श्रीराम ट्रान्सपोर्टला रु.१०८६/- कोटी नफा I Shriram Transport profit of Rs. 1086/- Crore I

श्रीराम ट्रान्सपोर्टला रु.१०८६/- कोटी नफा

श्रीराम ट्रान्सपोर्टला निव्वळ नफ्यात ४४% ची वाढ

गाड्यांना फायनान्स करणारी कंपनी श्रीराम ट्रान्सपोर्ट ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला निव्वळ नफ्यात ४४% ची वाढ झाली असून लोन मध्ये वाढ तसेच निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ झाली आहे. या तिमाहीत निव्वळ नफा रु.१०८६/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ७५५/- कोटी होती. निव्वळ व्याज उत्पन्न २२% ने वाढले असून हि रक्कम रु. २६२८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २१५१/- कोटी होती. एकूण मालमत्ता व्यवस्थापन ८% ने वाढले असून हि रक्कम रु. १.२७/- लाख कोटी आहे. निव्वळ व्याज मार्जिन ६.९६% आहे. कंपनी ९० पेक्षा जास्त एकूण थकीत कर्जाच्या ५०% कर्ज तरतूद करते. कंपनीला मालमत्ता गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. मार्च २०२२ अखेर आर्थिक वर्षाकरिता कंपनीला निव्वळ नफ्यात ९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २७०८/- कोटी आहे. तर निव्वळ व्याज उत्पन्नात १४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ९३१६/- कोटी आहे.

Shriram Transport May 2022
Shriram Transport May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *