे पाणी गळती होऊ शकते त्यामुळे या देखभाल सेवेच्या दरम्यान ड्रेनपाइप स्वच्छ केले जाते.

· स्प्लिट ए.सी.च्या घराच्या बाहेरील युनिटची देखभाल- तुमच्या ए. सी.चे दीर्घायुष्य सुनिश्चित करण्यासाठी ए.सी. मधून बाहेर फेकल्या जाणाऱ्या हवेच्या प्रवाहात अडथळा आणणारी धूळ काढून टाकण्यासाठी दर सहा महिन्यातून एकदा घराच्या बाहेरील युनिटची व्यवस्थित व्यावसायिकपणे स्वच्छता करण्याचा सल्ला दिला जातो. जर ही देखभाल वेळेवर केली गेली नाही तर ते सिस्टमला ताण पडतो, त्याची कार्यक्षमता कमी होते, वीजेचा वापर वाढतो आणि ए.सी चे आयुष्य कमी होते.

· कोणतीही खराबी दिसल्यास त्वरित दुरुस्त करा- भेग, गंजलेला किंवा तुटलेला भाग यांसारखी कोणतीही खराबी किंवा नुकसान दिसल्यास केवळ अधिकृत सेवा तंत्रज्ञांकडून त्याची त्वरित दुरुस्ती करून घ्या. ऑनलाइन उपाय योजना शोधून ते घरीच साफ करण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नका किंवा कोणत्याही प्रकारच्या फसवेगिरीला बळी पडू नका. त्यामुळे अधिक नुकसान होऊ शकते.

· कोणत्याही प्रकारच्या गळतीची समस्या ठीक करून घ्या- अनेक ग्राहकांना घरातील एसी युनिटमधून पाणी गळतीचा अनुभव येतो. त्यामुळे घराचे सौन्दर्य बिघडते. ए.सी. च्या खाली प्लग पॉइंट असल्यास इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट होऊ शकते. तुम्हाला ही चिंता जाणवल्यावर पुढील कोणतेही नुकसान टाळण्यासाठी समस्येचे निदान करून ती दुरुस्त करण्यासाठी व्यावसायिक तंत्रज्ञांना तत्काळ बोलावून त्यांची सेवा घ्या. तुम्हाला या समस्येचा त्रास होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही ए.सी. मधील पाणी गळतीविरोधी तंत्रज्ञानासह असलेले स्प्लिट ए.सी. हे नवीनतम तंत्रज्ञान निवडून या चिंतेवर कायमस्वरूपी उपाय मिळवू शकता.

याशिवाय, तुमच्या ए.सी. चे कामकाज सुरळीत चालावे यासाठी काही घरगुती सूचना:

· नियमितपणे ए.सी. डस्ट फिल्टर स्वच्छ करा- उन्हाळा अगदी फार कडक असताना तुम्ही ए.सी. चा एअर फिल्टर आठवड्यातून एकदा स्वच्छ केला पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये धूळ, फायबर इत्यादी अडकून राहणार नाही. घरच्या आतील युनिट मधील एअर फिल्टर सहजपणे काढून स्वच्छ करता येऊ शकते. नळाच्या पाण्याने धुऊन ते कोरडे करून पुन्हा बसविता येते. असे केल्याने जास्तीत जास्त कूलिंग क्षमता आणि कार्यक्षमतेसाठी हवेचा अबाधित प्रवाह येत राहील. तुम्ही यूव्ही कूल (UVCool) तंत्रज्ञान आणि नॅनो कोटेड अॅंटी व्हायरल फिल्टरसह अतिरिक्त स्वच्छता देखील निवडू शकता’ जे खोलीतील हवा निर्जंतुक करण्यास मदत करते.

· थेट सूर्यकिरणांना दूर ठेवा आणि खिडक्या बंद ठेवा- सूर्यप्रकाशामुळे कन्डेन्सर युनिटवर ताण येतो आणि ए.सी.ची झीज वाढते. पडदे ओढून सूर्यप्रकाश रोखणे लक्षात ठेवा आणि खिडक्या किंवा दरवाजे उघडे ठेऊन ए.सी. चालवू नका.

· योग्य तापमान सेट करणे- योग्य प्रमाणात थंडावा मिळवण्यासाठी तुमचा ए.सी. २४० सेल्सिअसवर चालवणे उत्तम. त्यामुळे ते कमी ऊर्जा खर्च करेल. रात्री झोपताना टायमर वापरण्याची देखील शिफारस केली जाते. शिवाय पंचतारांकित एअर कन्डिशनर निवडणे सर्वोत्तम, कारण ते दीर्घकाळापर्यंत अधिक ऊर्जा वाचवू शकते.

· घराबाहेरील युनिट अडवू नका- बाहेरच्या युनिटला नेहमी हवेशीर असणे आवश्यक आहे. काहीही समोर ठेवून त्याला अडवू नका.

· सावधगिरीचा इशारा- व्होल्टेज चढ उतार होत असल्यास किंवा इलेक्ट्रिक वायरिंग खराब झाल्यास ए.सी. चालवू नका. ए.सी. चालू असताना लहान मुलांवर नेहमी लक्ष ठेवा. ए.सी. स्वच्छ करण्यासाठी त्यावर पाणी शिंपडू नका कारण त्यामुळे विजेचा धक्का लागू शकतो किंवा ए.सी. बिघडू शकतो.

तुमचे वीज बिल वाचवून तुमच्या आरोग्याचे रक्षण करताना संपूर्ण उन्हाळ्यात थंडावा मिळवून आनंद घेण्यासाठी या शिफारसींचे अनुसरण करा.

Godre j AC
Godre j AC

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *