गोदरेज इंटेरियोचे भारतातील शिक्षण क्षेत्रासाठी आवश्यक फर्निचर उत्पादने वाढवण्याचे लक्ष्य

गोदरेज इंटेरियोचे भारतातील शिक्षण क्षेत्रासाठी आवश्यक फर्निचर उत्पादने वाढवण्याचे लक्ष्य

~ सध्या देशातील १६,००० शैक्षणिक संस्थांना सेवा
 

मुंबई ऑक्टोबर २०२३ – गोदरेज अँड बॉयस या गोदरेज समूहाच्या प्रमुख कंपनीचा गोदरेज इंटेरियो हा ब्रँड भारतातील घरगुती आणि संस्थात्मक फर्निचर क्षेत्रात कार्यरत असून शिक्षण क्षेत्रात विस्तार करण्याची योजना कंपनीने जाहीर केली आहे.

स्थापनेपासून आतापर्यंत गोदरेज इंटेरियोने १६,००० शैक्षणिक संस्थांच्या फर्निचरच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण केल्या आहेत. आर्थिक वर्ष २३ मध्ये कंपनीने शैक्षणिक फर्निचर क्षेत्रात सुमारे १०० टक्क विकास साध्य केला आहे. भारत सरकारने २९ जुलै २०२० रोजी जाहीर केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाशी हा विकास सुसंगत आहे. प्राथमिक शिक्षण आणि सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर भर देणारे हे धोरण देशातील तरुणाईच्या उज्ज्वल भविष्याला दिशा देणारे आहे.

या शैक्षणिक क्रांतीसाठी योगदान देण्याच्या हेतूने गोदरेज इंटेरियोने तेलंगणाआंध्र प्रदेशओरिसा आणि जम्मू आणि काश्मीर सरकारशी आर्थिक वर्ष २०२३ मध्ये २००,००० शालेय फर्निचर पुरवण्यासाठी सहकार्य केले आहे. हा ब्रँड शैक्षणिक फर्निचर क्षेत्रासाठी सर्वसमावेशक आणि संकल्पना ते जुळणीपर्यंतच्या सुविधेसह फर्निचर पुरवण्यासाठी कार्यरत आहे. त्याशिवाय गोदरेजची १०० टक्के देशांतर्गत बनवलेली उत्पादने सरकारच्या आत्मनिर्भर भारत धोरणासाठी महत्त्वाचे योगदान देतात. त्यामुळे देशातील स्थानिक पातळीवर फर्निचरचे सुटे भाग बनवणाऱ्या यंत्रणेलाही चालना मिळते.

गोदरेज इंटेरियोच्या विक्री आणि विपणन (बीटुबी) विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष समीर जोशी म्हणाले, शिक्षणात जगाच्या भविष्याला आकार देण्याची क्षमता असते. देशातील साक्षरतेचा दर वाढत असू २०११ मधील ७३ टक्क्यांवरून २०२२ मध्ये ७७.७ टक्क्यांवर गेला आहे. देशात सध्या २५० दशलक्ष विद्यार्थी शिक्षण घेत असून याबाबतीत भारताने इतर देशांना मागे टाकले आहे. भारतातील शैक्षणिक बाजारपेठ आर्थिक वर्ष २५ पर्यंत २२५ अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज आहे. सध्याच्या शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी शिक्षणाच्या नाविन्यपूर्ण पद्धतींची गरज आहे. अशाप्रकारची शैक्षणिक यंत्रणा परिपूर्ण करण्यात योग्य पद्धतीने तयार केलेल्या फर्निचरची भूमिका महत्त्वाची आहे. गोदरेज इंटेरियोमध्ये शैक्षणिक क्षेत्रासाठी संस्थात्मक फर्निचर बनवण्यावर विशेष भर दिला जात असून त्याद्वारे पुढच्या पिढीच्या शिक्षण घेण्याचा अनुभव उंचावण्यास मदत होईल. आर्थिक वर्ष २५ पर्यंत आम्ही शैक्षणिक बाजारपेठेतील ३० टक्के वाटा मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Educational Furniture Godrej Interio
Educational Furniture Godrej Interio

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *