पेटीएमला निव्वळ तोट्यात ८% ची वाढ I Paytm Loss widens by 8% I

पेटीएमला निव्वळ तोट्यात ८% ची वाढ

पेटीएमला दुसऱ्या तिमाहीत निव्वळ तोट्यात ८% ची वाढ

डिजिटल पेमेंट फर्म पेटीएम ने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या तिमाहीत निव्वळ तोट्यात वाढ झाली असून एकूण ऑपरेटिंग महसुलात ६४% ची वाढ झाली आहे.
सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ तोट्यात ८% ची वाढ झाली असून रु.४७३/- करोड आहे.एकूण ऑपरेटिंग महसूल रु. १०८६/- करोड आहे.
जून अखेर तिमाहीत कंपनीला रु. ३८२/- करोड चा निव्वळ तोटा तर ऑपरेटिंग महसूल रु. ८९०/- करोड आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा म्हणाले, कंपनीच्या विद्यमान ग्राहक बेस मार्फत महसुलात दर वर्षी वाढ करण्याकरिता कंपनी प्रयत्नशील आहे. परफॉर्मन्स वर आधारित महत्वाच्या इंडिकेटर वर कंपनीने प्रगती केली आहे. पेमेंट आणि फायनान्शिअल सर्विसेस मधून महसुलात ६९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८४२/- करोड आहे. मार्केटिंग व प्रोमोशनल खर्चात वाढ झाली असून हि रक्कम रु. १८५.७/- करोड आहे.या तिमाहीत एकूण खर्च रु. १६००/- करोड असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ११६६/- करोड होता. ट्रॅव्हल , मुव्ही तिकीट बिझनेस मध्ये वसुली उत्तम झाली असून कॉमर्स व क्लाऊड सर्विस महसूल ४७% ने वाढला आहे.

paytm loss
paytm loss

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo​

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

vadapav katta
vadapav katta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *