पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे क्रेडिट कार्ड I Patanjali Credit Card I

पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे क्रेडिट कार्ड

बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडने पंजाब नॅशनल बँक आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या भागीदारीत सह-ब्रँडेड क्रेडिट कार्ड बाजारात आणले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्लॅटफॉर्मवर को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड ऑफर केली जातात आणि सध्या ते पीएनबी रुपे प्लॅटिनम आणि पीएनबी रुपे सिलेक्ट या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत.

पीएनबी रुपे प्लॅटिनम क्रेडिट कार्डवर २५ हजार ते ५ लाख रुपयांची क्रेडिट मर्यादा मिळेल तसेच पीएनबी रुपे सिलेक्ट कार्डवर ५० हजार ते १० लाख रुपयांची क्रेडिट मर्यादा असेल.

दोन्ही को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्स पतंजलीची उत्पादने खरेदी करण्यासाठी वापरता येणार आहेत. त्यामुळे क्रेडिट कार्ड कॅशबॅक, लॉयल्टी पॉइंट्स, इन्शुरन्स कव्हरसह अनेक फायदे मिळणार आहेत. क्रेडिट कार्ड लाँच झाल्यापासून ३ महिन्यांमध्ये पतंजली स्टोअर्समध्ये २५०० रुपये आणि त्याहून अधिकच्या व्यवहारांवर कार्डधारकांना २ टक्के कॅशबॅक मिळेल. प्रति व्यवहार कॅशबॅक मर्यादा ५० रुपये असेल.

Patanjali Credit card jan 2022
Patanjali Credit card jan 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

udyojak celebrity
udyojak celebrity

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *