बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएलने राबवला # ड्राईव्ह फ्रेश उपक्रम I

बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएलने राबवला # ड्राईव्ह फ्रेश उपक्रम- जागतिक शौचालय दिन २०२२ च्या पूर्वसंध्येला आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत पर्यटन मार्गांवर- राष्ट्रीय उद्याने येथे इंधन स्थानकांमध्ये स्वच्छ आणि आरोग्यदायी स्वच्छतागृहे

मुंबई/नवी दिल्ली, १८ नोव्हेंबर २०२२: ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी आज पर्यटन मार्गांवर – राष्ट्रीय उद्यानांवरील त्यांच्या इंधन केंद्रांवर स्वच्छ आणि आरोग्यदायी शौचालये उभारण्याचा # ड्राईव्ह फ्रेश उपक्रम सादर करत असल्याची घोषणा केली आहे.

जागतिक शौचालय दिनाच्या पूर्वसंध्येला (१९ नोव्हेंबर) तीन ओएमसी तर्फे कान्हा, ताडोबा, बांधवगड, पेंच, सुंदरबन, मानस, रणथंबोर आणि इतरांसह प्रमुख राष्ट्रीय उद्यानांकडे जाणाऱ्या १९१ रिटेल आऊटलेट्समध्ये # ड्राईव्ह फ्रेश उपक्रमांतर्गत स्वच्छ आणि आरोग्यदायी स्वच्छतागृहांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्हर्च्युअल परिषदेद्वारे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री श्री. हरदीप सिंग पुरी, ईशान्य क्षेत्राचे माननीय सांस्कृतिक, पर्यटन आणि विकास मंत्री श्री गंगापुरम किशन रेड्डी आणि भारत सरकारचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि श्रम आणि रोजगार राज्यमंत्री माननीय श्री रामेश्वर तेली उपस्थित होते.

आझादी का अमृत महोत्सव मोहिमेअंतर्गत पर्यटक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांना अधिकाधिक चांगला अनुभव देत हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

ओएमसीची आयओसीएल, बीपीसीएल आणि एचपीसीएलची इंधन केंद्रे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक आणि इतरत्र देशभर पसरलेली आहेत.

वृंदावनमधील १६ ओएमसी रिटेल आऊटलेट्स आणि गोव्यातील १२ रिटेल आऊटलेट्समध्ये पर्यटकांना सर्वोत्कृष्ट दर्जाच्या सुविधा देण्यासाठी स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुधारित स्वच्छतागृहे आधीपासून सुरू करण्यात आली आहेत. पुरुष आणि स्त्रियांच्या स्वच्छतागृहांमध्ये फरक दाखविणारी ठळक चिन्हे आहेत, चांगले प्रकाशमान आहेत, पाण्याची उपलब्धता आहे, लॅचिंगची योग्य सोय आहे आणि ती स्वच्छ आणि आरोग्यदायी स्थितीत ठेवली जातात.

देशातील राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्ये ही ड्रायव्हिंगची खूप लोकप्रिय ठिकाणे आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक वैयक्तिक वाहनांमधून आणि पर्यटक बसमधून प्रवास करतात आणि इंधन भरण्यासाठी तसेच सुविधांच्या वापरासाठी महत्त्वाचे थांबण्याचे ठिकाण आहेत हे लक्षात घेऊन हा #DriveFresh उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

Drive Fresh pic
Drive Fresh pic

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *