मुंबई महापौर सौ किशोरीताई पेडणेकर यांच्या अर्थसंकेत प्रस्तुत अर्थसाक्षर पुरस्कार २०२१ संपन्न I Arthsanket presents ArthSakshar Purskar 2021 at the hands of Mumbai Mayor Mrs. Kishoritai Pednekar I

मुंबई महापौर सौ किशोरीताई पेडणेकर यांच्या अर्थसंकेत प्रस्तुत अर्थसाक्षर पुरस्कार २०२१ संपन्न

अर्थसंकेत प्रस्तुत अर्थसाक्षर पुरस्कार २०२१ मुंबईच्या महापौर सौ किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे संपन्न झाला.
अर्थसाक्षर पुरस्कार हा एकमेव पुरस्कार आहे ज्या अंतर्गत गुंतवणूकदारांचा सन्मान केला जातो. तसेच आर्थिक साक्षरता प्रचारकांचा, व्यवसाय प्रशिक्षकांचा व मराठी युवा उद्योजकांचा सन्मान केला जातो. अर्थसंकेत मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र आहे. अर्थसंकेतचा ५० लाख हुन अधिक लोकांपर्यंत प्रचार आणि प्रसार आहे. अर्थसंकेत मराठी माणसांमध्ये आर्थिक व उद्योजकीय साक्षरता पसरविण्याचे कार्य गेली ९ वर्षे करीत आहे.

श्री संतोष सकपाळ यांना ‘सर्वोत्कृष्ट व्यवसाय प्रशिक्षक’, सौ मृदुला म्हात्रे जोशी यांना ‘सर्वोत्कृष्ट इंटेरिअर डिझायनर’, श्री तुषार केळकर यांच्या चिजी क्रेझी कॅफेला ‘बेस्ट कॅफे चेन’, संमोहनतज्ज्ञ श्री दीपक पाटील याना ‘सर्वोत्कृष्ट युवा उद्योजक’, श्री अंबादास सांगोळी यांच्या ड्रीम इलेक्ट्रोला ‘बेस्ट स्टार्टअप’, श्री सहदेव लोणारी यांना ‘सर्वोत्कृष्ट विमा सल्लागार’, श्री राहुल जाधव यांना ‘सर्वोत्कृष्ट जनरल इन्शुरन्स सल्लागार’, श्री प्रतीक ढोले व सौ गौरवी ढोले यांच्या सिल्व्हरहॅश डिजिटल मार्केटिंग कंपनीला ‘सर्वोत्कृष्ट डिजिटल मार्केटिंग कंपनी’, लोकरे इम्पेक्सचे श्री पराग लोकरे यांना ‘सर्वोत्कृष्ट युवा उद्योजक’, श्री मोहनीश चौधरी यांना ‘बेस्ट स्टार्टअप’ व श्री जितेंदर शर्मा यांना ‘सर्वोत्कृष्ट लघु उद्योग’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सौ किशोरीताई पेडणेकर यांनी कोरोनाच्या कठीण काळातही उद्योग व्यवसाय करणाऱ्या सर्वाना प्रगतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले व त्यांनी असेच मोठे कार्य करीत राहावे असे म्हटले. अर्थसंकेतचे संस्थापक डॉ अमित बागवे यांनी अर्थसंकेतच्या कार्याची आणि पुरस्कार सोहळ्याची माहिती दिली तसेच पुरस्कार विजेत्यांची ओळख करून दिली.

Kishoritai Pednekar
Kishoritai Pednekar

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *