कॉस्मो टेक एक्स्पो २०२३ मध्ये गॅलक्सी सर्फक्टंटसह तुमचे स्वतःचे उत्पादन ‘फॉर्म्युलेट’ करण्यासाठी व्हा सज्ज I

कॉस्मो टेक एक्स्पो २०२३ मध्ये गॅलक्सी सर्फक्टंटसह तुमचे स्वतःचे उत्पादन फॉर्म्युलेट‘ करण्यासाठी व्हा सज्ज

भारतातील सर्फक्टंटच्या आघाडीच्या उत्पादक कंपनीने कॉस्मो होम टेक एक्स्पो २०२३ मध्ये ग्राहकांबरोबर संबंध वाढविण्यासाठी आखली रोमांचक उपक्रमांची योजना

मुंबई, ६ फेब्रुवारी २०२३: होम आणि पर्सनल केअर उद्योगात वापरल्या जाणार्‍या २२० पेक्षा जास्त उत्पादन श्रेणींसह परफॉर्मन्स सर्फक्टंट्स आणि स्पेशालिटी केअर उत्पादनांची आघाडीची उत्पादक गॅलक्सी सर्फक्टंटने ते कॉस्मो होम टेक एक्सपोच्या पाचव्या आवृत्तीत सहभागी होत असल्याचे जाहीर केले आहे. मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी कॉस्मो होम टेक एक्सपो होणार आहे.

सौंदर्यप्रसाधने, वैयक्तिक निगा, परफ्युमरी, साबण, डिटर्जंट आणि टॉयलेटरी मार्केटमधील सोल्यूशन्सच्या निर्मितीसाठी हा कार्यक्रम भारतातील सर्वात मोठ्या ट्रेड एक्स्पोपैकी एक महत्वपूर्ण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे. एक्स्पोचे उद्दिष्ट उत्पादन उद्योग सुधारण्यासाठी सौंदर्य उत्पादकांना कल्पनेपासून ते तंत्रज्ञानापर्यंत आणि शेवटी उत्पादनाच्या सादरीकरणापर्यंत नाविन्यपूर्ण उपायांचा संपूर्ण स्पेक्ट्रम प्रदान करणे आहे.

या प्रदर्शनाच्या मदतीने गॅलक्सी सर्फक्टंटचा ग्राहकांशी संपर्क साधण्याचा आणि त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा मानस आहे. कंपनी आपली नवीनतम उत्पादने प्रदर्शित करेल आणि इव्हेंटमध्ये त्याच्या गुणधर्म आणि उपायसुविधांबद्दल मौल्यवान माहिती देईल. गॅलक्सी मधील तज्ञांची टीम ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आणि उत्पादन निवड आणि वापराबाबत मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे.

ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी कंपनीने रोमांचक उपक्रम आणि चर्चासत्रांची योजना आखली आहे.  समर्पित फॉर्म्युलेट-इट-युअरसेल्फ झोन मध्ये ग्राहक तज्ञांच्या सहाय्याने सुरवातीपासून उत्पादन तयार करू शकतात. कंपनी एक ‘ट्राय-मी’ विभाग देखील स्थापन करेल जेथे ग्राहक उत्पादने वापरून पाहू शकतात. दुसरीकडे, पर्सनल केअर, होम केअर आणि केसांच्या काळजीसाठी खास वेगन उपाय या तीन तांत्रिक विषयांवर परिसंवाद होणार आहेत.

या कार्यक्रमाविषयी बोलताना गॅलक्सी सर्फक्टंटचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. के नटराजन म्हणाले, “अनेक व्यवसायांना त्यांच्या उत्पादनांसाठी दर्जेदार घटक शोधण्यासाठी संपूर्ण बाजारपेठेत शोध घ्यावा लागतो. उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम सगळ्या गोष्टी एकत्र आणण्यासाठी कॉस्मो टेक एक्स्पो ओळखले जाते. आमच्या उद्योगाला आकार देणाऱ्या विविध शक्तींबद्दल जाणून घेण्यासाठी आणि पुरवठा साखळीच्या प्रत्येक टप्प्यावर मूल्य जोडण्याचे मार्ग ओळखण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल अशा या प्रदर्शनाची वाट पाहताना आम्ही तितकेच रोमांचित आहोत.”

About Galaxy Surfactants

Incorporated in 1986, Galaxy Surfactants Ltd is leading manufacturers of Performance Surfactants and Specialty Care products with over 210 product grades. These products are used in consumer-centric Home and Personal care products like hair care, oral care, skin care, cosmetics, soap, shampoo, lotion, detergent, cleaning products etc. It was awarded the ICIS Innovation Award in 2018 for its Green Process for manufacturing Amino Acid Surfactants (Mild Surfactants). It is a market leader in different segments of products ranging from skin care, oral care or hair care to that of sun care, baby care and home care products. It is the preferred suppliers to leading MNCs, Regional and Local FMCG brands. Its key customers include Unilever, Reckitt Benckiser, P&G, L’OREAL, Himalaya, Colgate Palmolive, CavinKare etc.

For more information about the company, please visit our website www.galaxysurfactants.com

Galaxy suractant
Galaxy surfactant

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *