डी सी एम श्रीरामला रु. १५९/- करोड नफा I DCM Shriram Profit of Rs. 159/- Crore I

डी सी एम श्रीरामला रु. १५९/- करोड नफा

डी सी एम श्रीराम ला निव्वळ नफ्यात ३३.२% ची वाढ

डी सी एम श्रीराम कंपनीने विक्रीत वाढ करीत दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ३३.२% ची वाढ केली आहे व हि रक्कम रु. १५९/- करोड आहे.मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा रु.११९/- करोड होता.

जुलै-सप्टेंबर तिमाहीत एकूण उत्पन्न रु. २१९८.६१/- करोड असून मागील वर्षी तिमाहीत हि रक्कम रु. २०६४.६१/- करोड होती. या कालावधीत एकूण खर्च रु.१९७०/- करोड आहे.

कामगिरीवर भाष्य करताना, कंपनीचे अध्यक्ष आणि वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक अजय श्रीराम म्हणाले की, या तिमाहीत कोविड-१९ चा प्रभाव कमी होऊनही व्यवसायाचे वातावरण विस्कळीत राहिले. हवामानामुळे निर्माण होणारे घटक, भौगोलिक-राजकीय कारणे आणि कोविड-१९ या जागतिक पुरवठा साखळीत अडचणी आल्या.

“आमच्या क्लोरो-विनाइल व्यवसायांनी सुधारित मागणी आणि किंमतीची परिस्थिती पाहता अधिक चांगली कामगिरी केली आहे. तथापि, ऊर्जेच्या किंमतींमध्ये तसेच इतर मुख्य कच्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे, खर्चाचा दबाव जास्त आहे असे कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विक्रम श्रीराम म्हणाला.

dcm shriram
dcm shriram

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K​

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7​

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo​

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Dr Amit Bagwe Share Market 7
Dr Amit Bagwe Share Market 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *