भारतात मीडियामध्ये सर्वाधिक दिसणाऱ्या कॉर्पोरेट मध्ये रिलायन्सचा समावेश I Reliance Industries I

भारतात मीडियामध्ये सर्वाधिक दिसणाऱ्या कॉर्पोरेट मध्ये रिलायन्सचा समावेश

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, हि महसूल, नफा आणि बाजार मूल्यानुसार भारतातील सर्वात मोठी कॉर्पोरेट कंपनी असून २०२१ विझीके न्यूज स्कोअर रँकिंगमध्ये भारतातील मीडियामध्ये सर्वात जास्त दिसणारी कॉर्पोरेट कंपनी ठरली आहे.

विझिके च्या न्यूज स्कोअर अहवालानुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर भारती एअरटेल, इन्फोसिस आणि टाटा मोटर्स आहेत.

विझिके न्युज स्कोर हा उद्योग क्षेत्राचा पहिला एकात्मिक मेट्रिक आहे जो बातम्यांच्या दृश्यमानतेचे मोजमाप करतो. बातम्यांच्या व्हॉल्यूम, मथळ्यांवरून स्कोअर ठरवला जातो..

जागतिक स्तरावर, फेसबुक निर्देशांकात प्रथम क्रमांकावर आहे, त्यानंतर गूगल च्या मालकीची अल्फाबेट, ऍमेझॉन तिसऱ्या क्रमांकावर असून त्यानंतर ऍपल,सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, नेटफ्लिक्स आणि मायक्रोसॉफ्ट यांचा क्रमांक लागतो.

जागतिक क्रमवारीत रिलायन्स ८व्या क्रमांकावर आहे.

भारताच्या यादीतील इतरांमध्ये एचडीएफसी क्रमांक ६, त्यानंतर एचडीएफसी बँक, टीसीएस, मारुती सुझुकी इंडिया, व्होडाफोन आयडिया आणि आयसीआयसीआय बँक यांचा समावेश आहे.

एनटीपीसी ही या यादीतील सर्वोच्च क्रमांकाची सरकारी कंपनी आहे, ती १३व्या क्रमांकावर आहे.

रिलायन्सला ही मान्यता Exchange4Media समूहाने अब्जाधीश मुकेश अंबानींच्या कंपनीला भारतातील सर्वोत्कृष्ट इन-हाऊस कम्युनिकेशन्स प्रोफेशनल्स २०२१ असलेल्या ब्रँडपैकी एक म्हणून मान्यता दिल्याने मिळाली आहे. एखाद्या कंपनीसाठी त्यांची मीडिया व्हिझिबिलिटी ठरवताना उत्कृष्ट कॉर्पोरेट कम्युनिकेशन टीम ची आवश्यकता असते. या वर्षीच्या अहवालावर भाष्य करताना, विझिकी चे सह-संस्थापक आणि CEO अंशुल सुशील म्हणाले, “ब्रँड्सना त्यांच्या दृश्यमानतेच्या बाबतीत ते कुठे उभे आहेत हे समजण्यास मदत करणे ही यामागची प्रमुख कल्पना आहे”.

reliance ind
reliance ind

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

forbes 2021
forbes 2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *