पिडिलाइट इंडस्ट्रीजला रु. ३५९/- करोड नफा I Pidilite profit Rs. 359/- Crore I

पिडिलाइट इंडस्ट्रीजला रु. ३५९/- करोड नफा

अधेसिव्ह , कन्स्ट्रक्शन केमिकल निर्माण करणारी कंपनी पीडिलाइट इंडस्ट्रीज ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात १९.५ % ची घट झाली असून हि रक्कम रु. ३५९.२४/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ४४६.४३/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात २४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २८५०.७२/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २२९९.०२/- करोड होती. कंपनीला महसुलात वाढ झाली असून इनपुट कॉस्ट मध्ये वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. या तिमाहीत एकूण खर्च रु. २३७२.९०/- करोड असून त्यात ३७.९८% ची वाढ झाली आहे. मागणीत वाढ होऊन पुढील काही महिन्यांत नफ्यात वाढ होण्याची शक्यता कंपनीने सांगितले.

pidilite JAN 2022
pidilite JAN 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Pratik and Gauravi Dhole 2
Pratik and Gauravi Dhole 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *