नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेडची इनिशियल पब्लिक ऑफर १७ मार्च २०२१ रोजी खुली होणार I Nazara IPO I

NAZARA TECHNOLOGIES LIMITED

नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेडची इनिशियल पब्लिक ऑफर १७ मार्च २०२१ रोजी खुली होणार

• प्राईस बँड प्रति इक्विटी समभाग ११०० रुपये ते ११०१ रुपये निश्चित करण्यात आला आहे.
• बुधवार, १७ मार्च २०२१ ते शुक्रवार, १९ मार्च, २०२१ पर्यंत ऑफर खुली राहणार.

नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेड या भारतातील आणि आफ्रिका व उत्तर अमेरिकेतील नव्या तसेच विकसित जागतिक बाजारपेठांमध्ये उपस्थित असलेल्या, आघाडीचा वैविध्यपूर्ण गेमिंग व स्पोर्ट्स मीडिया प्लॅटफॉर्म व मोबाईल गेम्समध्ये वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप (डब्ल्यूसीसी) आणि कॅरमक्लॅश, लहान मुलांसाठी गेम्समार्फत शिक्षणामध्ये किडोपेडिया, इस्पोर्ट्स व इस्पोर्ट्स मीडियामध्ये नोडविन व स्पोर्ट्सकीडा व कौशल्यांवर आधारित, फँटसी व ट्रिव्हिया गेम्समध्ये हालाप्ले व क्यूनामी यांच्यासह संवादात्मक गेमिंग, इस्पोर्ट्स व लहान मुलांसाठी गेमीफाइड अभ्यासाच्या इकोसिस्टिम्स देणाऱ्या कंपनीची (‘कंपनी’) प्रति इक्विटी समभाग (‘इक्विटी समभाग’) ४ रुपये दर्शनी मूल्य असलेली इनिशियल पब्लिक ऑफर (‘ऑफर’) १७ मार्च २०२१ रोजी खुली होणार आहे. ही ऑफर १९ मार्च २०२१ रोजी बंद होणार आहे. प्राईस बँड प्रति इक्विटी समभाग ११०० रुपये ते ११०१ रुपये निश्चित करण्यात आला आहे.

गुंतवणूकदारांसाठी जोखमीच्या बाबी:
• या ऑफरशी संबंधित चार लीड मॅनेजर्सनी गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये २९ पब्लिक इश्यूजचे कामकाज पाहिले होते आणि त्यापैकी १० इश्यूज लिस्टिंग तारखेला इश्यू किमतीपेक्षा कमी किमतीला बंद झाले.

• १० मार्च २०२१ रोजी निफ्टी फिफ्टी वर किंमत/कमाई ४१.३३ आहे. कंपनीचा किंमत/कमाई रेशो मोजला जाऊ शकत नाही कारण ३१ मार्च २०२० रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षासाठी मूळ आणि असंहत हे दोन्ही ईपीएस निगेटिव्ह आहेत.

• ऑफरमध्ये विक्रेत्या समभागधारकांसाठी इक्विटी समभागांच्या संपादनाची सरासरी किंमत प्रति समभाग “काहीही नाही (NIL)” ते ७३०.९५ रुपये प्रति समभाग या श्रेणीतील आहे .

• २०१८, २०१९ आणि २०२० या आर्थिक वर्षातील निव्वळ संपत्तीवरील भारित सरासरी परतावा १.३०% आहे.

या ऑफरमध्ये विक्रेत्या समभागधारकांकडून विक्रीसाठी ऑफरमार्फत नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या (‘कंपनी’ किंवा ‘इश्युअर’) प्रत्येकी ४ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या ५२९४३९२ पर्यंत इक्विटी समभागांचा समावेश आहे यामध्ये आयआयएफएल स्पेशल ऑपॉर्च्युनिटीज फंडचे १२६७४३५ पर्यंत इक्विटी समभाग, आयआयफेल स्पेशल ऑपॉर्च्युनिटीज फंड – सीरिज ४ चे १०३६२८६ पर्यंत इक्विटी समभाग, आयआयएफएल स्पेशल ऑपॉर्च्युनिटीज फंड – सीरिज ५ चे ८७३९८९ पर्यंत समभाग, आयआयएफएल स्पेशल ऑपॉर्च्युनिटीज फंड – सीरिज २ चे ८१६८०४ पर्यंत इक्विटी समभाग, मित्तेर इन्फोटेक एलएलपीचे ६९१९०० पर्यंत इक्विटी समभाग (‘समभाग विक्रेते प्रमोटर’), गुड गेम इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचे १५०००० पर्यंत इक्विटी समभाग, सीडफंड २ इंटरनॅशनलचे २५००० पर्यंत इक्विटी समभाग, पौरुष जैन यांचे २३७२५ पर्यंत इक्विटी समभाग, अझीमुथ इन्वेस्ट्मेन्ट्स लिमिटेडचे १४९५९ पर्यंत इक्विटी समभाग, सीडफंड २ इंडियाचे ९४५ पर्यंत इक्विटी समभाग (गुड गेम इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, सीडफंड २ इंटरनॅशनल, पौरुष जैन, अझीमुथ इन्वेस्ट्मेन्ट्स लिमिटेड आणि सीडफंड २ इंडिया यांना ‘इतर समभाग विक्रेते’ असे नमूद करण्यात आले आहे आणि समभाग विक्रेते प्रमोटर व समभाग विक्रेते गुंतवणूकदार यांना मिळून ‘विक्रेते समभागधारक’ असे संबोधण्यात आले आहे.) या ऑफरमध्ये पात्र कर्मचाऱ्यांना सबस्क्राईब करता यावे यासाठी एकूण २०० लाख रुपयांपर्यंत रिझर्वेशनचा (“एम्प्लॉयी रिझर्वेशन पोर्शन”) (कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आलेला भाग) समावेश आहे. “एम्प्लॉयी रिझर्वेशन पोर्शन” वगळून उरलेल्या ऑफरला यापुढील मजकुरात “नेट ऑफर” (निव्वळ ऑफर) असे संबोधण्यात आले आहे. कंपनी, समभाग विक्रेते प्रमोटर आणि समभाग विक्रेते गुंतवणूकदार हे बीआरएलएम यांच्या सल्ल्याने एम्प्लॉयी रिझर्व्हेशन पोर्शनमध्ये बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना ऑफर किमतीच्या १०.००% पर्यंत (प्रति समभाग ११० रुपये) डिस्काउंट देऊ शकतात. (‘कर्मचाऱ्यांसाठी सूट’)

कमीत कमी १३ इक्विटी समभागांसाठी आणि त्यापुढे १३ इक्विटी समभागांच्या पटीत बोली लावली जाऊ शकते.

ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, १९५७ च्या नियम १९ (२) (बी) अनुसार संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम, २०१८ च्या नियम ३१ नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत आणि सेबी आयसीडीआर नियमांच्या कलम ६(२) ला अनुसरून देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी ७५% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील. यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी ६०% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. क्यूआयबी पोर्शनपैकी ५% (अँकर इन्व्हेस्टर पोर्शन वगळता) हे विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) विवेकानुसार वापरण्याच्या आधारावर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. जर म्युच्युअल फंड्सकडून येणारी एकूण मागणी ही क्यूआयबी पोर्शनच्या ५% पेक्षा कमी असेल तर म्युच्युअल फंड्सना वाटप करण्यासाठी उपलब्ध असलेले उरलेले इक्विटी समभाग हे क्यूआयबीना विवेकानुसार वाटपाच्या आधारे उरलेल्या क्यूआयबी पोर्शनमध्ये समाविष्ट केले जातील.

याशिवाय नेट ऑफरपेक्षा १५% पेक्षा कमी भाग विवेकानुसार वापराच्या आधारावर गैर-संस्थागत बोली लावणाऱ्यांसाठी आणि १०% पेक्षा कमी भाग रिटेल व्यक्तिगत बोली लावणाऱ्यांसाठी उपलब्ध करवून दिला जाईल आणि यामध्ये सेबी आयसीडीआर नियमाचे पालन केले जाईल. यासाठी इश्यू किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त सर्व संभाव्य बोली लावणारे अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या एएसबीए खात्यांची माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा युपीआय यंत्रणेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड (सेबी (मर्चंट बँकर्स) रेग्युलेशन्स, १९९२ च्या नियम २१ए मधील तरतुदींनुसार, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड हे फक्त ऑफरच्या मार्केटिंगमध्ये सहभागी असतील), जेफेरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि नोमुरा फायनान्शियल ऍडव्हायजरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

Nazara ipo marathi
Nazara ipo marathi

Disclaimer:
Nazara is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, an initial public offering of its equity shares (“IPO”) and has filed the red herring prospectus dated March 10, 2021 (“RHP”) with the Registrar of Companies, Maharashtra at Mumbai. The RHP is available on the website of SEBI, BSE and NSE at www.sebi.gov.in, www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and the websites of the Book Running Lead Managers (“BRLMs”) i.e. ICICI Securities Limited, IIFL Securities Limited, Jefferies India Private Limited and Nomura Financial Advisory and Securities (India) Private Limited, at www.icicisecurities.com, www.iiflcap.com, www.jefferies.com, and www.nomuraholdings.com/company/group/asia/india/index.html, respectively. Any potential investors should note that investment in equity shares involves a degree of risk and for details relating to the same, please refer to the RHP, including the section “Risk Factors” of the RHP.
The Equity Shares offered in the Offer have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (“U.S. Securities Act”) or any state securities laws in the United States, and unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside the United States in ‘offshore transactions’ in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdictions where such offers and sales are made.

ट्रेडिंग आणि गुंतवणूक यामधील फरक / Passion to Profession ! Webisode 2

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *