क्लब महिंद्राचा ‘सक्षम’ प्रकल्प महिलांना सबळ बनवून रोजगार मिळवण्यात मदत करत आहे I

क्लब महिंद्राचा ‘सक्षम’ प्रकल्प महिलांना सबळ बनवून रोजगार मिळवण्यात मदत करत आहे

~ आजवर या प्रकल्पाने १४०पेक्षा जास्त महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यात मदत केली आहे.

~ प्रत्येक लाभार्थीच्या सरासरी मासिक उत्पन्नामध्ये ५००० रुपयांच्या वाढीचे उद्दिष्ट

मुंबई, ३१ जुलै २०२२: महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडचा प्रमुख ब्रँड क्लब महिंद्रा आपल्या ‘सक्षम’ प्रकल्पाच्या माध्यमातून महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देत आहे. महिलांना रोजगार मिळवण्यात मदत करावी हा क्लब महिंद्राच्या ‘सक्षम’ प्रकल्पाचा उद्देश आहे.

समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहणे हे क्लब महिंद्राचे एक प्रमुख मूल्य आहे. महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरीनेच या प्रकल्पामध्ये मनुष्यबळामध्ये महिलांचा सहभाग कमी असल्याच्या समस्येवरही काम केले जाते आणि महिलांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळवून देण्यात मदत केली जाते. बऱ्याचदा असे दिसून आले आहे की महिलांकडे कौशल्ये असतात आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा देखील असते पण त्यासाठी लागणारी उपकरणे व संसाधने मात्र त्यांच्याकडे नसतात, नेमक्या याच समस्येवर क्लब महिंद्राच्या ‘सक्षम’ प्रकल्पामध्ये काम केले जात आहे.

नेमक्या लाभार्थींची ओळख करवून घेण्यापासून ‘सक्षम’ प्रकल्पाची सुरुवात होते, लाभार्थींची निवड प्राधान्यक्रमानुसार केली जाईल. ज्यांच्याकडे आवश्यक कौशल्ये आहेत पण व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारी साधने नाहीत, तसेच ज्यांना मदतीची सर्वाधिक गरज आहे अशांना प्राथमिकता दिली जाईल. एकूण १४४ महिलांची निवड करून त्यापैकी प्रत्येकीला १५,००० रुपयांचे साहित्य व उपकरणे पुरवली जातील.

व्यवसायांचे स्वरूप आणि त्यासाठी लागणारे साहित्य याविषयी माहिती समजून घेण्यासाठी या महिलांसोबत संवाद साधून ‘सक्षम’ प्रकल्पाची टीम त्यांच्या नेमक्या गरजा जाणून घेईल व त्या पूर्ण करेल. त्यानंतर तीन महिने या लाभार्थींच्या कामाचा आढावा घेतला जाईल, त्यांना काही समस्या भेडसावत असल्यास सल्लागार टीम त्या दूर करण्यात मदत करू शकेल तसेच या महिलांना पुरवलेल्या मदतीचा प्रभाव किती झाला आहे त्याचे विश्लेषण केले जाईल.

क्लब महिंद्रासाठी अतिशय महत्त्वाच्या आणि खूप जवळच्या असलेल्या प्रकल्पांपैकी एक ‘सक्षम’ प्रकल्पातून दोन प्रमुख उद्दिष्ट्ये पूर्ण केली जातील, त्यापैकी एक म्हणजे महामारीमुळे जे व्यवसाय बंद झाले होते ते पुन्हा सुरु करण्यासाठी महिला उद्योजकांना मदत करणे आणि दुसरे म्हणजे महिलांच्या सरासरी मासिक उत्पन्नामध्ये वाढ करणे. युनायटेड वे ऑफ मुंबईमार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. या प्रकल्पामुळे प्रत्येक लाभार्थीच्या सरासरी मासिक उत्पन्नामध्ये ५००० रुपयांची वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

क्लब महिंद्राचा ‘सक्षम’ प्रकल्प संयुक्त राष्ट्रसंघाच्या एसडीजी८ आणि एसडीजी या दोन अतिशय महत्त्वाच्या शाश्वत विकास उद्दिष्टांना अनुसरून राबवला जात आहे. एसडीजी८मध्ये स्थिर, सर्वसमावेशक आणि पर्यावरणपूरक आर्थिक वाढीचे, संपूर्णपणे उत्पादक रोजगार आणि सर्वांना त्यांना साजेसे, सभ्य काम मिळावे हे उद्दिष्ट आहे. एसडीजी४ मध्ये लैंगिक समानतेचे आणि सर्व महिला व मुलींना सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे.

club mahindra
club mahindra

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe
Avadhut sathe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *