मुंबई, कोलकाता आणि दिल्लीतील दुर्गा पुजा मंडळे गोदरेज एयर मॅटिकसह होणार प्रसन्न I

मुंबई, कोलकाता आणि दिल्लीतील दुर्गा पुजा मंडळे गोदरेज एयर मॅटिकसह होणार प्रसन्न

मुंबई, 6 ऑक्टोबर २०२२ – गोदरेज एयर, या घरगुती वापरासाठी, बाथरूम तसेच कारसाठी विविध सुगुंध बनवणाऱ्या भारतातील आघाडीच्या ब्रँडने कोलकाता, मुंबई आणि दिल्लीतील दुर्गा पूजा मंडळांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी सुगंधांची नवी श्रेणी तयार केली आहे. ब्रँडने या मंडळांमध्ये फ्रॅगरन्स झोन्स तयार केले असून त्यासाठी एयर मॅटिक हा सुगंध पसरवणारा भारतातील पहिला ऑटोमॅटिक डिफ्युजर वापरण्यात आला आहे. कोलकातामध्ये युनेस्कोच्या हेरिटेज मस्ट- व्हिजिट कोलकाता २०२२ लिस्टसह विविध मंडळांमध्ये हे झोन्स तयार करण्यात आले असून त्याशिवाय मॅडॉक्स, देशोप्रियो पार्क आणि शिव मंदिर यांचा समावेश आहे. मुंबईमध्ये पवई आणि दुर्गा बारी समाज मंदिर या शहरातील सर्वात जुन्या मंडळांपैकी एका मंडळात उभारण्यात आलेल्या फ्रेशनेस झोन्सनी भक्तांचे स्वागत केले. दिल्लीतील सर्वात मोठ्या मंडळांपैकी एक समजल्या जाणाऱ्या सीआर पार्कमध्ये उभारण्यातआलेल्या फ्रॅगरन्स झोनने भक्तांचे मन प्रसन्न केले.

महामारीमध्ये सार्वजनिक उत्सव साजरे करता आले नव्हते, मात्र यंदा दुर्गा पुजा मंडळांला भेट देणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मंडळात उभारण्यात आलेल्या फ्रेशनेस झोन्समुळे तिथले वातावरण प्रसन्न होऊन भक्तांसाठी देवीचे दर्शन आणखी अविस्मरणीय ठरत होते. या कल्पक संकल्पनेखेरीज गोदरेज एयरद्वारे १ ते ५ ऑक्टोबर २०२२ दरम्यान या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेल्या उत्पादनांवर सवलत दिली जात असून परिणामी ५ दशलक्षांपेक्षा जास्त लोकांनी ब्रँडशी संपर्क साधला. त्याशिवाय मंडळांना भेट देणाऱ्यांन डिजिटल पातळीवर डिस्काउंट कुपनही देण्यात आले.

या ग्राहकाभिमुख उपक्रमाविषयी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचे (जीसीपीएल) प्रमुख विपणन अधिकारी सोमश्री बोस अवस्थी म्हणाले, ‘दुर्गा पूजा हा वर्षातला सर्वात खास काळ असतो, जेव्हा लोक त्यांच्या घराबाहेर पडून उत्सवात भाग घेतात. ग्राहकाभिमुख ब्रँड या नात्याने आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांना अनोखा अनुभव देण्यासाठी कायम उत्सुक असतो. कोलकाता, मुंबई आणि दिल्लीतील प्रमुख मंडळांशी सहकार्य करण्याचा हा उपक्रम आमच्या धोरणाशी सुसंगत आहे. या काळात फ्रॅगरन्स झोनमध्ये गोदरेज एयर मॅटिकला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक असून त्यातून आम्हाला ग्राहकांशी नव्याने संवाद साधण्याची, त्यांना नाविन्यपूर्ण अनुभव देण्याची प्रेरणा मिळाली आहे.’

गोदरेज एयर मॅटिक ६ वेगवेगळ्या सुगंधांत उपलब्ध आहे. प्रत्येक किटमध्ये उपकरणाचे एक युनिट रिफिलसह देण्यात आले आहे. याची किंमत ५६९ रुपये असून प्रत्येक रिफिल २२०० स्प्रेची आणि सुगंध 24×7 टिकण्याची खात्री देते. एयर मॅटिक रिफिल पॅकची किंमत २८५ रुपये आहे.

Godrej aer at Durga Pujo pandal
Godrej aer at Durga Pujo pandal

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *