व्होल्टासने भारतामध्ये २०२२ ‘ग्रँड महोत्सवाची’ घोषणा केली I

व्होल्टासने भारतामध्ये २०२२ ‘ग्रँड महोत्सवाची’ घोषणा केली

• व्होल्टास आणि व्होल्टास बेको उत्पादनांच्या खरेदीवर निवडक क्रेडिट कार्डांवर १५%पर्यंत कॅशबॅक
• ५ वर्षांपर्यंतची सर्वसमावेशक वॉरंटी
• इन्व्हर्टर कॉम्प्रेसरवर लाइफटाइम वॉरंटी
• व्होल्टास उत्पादनांवर सहजसोप्या, सुविधाजनक ईएमआय स्कीम्स
• व्होल्टास बेको उत्पादनांवर शून्य डाऊन पेमेंट आणि १८ महिन्यांपर्यंत दीर्घकाळ ईएमआय
• निवडक व्होल्टास बेको उत्पादनांवर दर महिन्याला फक्त २९५० रुपयांचा फिक्स्ड ईएमआय
• रूम एअर कंडिशनर्ससाठी स्पेशल इन्स्टॉलेशन पॅकेजेस

मुंबई, ऑक्टोबर २०२२: भारतामध्ये एअर कंडिशनर्सच्या बाजारपेठेतील निर्विवाद मार्केट लीडर व्होल्टास लिमिटेडने ‘ग्रँड महोत्सव ऑफर २०२२’ ची घोषणा केली आहे. या सणासुदीच्या काळात भारतभरातील ग्राहकांचा आनंद वृद्धिंगत व्हावा यासाठी व्होल्टासने हे ग्राहककेंद्री पाऊल उचलले आहे. देशभरातील सर्व अधिकृत डीलर्स आणि चॅनेल पार्टनर्सकडे संपूर्ण ऑक्टोबर महिनाभर या ऑफर्सचा लाभ घेता येईल.

नवा आनंद व नवी आशा घेऊन यंदाचा फेस्टिव्ह सीझन सुरु झाला आहे. जुन्या उपकरणांच्या ऐवजी आरोग्य व स्वच्छता यांची काळजी घेऊ शकणारी आधुनिक उपकरणे आणून घर अपग्रेड करण्याची ग्राहकांची गरज ओळखून व्होल्टासने या आकर्षक फेस्टिव्ह ऑफर्स सुरु केल्या आहेत. यामध्ये १५% पर्यंत कॅश ऑफरचा देखील समावेश आहे.

फेस्टिव्ह सीझनचे स्वागत करत व्होल्टास लिमिटेडचे एमडी व सीईओ श्री. प्रदीप बक्षी म्हणाले, “यंदाचा सणासुदीचा काळ अनेक बाबतीत खूप खास आहे, गेल्या दोन वर्षांनंतर आता लोक पूर्णपणे बाहेर येऊ लागले आहेत आणि कुटुंबीय व मित्रांसोबत सण साजरे करत आहेत. आमच्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स व नाविन्यपूर्ण उत्पादने लॉन्च करून हा सर्व सोहळा अधिक खास बनवावा अशी व्होल्टासमध्ये आमची इच्छा आहे. सध्याच्या घरगुती उपकरणांना अपग्रेड करू इच्छिणाऱ्या आमच्या ग्राहकांना ग्रँड महोत्सव ऑफरमुळे आकर्षक मूल्यवर्धित योजना आणि ऑफर्सचा लाभ घेता येईल.

व्होल्टास परिवाराच्या वतीने सर्व ग्राहकांना फेस्टिव्ह सीझनच्या शुभेच्छा!”

• ग्राहकांसाठी खरेदी प्रक्रिया अगदी सुविधाजनक आणि सहजसोपी बनेल अशा विशेष ऑफर्स व्होल्टास आणि व्होल्टास बेकोने सादर केल्या आहेत. निवडक क्रेडिट आणि डेबिट कार्डांवर १५% पर्यंत कॅशबॅकचा समावेश असलेल्या आकर्षक फायनान्स ऑफर्स हा ब्रँड उपलब्ध करवून देत आहे. याशिवाय हे दोन्ही ब्रँड पुढील ऑफर्स देखील देत आहेत – ५ वर्षांपर्यंत विस्तारित सर्वसमावेशक वॉरंटी, इन्व्हर्टर कॉम्प्रेसरवर लाइफटाइम वॉरंटी, रूम एअर कंडिशनर्ससाठी स्पेशल इन्स्टॉलेशन ऑफर्स. याशिवाय व्होल्टास बेको सहजसोप्या, सुविधाजनक ईएमआय स्कीम्स, १८ महिन्यांपर्यंत दीर्घकाळ ईएमआय, निवडक व्होल्टास बेको उत्पादनांवर दर महिन्याला फक्त २९५० रुपयांचा फिक्स्ड ईएमआय अशा ऑफर्स आणून उत्पादनांच्या मालकीचा खर्च कमी होईल अशी सुविधा ग्राहकांना उपलब्ध करवून दिली आहे.

या ऑफर्स व्होल्टास आणि व्होल्टास बेको उत्पादनांच्या श्रेणीवर लागू असून अधिकृत चॅनेल पार्टनर्स आणि एक्सक्लुसिव्ह ब्रँड दुकानांमध्ये त्यांचा लाभ घेता येईल. नव्या श्रेणीची खरेदी करण्यासाठी ही उत्तम संधी ग्राहकांना मिळाली आहे.

ग्रँड महोत्सव ऑफरची सुरुवात १ ऑक्टोबर २०२२ पासून झाली असून ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ती सुरु राहील. व्होल्टास बेको ग्राहकांना श्रेणीतील सर्वोत्तम आणि तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत उत्पादनांचा अनुभव घेता यावा यासाठी सर्व ऑफलाईन चॅनेल्समध्ये या ऑफर्सचा लाभ घेता येईल. २५००० कस्टमर टचपॉईंट्स व्यतिरिक्त या दोन्ही ब्रँड्सनी एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट्सचे विशाल नेटवर्क उभे केले आहे. आर्थिक वर्ष २०२३ च्या अखेरपर्यंत अजून जास्त ब्रँड शॉप्स आणि एक्स्पीरियंस झोन सुरु करण्याची त्यांची योजना आहे. www.voltas.com आणि इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर देखील या उत्पादनांची खरेदी करता येईल.

Voltas oct 2022
Voltas oct 2022

About Voltas: Voltas Limited is a premier air conditioning and engineering solutions provider and a projects specialist. Founded in India in 1954, Voltas Limited is part of the Tata Group, and in addition to Room Air Conditioners, Voltas also has Air Coolers, Air Purifiers, Water Dispensers, Water Coolers, Commercial Refrigeration and Commercial Air Conditioning products in its portfolio. Voltas is one of the leading companies within the Tata group and is the undisputed market leader in room air conditioners in India, with a footprint of over 25,000+ customer touchpoints. It has also recently launched its range of Voltas Beko Home Appliances, through its JV in India, in equal partnership with Arcelik.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *