मोस्ट पॉप्युलर ब्रँड पुरस्काराने देव मसाले सन्मानित
मोस्ट पॉप्युलर ब्रँड पुरस्काराने देव मसाले सन्मानित
सार्वजनिक मतदानाद्वारे मोस्ट पॉप्युलर ब्रँड म्हणून देव मसालेची निवड लोकांनी केली आहे. अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे व एजिलस डायग्नॉस्टिक्सचे डॉ. अविनाश फडके यांच्या हस्ते अजिंक्य देव यांचा सन्मान करण्यात आला.
२०१८ मध्ये अजिंक्य सुहास देव यांनी घरगुती स्वरूपात सुरू केलेला ‘देव मसाले’ हा प्रवास आज एका यशस्वी व्यवसायात रूपांतरित झाला आहे. स्वतःच्या आवडीतून आणि आई-आजीच्या पारंपरिक पाककलेच्या संस्कारातून अजिंक्यजींनी हे पाऊल उचलले.

“आमच्या शिवाय राहील पंगत अपूर्ण कारण देव मसालेच करतील जेवण चविष्ट आणि पूर्ण” हे ब्रीदवाक्य जपत, आज हा ब्रँड कोल्हापुरी, मालवणी, आगरी आणि बिर्याणी मसाल्यांसारख्या विविध प्रकारांत स्वतःचे उत्पादन (Production) करत आहे.
गेल्या ८ वर्षांत देव मसाल्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर अमेरिका, लंडन, दुबई आणि कॅनडासारख्या देशांतही आपली चव पोहोचवली आहे. दर्जेदार घरगुती चव आणि विश्वासार्हता हीच या ब्रँडची खरी ओळख आहे..
🗳️ सार्वजनिक मतदानाद्वारे ब्रँड निवड
या उपक्रमात ७ दिवसांची पारदर्शक सार्वजनिक मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. अर्थसंकेतच्या व्हॉट्सअॅप चॅनेलद्वारे घेतलेल्या मतदानात ब्रँड्सची निवड तीन प्रमुख श्रेणींमध्ये करण्यात आली.
💡 संकल्पनेमागील उद्दिष्ट
‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’ या उपक्रमाची सुरुवात २०१७ मध्ये करण्यात आली. मराठी उद्योजकांनी आपली ब्रँड ओळख जागतिक स्तरावर निर्माण करावी, ब्रँड व्हॅल्यूचे महत्त्व समजावे आणि लोकशाही पद्धतीने ग्राहकांच्या मतांवर आधारित ब्रँड निवड व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
यंदा Single Click Voting System सुरू करून प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सर्वांसाठी सुलभ करण्यात आली. ग्राहक, गुंतवणूकदार, विक्रेते आणि सर्वसामान्य नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी होता येते.


