राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सांगली आणि अर्थसंकेत, मुंबई यांच्यात ‘प्रगतीचा करार’ I MOU between Rajarambapu Institute of Technology Sangli & Arthsanket Mumbai I

राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सांगली आणि अर्थसंकेत, मुंबई यांच्यात ‘प्रगतीचा करार’

२२ सप्टेंबर २०२१ रोजी राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर, सांगली आणि अर्थसंकेत, मुंबई यांनी एक सामंजस्य करार केला आहे. ज्यामध्ये अर्थसंकेत राजारामबापू इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना आर्थिक साक्षरता प्रदान करेल आणि उद्योग आणि बाजारपेठेतील आवश्यकतांनुसार नवीन अभ्यासक्रमात त्यांना मार्गदर्शन करेल आणि इंटर्नशिप आणि प्लेसमेंटमध्ये मदत करेल.

राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही भारतातील एक नामांकित अभियांत्रिकी आणि एम बी ए संस्था आहे. जी शिक्षण क्षेत्रात सातत्याने उत्कृष्टतेसाठी काम करीत आहे. ही संस्था विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकासावर भर देते आणि उज्ज्वल भविष्यातील व्यावसायिक तयार करत आहे.

राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डायरेक्टर डॉ.सौ. सुषमा कुलकर्णी यांना २०१९ चे IFEES डंकन फ्रेझर ग्लोबल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. शिक्षण मंत्री मा. श्री विनोद तावडे यांच्या हस्ते महाविद्यालयाला Best Autonomous Institute with Global vision या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

अखिल भारतीय प्रशिक्षण आणि शिक्षण संस्था यांचे मार्फत संशोधन क्षेत्रात यश मिळविणारी संस्था म्हणून आर.आय.टी ला ‘व’ मानांकन आणि भारतातील या क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या २६ व्या ते ५० व्या क्रमांकाच्या संस्थामध्ये मानाचे स्थान आहे. टी स्कूल इन इंडिया २०१९ च्या क्रमवारी सर्वेक्षणानुसार आर.आय.टी भारतात ४३ क्रमांकावर आणि डाटा क्वेस्ट सर्वेक्षण २०१९ नुसार पश्चिम महाराष्ट्रात ९ व्या क्रमांकावर आहे. . एस. आर-जी. एच. आर.डी.सी च्या अभियांत्रिकी महाविद्यालय सर्वेक्षण २०२१ नुसार सर्वोत्कृष्टता निकषांवरून महाविद्यालयास राष्ट्रीय स्तरावर ११ वे मानांकन मिळाले आहे.

महाविद्यालयास नॅक ने ‘अ’ मानांकन दिले आहे तसेच महाविद्यालयातील सर्व कोर्सेस एन.बी.ए. मानांकित आहेत. तरोच महाविद्यालयास तांत्रिक शिक्षण गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत फेज १ आणि फेज २ मध्ये निधी उपलब्ध झाला आहे. महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाने २०११ मध्ये स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा दिला असून नॅशनल इन्स्ट्टियुशनल रॉकिंग फेमवर्क २०२० नुसार भारतातील सर्वोच्च २५० अभियांत्रिकी शिक्षण संस्थामध्ये स्थान मिळाले आहे तरोच पश्चिम महाराष्ट्रात २ या क्रमांकाचे अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून स्थान मिळाले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोयायटी तर्फे इन्क्युबेशन रोटरसाठी ५ कोटी रु चा निधी मंजुर झाला. स्टार्ट अप इंडिया अंतर्गत मिळालेल्या हया निधीचा वापर करुन महाविद्यालयातर्फे वर्षाला दहा ते पंधरा स्टार्टअप सुरु करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकांना व नव उद्योजकांना अर्थ सहाय्य केले जाते

अर्थसंकेत हि संस्था स्थापनेपासूनच संपूर्ण महाराष्ट्रात गुंतवणूक व उद्योजकता या विषयावर विविध कार्यक्रम करीत आहे. ‘महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड’, उद्योजकांची दिवाळी पहाट, अर्थ साक्षर पुरस्कार, स्टार्ट अप अवॉर्ड्स, डिजिटल इंडिया कार्यक्रम असे विविध ५० हुन अधिक कार्यक्रम अर्थसंकेतने आजपर्यंत केले आहेत. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे कार्यक्रम करणारी एकमेव मराठी संस्था म्हणजेच अर्थसंकेत.

अर्थसंकेतचे संस्थापक श्री अमित बागवे यांना “आर्थिक व उद्योग साक्षरता” या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून डॉक्टरेट या मानद पदवीने गौरविण्यात आले आहे. पहिला जागतिक मराठी उद्योजकता दिवस वर्ष २०१९ मध्ये सुरु करण्यात आला… या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख उद्योजकीय संस्था म्हणून ‘अर्थसंकेतचा’ सन्मान करण्यात आला आहे.

डॉ अमित बागवे यांनी गुंतवणूक, शेअर मार्केट व उद्योजकता या विषयांवर १२ पुस्तके लिहिली आहेत. तसेच अर्थसंकेतच्या सह संस्थापक सौ रचना बागवे यांनी गुंतवणूक विषयावर एक पुस्तक लिहिले आहे.

डॉ अमित बागवे यांनी हेलिकॉप्टर मध्ये उद्योजकतेवरील पुस्तक ‘लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा’ प्रकाशन करून जागतिक विक्रम त्यांनी प्रस्थापित केला आहे.

विविध वृत्तवाहिन्यांवर तसेच वर्तमानपत्रांमध्ये डॉ अमित बागवे व सौ रचना बागवे यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत

अर्थसंकेत आणि राजारामबापू संस्था एकत्रितपणे विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन अभ्यासक्रमांवर काम करणार आहेत.

सांगली येथे ‘रेडिओ शुगर’वर अर्थसंकेतचे काम आणि आर्थिक साक्षरतेचे महत्त्व याविषयी अर्थसंकेतचे संस्थापक डॉ अमित बागवे व सौ रचना बागवे यांची मुलाखत घेण्यात आली.

अर्थसंकेत संपर्क – ८०८२३४९८२२

Arthsanket RIT MOU
Arthsanket RIT MOU

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

book launch in Helicopter 2020
book launch in Helicopter 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *