झोमॅटो लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) १४ जुलै २०२१ पासून खुली होणार I Zomato IPO I

झोमॅटो लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आय पी ओ) १४ जुलै २०२१ पासून खुली होणार

• झोमॅटो लिमिटेडच्या प्रत्येक समभागासाठी (“Equity Share”) रु. ७२ ते रु. ७६ किंमतपट्टा निश्चित

• ही ऑफर १४ जुलै २०२१ ते १६ जुलै २०२१ या कालावधीत सुरु राहणार (“Offer”)

नवी दिल्ली, ०८ जुलै २०२१: झोमॅटो लिमिटेड (पूर्वीची झोमॅटो प्रायव्हेट लिमिटेड आणि झोमॅटो मिडिया प्रायव्हेट लिमिटेड) (झोमॅटो किंवा कंपनी) आपल्या प्राथमिक समभाग विक्रीला (आयपीओ) येत्या १४ जुलै २०२१ पासून सुरवात करत आहे.

या योजनेसाठी प्रती समभाग रु. ७२ ते रु. ७६ किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. समभाग खरेदीची बोली लावताना किमान १९५ समभागांसाठी आणि त्यानंतर १९५ च्या पटीत अर्ज करता येणार आहे.

या आयपीओद्वारे ९०,००० दशलक्ष मूल्याचे नवीन समभाग (“Fresh Issue”) आणि इन्फो एज (इंडिया) लिमिटेडचे – विक्रेता समभागधारक (“Selling Shareholder”) ३७५० दशलक्ष मूल्यापर्यंतचे समभाग विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

या आयपीओ योजनेत ६५ लाख समभाग पत्र कर्मचाऱ्यांकरिता विहित प्रमाणात खरेदीसाठी राखीव ठेवण्यात येणार असून हे प्रमाण कंपनीच्या आयपीओ पश्चात एकूण समभाग भांडवलाच्या (the “Employee Reservation Portion”) ५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.

सिक्युरिटीज अंड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अंड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१८च्या सुधारित (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 सोबत सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (रेग्युलेशन) रुल्स १९५७च्या १९(२)(ब) सुधारित नियमावलीनुसार (“SCRR”) ही ऑफर खुली करण्यात आली आहे.
सेबी आयसीडीआर नियामकांच्या ६(२) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ७५ टक्क्यांपेक्षा कमी समभाग उपलब्ध करून देता येणार नाहीत.

विक्रेता समभागधारकांशी आणि व्यवस्थापकांशी सल्लामसलत करून सेबी कंपनी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील ६० टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (Anchor Investors) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. त्या खेरीज पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील ५ टक्के हिस्सा (प्रमुख गुंतवणूकदारांच्या हिश्श्याव्यतिरिक्त) प्रमाणित तत्त्वावर फक्त म्युचुअल फंडांना गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा उरलेला सर्व हिस्सा प्रमाणित तत्त्वावर प्रमुख गुंतवणूकदार आणि म्युचुअल फंड वगळता उर्वरित सर्व पात्र संस्थात्मक खरेदीदारांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.

ऑफर किंमतीच्या समकक्ष किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीला मागणी आल्यासच हे हिस्सा वाटप केले जाईल. परंतु जर म्युचुअल फंडांची सरासरी मागणी ही पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शाच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास, म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असलेला हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांना प्रमाणित तत्त्वावर वाटपासाठी म्हणून पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातच समाविष्ट केला जाईल.

तसेच, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या १५ टक्क्यांपर्यंतचा हिस्सा प्रमाणित तत्वावर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि योजनेच्या १० टक्क्यांपर्यंतचा हिस्सा किरकोळ (रिटेल) गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. ऑफर किंमतीच्या समकक्ष किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीला मागणी आल्यासच हे हिस्सा वाटप केले जाईल. तसेच, कर्मचारी राखीव हिस्सा नियमाअंतर्गत काही समभाग हे पात्र कर्मचाऱ्यांना खरेदीसाठी प्रमाणित तत्त्वावर उपलब्ध करून दिले जातील. अर्थात, कर्मचाऱ्यांकडून ऑफर किंमतीच्या समकक्ष किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीला मागणी आल्यासच हे हिस्सा वाटप केले जाईल.

प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) रिटेल गुंतवणूकदरांसह सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या बँक खात्यांचा तपशील (युपीए आयडीसह) जाहीर करून अर्जाची विहित रक्कम ब्लॉक (“ASBA”) करून ठेवणे बंधनकारक आहे. ज्या अनुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या एससीएसबीतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.

अधिक तपशील जाणून घेण्यासाठी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या ३६१ क्रमांकाच्या पानाच्या आरंभी ‘“Offer Information”’ अंतर्गत दिलेली माहिती वाचावी.

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारा उपलब्ध समभागांची मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) दोन्ही ठिकाणी नोंदणी करण्यात येणार आहे.

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि क्रेडीट स्विस सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे या आयपीओसाठी आंतरराष्ट्रीय समन्वयक आणि बुक रनिंग लीड व्यवस्थापक (GCBRLMs) म्हणून काम पाहणार आहेत. बीओफए सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड आणि सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे या योजनेसाठी बुक रनिंग लीन व्यवस्थापक (“BRLMs”) म्हणून काम पाहणार आहेत.

zomato ipo 2021
zomato ipo 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

08 Dr Amit Bagwe Share Market
08 Dr Amit Bagwe Share Market

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *