गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या पहिल्या बहुमजली माझगाव न्यायालय इमारतीच्या विकासात योगदान I

~कंपनीने अवघ्या २४  महिन्यांत न्यायालयाच्या इमारतीची एमईपी कामे करण्यासाठी केला पीडब्ल्यूडी सोबत सहयोग 

~प्रकल्पांच्या यशस्वी आणि वेळेवर वितरणाच्या विक्रमासह आर्थिक वर्ष २४ मध्ये व्यवसाय १५% नी वाढण्याची योजना

मुंबई, १२ जून २०२३: गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसने त्यांची व्यवसाय शाखा गोदरेज इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्सने मुंबईतील नवीन माझगाव कोर्ट टॉवरसाठी एमईपी कामे यशस्वीरित्या पूर्ण केली असल्याचे जाहीर केले. या इमारतीत २१ दंडाधिकारी न्यायालये आणि २१ सत्र न्यायालये असतील. यात बॅलार्ड इस्टेटमधील तीन दंडाधिकारी न्यायालये नवीन जागेत स्थलांतरित केली जातील. भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारीचा कसा फायदा होऊ शकतो हे गोदरेज आणि बॉयसने पीडब्ल्यूडी सोबत भागीदारीत केलेल्या या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीतून दिसून येते. 

न्यू माझगाव न्यायालयाची इमारत ही मुंबईतील पहिली बहुमजली उच्च न्यायालयाची इमारत आहे. ही इमारत १७ मजली असून त्यात ४६ कोर्ट हॉल आहेत आणि फायर अलार्म, सीसीटीव्ही आणि सेंट्रलाइज्ड एअर कंडिशनिंगसह प्रगत सुविधांनी सुसज्ज आहे. मेकॅनिकल, HVAC, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, सीसीटीव्ही सह अग्निशमन आणि फायर अलार्म सिस्टीमचा समावेश असलेल्या एमईपी कामांची ठरवून दिलेल्या वेळेत गोदरेज एमईपीची विनाअडथळा अंमलबजावणी झाली आहे. यातून अचूक आणि कार्यक्षमतेसह जटिल पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी असलेली कंपनीची अतुलनीय बांधिलकी अधोरेखित होते.

या प्रकल्पावर भाष्य करताना, गोदरेज इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्सच्या एमईपी व्यवसायाचे एव्हीपी आणि व्यवसाय प्रमुख प्रवीण रावूल म्हणाले, “न्यायालयीन कार्यवाही सुलभपणे होईल हे सुनिश्चित करत  नवीन माझगाव न्यायालयाच्या इमारतीच्या विकासासाठी जागतिक दर्जाच्या एमईपी सेवा दिल्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही सुव्यवस्थित नियोजन, प्रभावी संसाधन व्यवस्थापन आणि कोणत्याही अनपेक्षित आव्हानांना वेगाने जुळवून घेऊन प्रकल्पांच्या वेळेवर अंमलबजावणीला प्राधान्य देतो. वैशिष्ट्यपूर्ण शाश्वत आणि अभियांत्रिकी उपायांसह भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्राच्या वाढ आणि विकासात योगदान देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. १४  वैविध्यपूर्ण व्यवसायांसह एक समूह म्हणून, गोदरेज आणि बॉयसमधील व्यवसायांमधील टर्नकी सोल्यूशन्सचा समावेश असलेल्या एकात्मिक प्रकल्प अंमलबजावणीचा आम्हाला फायदा आहे.”

व्यवसायाने आर्थिक वर्ष २४ मध्ये १५% वार्षिक वाढीचे लक्ष्य ठेवलेले असताना गोदरेज एमईपीचा वेळेवर प्रकल्प वितरणाचा प्रभावी ट्रॅक रेकॉर्ड आश्वासक भविष्याचा टप्पा गाठत आहे.

godrej & boyce
godrej & boyce

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *