फेडेक्स एस एम ई कनेक्ट सीरीजतर्फे डिजिटल ट्रान्सफर्मेशन सुविधांच्या मदतीने लघु व्यवसायांचे सबलीकरण I
फेडेक्स एस एम ई कनेक्ट सीरीजतर्फे डिजिटल ट्रान्सफर्मेशन सुविधांच्या मदतीने लघु व्यवसायांचे सबलीकरण I
भारत, ३ मार्च २०२३ – फेडेक्स Express ही FedEx कॉर्पची (NYSE: FDX) उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठ्या वाहतूक कंपनीने ‘एसएमई कनेक्ट’ सीरीजची आठवी आवृत्ती घोषित केली असून ती ‘फ्युचर- फिट एसएमईज : अनलॉकिंग ग्रोथ अपॉर्च्युनिटीज थ्रु डिजिटल ट्रान्सफर्मेशन’वर आधारित आहे. ‘एसएमई कनेक्ट’ ही सीरीज एसएमईजना विचारी नेतृत्व आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ देत इंडस्ट्री व तज्ज्ञांशी उपाययोजनांवर आधारित चर्चा करून त्यांच्या व्यवसायाचे मूल्य वाढवण्याची संधी देणारी आहे.
FedEx एसएमई कनेक्टची सध्याची आवृत्ती एसएमईजना त्यांच्या व्यवसायाच्या यशासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या डिजिटल क्षमता विस्तारण्याची गरज वाटते त्यावर लक्ष केंद्रित करते. याचे संवादी सत्र कशाप्रकारे एसएमईज डिजिटल ट्रान्सफर्मेशनच्या मदतीने उद्दिष्ट केंद्रस्थानी ठेवत काम करणारे बिझनेस मॉडेल तयार करू शकतात आणि स्थित्यंतर होत असताना आव्हानांवर कशाप्रकारे मात करू शकतात, व्यवसाय जागतिक स्तरावर वाढवण्यासाठी कोणती साधने वापरता येतील तसेच या क्षेत्राशी संबंधित अर्थसंकल्पीय घोषणांचा काय परिणाम होऊ शकतो हे सांगणारे आहे.
सलिल चारी, वरिष्ठ उपाध्यक्ष, विपणन आणि ग्राहकानुभव – एएमईए, FedEx Express म्हणाले, ‘डिजिटल स्थित्यंतराशी जुळवून घेणे आणि पर्यायाने बदलत्या व्यावसायिक वातावरणात वेग राखणे एसएमईजसाठी अत्यावश्यक झाले आहे. डिजिटायझेशनचा अवलंब केल्यास एसएमईजना त्यांचा ग्राहक वर्ग वाढवता येईल तसेच बाजारपेठेतील अस्तित्व विस्तारता येईल. FedEx एसएमई कनेक्ट सीरीजच्या आठव्या आवृत्तीच्या माध्यमातून आम्ही एसएमईजना मार्गदर्शन, विविध साधने आणि स्त्रोतांसह डिजिटल सुविधांचा अवलंब करण्यासाठी आणि जागतिक संधींचा लाभ घेण्यासाठी सक्षमता मिळवून देण्यासाठी मदत करणार आहोत.’
महामारीमुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला चालना मिळाली, डिजिटल स्थित्यंतर शक्य झाले आणि स्वयंचलनाचे प्रमाण वाढले. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण २०२३ नुसार ई- कॉमर्स आणि ई—प्रोक्युरमेंटसारख्या डिजिटल सुविधांचा एमएसएमईजकडून होणारा अवलंब वाढला असून उत्पन्न व मार्जिनही वाढले आहे तसेच नव्या बाजारपेठा आणि ग्राहक मिळवणे शक्य झाले आहे. अर्थात डिजिटलायझेशनचे कितीही लाभ असले, तरी कित्येक एसएमईजनी डिजिटल स्थित्यंतर केलेले नाही.
एप्रिल २०२३ मध्ये FedEx ने ५० वा वर्धापनदिन साजरा केला आणि यावेळेस FedEx ने लघु व मध्यम आकाराच्या व्यवसाय समूहाला ठोस पाठिंबा दिला. व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांसाठी शिपिंग सोपे बनवणाऱ्या डिजिटल सुविधांची मोठी श्रेणी आमच्याकडे आहे. एसएमईजना जागतिक बाजारपेठेत स्थान निर्माण करता यावे यासाठी FedEx द्वारे FedEx शिप मॅनेजरसारखी स्वयंचलित साधने पुरवली जातात. FedEx शिप मॅनेजरमुळे त्यांना आवश्यक अर्ज उपलब्ध होतात, पत्ते व कमॉडिटीजचा स्टोअर्ड डेटाबेस वापरून शिपिंग लेबल्स तयार करता येतात. त्याचप्रमाणे त्यांना मूळ प्रतीसह इलेक्ट्रॉनिक प्रत तयार करता येते आणि ती कस्टमच्या कागदपत्रांसाठी डिजिटल पद्धतीने अपलोड करता येते.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे