शेतकऱ्यांना करोडपती उद्योजक बनविणारा अवलिया ‘श्रीकांत लचके’ I Shrikant Lachke Nashik I अर्थसंकेत यशोगाथा I

महाराष्ट्रातील आदिवासी भाग मोखाडा,जि.पालघर येथील एका छोट्याशा गावात जन्म व शिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर ख्याती मिळवणारा एक अवलिया तसेच १,००,००० नवीन एक्सपोर्टर घडवून आणण्याचा ध्यास असलेला बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे “श्रीकांत लचके”.

भारताचा जी.डी.पी कसा घसरतो या ऐवजी १,००,००० नवीन एक्सपोर्टर बनवून भारताचा जी.डी.पी वाढवण्याचा तर मानस केलाच आहे, याबरोबरच आपल्या देशात परकीय चलन आणणे व त्याचा विधायक उपयोग सर्वसामान्य शेतकरी व छोटे उद्योग धंदे विकसित व्हावे म्हणून वयाच्या 3४ व्या वर्षी मेड इन स्वदेशी चेंबर ऑफ कॉमर्स अँड एग्रीकल्चर ची स्थापना केली तसेच जागतिक दर्जाचा एक्स्पोर्ट इम्पोर्ट बिजनेस यावर आधारित THE EXIM TIMES न्युज मीडिया व ग्लोबल मार्केट प्लेस प्लॅटफॉर्म विकसित केले.

१९० देशातील एन आर आय भारतीय उद्योजक व भारतीय ग्रामीण उद्योजक यांना एकाच व्यासपीठ वर आणण्यासाठी व्यासपीठ निर्माण करताना आत्तापर्यंत ७००० च्या वर शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत कृषी उद्योजक तर बनवलेच परंतु विना एजंट त्यांचा माल सुरक्षित एक्सपोर्ट करण्यासाठी मार्गदर्शनही केले व आतापर्यंत आखाती देश , युरोप व अमेरिकेत आपल्या कामाचा विस्तार केला आहे. श्रीकांत लचके यांनी पुणे युनिव्हर्सिटी मध्ये MBA इंटरनॅशनल बिझनेस करून त्यांनी त्यानंतर दिल्लीत 5 वर्ष वास्तव्य ही केले आहे. या दरम्यान सेंट्रल ट्रेड युनियन चा नॅशनल सेक्रेटरी या पदावर काम करताना इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन तसेच केंद्र सरकारच्या विविध प्रोजेक्ट वर काम करण्याची संधी मिळाली व खूप शिकण्यास भेटले. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अंतर्गत संस्था The Directorate General of foreign Trade (DGFT) व The Indian Institute of Foreign Trade (IIFT) यांच्याकडून त्यांना एक्सपोर्ट प्रमोशन संदर्भात ‘ बेस्ट बिझिनेस प्लॅन ‘ साठी अवार्ड देऊन सन्मानित ही करण्यात आले.

मोखाडा गाव ते आंतरराष्ट्रीय व्यवसाय घडवण्यात अनेक अडचणींना लढा देणारा उद्योजक आपल्या मातीतून वरती आला व आपल्या मातीतील लोकांना वरती आणण्यासाठी मोठ्या पगाराची आस न ठेवता समाजपयोगी काम त्यांच्या व्यासपीठावर करत आहेत.

Email id – info@madeinswadeshi.org

Contact – 9107045555

Shrikant Lachake
Shrikant Lachake

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

Ketan Gawand Whatsapp Mkt book
Ketan Gawand Whatsapp Mkt book

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *