क्लब महिंद्रा अरूकुट्टी, अलाप्पुझा केरळ येथे आनंद घ्या स्वर्गीय शांततेचा I

क्लब महिंद्रा अरूकुट्टी, अलाप्पुझा केरळ येथे आनंद घ्या स्वर्गीय शांततेचा I

अलापुझ्झाकेरळच्या मध्यवर्ती भागात वसलेले क्लब महिंद्र अरूकुट्टी हे आलिशानपणा आणि पारंपारिकतेचा अनोखा संगम साधणारे आहे. हिरव्यागार ४३ एकरांत उभारण्यात आलेल्या या केरला रिसॉर्टमध्ये बहुढंगी स्थानिक संस्कृती आणि वैविध्यपूर्ण पैलूंचा मिलाफ साधण्यात आला आहे. साहजिकच इथे सुट्टी घालवण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो.

अभिजातपणे तयार करण्यात आलेल्या ८२ खोल्या इथे असून प्रत्येक खोलीमध्ये बारकाईने सजावट करण्यात आली आहे. क्लब महिंद्रा अरूकुट्टीमध्ये आरामदायीपणाचा अत्युच्च अनुभव घेता येतो. या रिसॉर्टचे आर्किटेक्चर निसर्गाशी सुसंगत आणि त्याचा परिपूर्ण आनंद देणारे आहे. क्लब महिंद्रा अरूकुट्टीमध्ये विविध उपक्रम आणि निवांतपणाअध्यात्मासह उपलब्ध करण्यात आले आहे. चविष्ट जेवणापासून कलात्मक वस्तू आणि मनमोहक क्रुझेसपर्यंत विविध गोष्टींचा आनंद या रिसॉर्टमध्ये घेता येतो.

विस्तीर्ण स्विमिंग पूलआधुनिक स्पायोग्य निगा राखलेले लॉन्स तुम्हाला असीम शांततेचा अनुभव देण्यासाठी सज्ज आहेत. अरूकुट्टी गाव केरळा बॅकवॉटर्सचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करत आहे. इथे तुम्हाला स्वर्गीय शांततेचा अनुभव घेता येईल.

मनमोहक क्रुझमधून बॅकवॉटर्सचा प्रवास करा, किंवा निवांत स्पापणे स्पाचा आनंद घ्या किंवा बोटीत कँडललाइट डिनरचा आस्वाद घ्या. या रिसॉर्टमध्ये आल्यानंतर बाहेरच्या जगापासून दूर जात आपल्या प्रियजनांशी असलेले नाते आणखी दृढ करण्याची संधी मिळेल.

या रिसॉर्टमध्ये दोन रेस्टॉरंट्स असून खवैय्यांना फिन्झ आणि रिपल्समध्ये विविध खाद्यपदार्थांचा मनसोक्त आनंद घेता येईल. ओपन एयर रेस्टॉरंट असलेले फिन्झ सीफूड त्याची खासियत आहे. इथल्या करिमीन सिझलर आणि मीन मांगा करी (कैरी घालून शिजवलेले मासे) यासारख्या शेफ सिग्नेचर डिशेस प्रसिद्ध असून त्यामुळे करिमीन माशासारखे स्थानिक पदार्थ चाखता येतील. रिपल्स हे ऑल- डे डायनिंग रेस्टॉरंट आहे, जिथे या प्रदेशातल्या स्थानिक खाद्यपदार्थांची चव घेता येईल.

या रिसॉर्टद्वारे साइटसीइंगची वेगवेगळी ठिकाणे, प्रसिद्ध मंदिरे आणि चर्चेसपर्यंत जाण्याची सोय करून दिली जाते. विशेष म्हणजे, त्यादरम्यान १८ व्या शतकातल्या कृष्णपुरम पॅलेससारख्या फारशा प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणाचा समावेश आहे. हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण दक्षिण भारतीय स्थापत्यशैलीसाठी ओळखले जाते व नाजूक कलाकुसर केलेल्या भिंती आणि छपरावर ते पाहाता येते. हा भाग आता संग्रहालयाच्या स्वरुपात जतन करण्यात आला आहे. त्याव्यतिरिक्त अध्यात्म व जुन्या काळाचं प्रतीक म्हणून दिमाखात उभं असलेलं सेंट मेरीज फॉरेन चर्च हे आर्चेपार्ची ऑफ चंगनासेरीअंतर्गत ८३५ एडी काळातलं चर्चही इथे पाहाता येईल.

रोमँटिक संध्याकाळ व्यतीत करायची असल्यास कुत्तानाड बॅकवॉटर्स डोंगर आणि समुद्रादरम्यानच्या निसर्गरम्य जलमार्गाची सफर करता येईल. हनीमूनर्स तसेच निसर्गप्रेमींनी हा प्रवास आवर्जून करण्यासारखा आहे. चमकदार पांढरी वाळू आणि स्वच्छ निळ्या पाण्याचा प्रसिद्ध अलेप्पी समुद्रकिनारा शांततेच्या शोधात असलेली जोडपी, हनीमूनर्स आणि कुटुंबांना आकर्षित करणारा आहे.

क्लब महिंद्रा अरूकुट्टी हे ठिकाण परंपरा आणि निसर्गसौंदर्याचा अनोखा अनुभव देणारे असून सदस्यांना अलाप्पुझाच्या केंद्रस्थानी वसलेल्या रिट्रीटचा मनसोक्त आनंद घेता येईल. सौंदर्यपूर्ण पद्धतीने सजवलेल्या रूम्स, वैविध्यपूर्ण उपक्रमांची रेलचेल, अध्यात्माची डूब असलेले हे रिसॉर्ट आरामदायीपणा देईल, शिवाय ताजंतवानं करेल. रूचकर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यापासून या प्रदेशातल्या अपरिचित स्थळांना भेट देण्यापर्यंत आणि केरळ बॅकवॉटर्सची शांतता अनुभवण्यापर्यंत सदस्यांना इथे अविस्मरणीय अनुभव मिळेल असा विश्वास वाटतो. रोमँटिक प्रवास असो किंवा कुटुंबासोबत चांगला वेळ घालवायचा असो, क्लब महिंद्रा अरूकुट्टीमध्ये घालवलेला प्रत्येक क्षण सदस्यांसाठी अविस्मरणीय ठरतो आणि म्हणूनच इथल्या अनोख्या निसर्गाशी नाते जोडण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत.

Arookutty Alleppy Resort in Alappuzha image
Arookutty Alleppy Resort in Alappuzha image

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *