डॉ चेतन कुलकर्णी यांचा ‘Best Business & Motivational Coach’ पुरस्काराने सन्मान !

डॉ चेतन कुलकर्णी यांचा ‘Best Business & Motivational Coach’ पुरस्काराने सन्मान !

अर्थसंकेत प्रस्तुत अर्थ साक्षर पुरस्कार २०२० सोहळा बुधवार २३ डिसेंबर २०२० रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे संपन्न झाला. कार्यक्रमात डॉ चेतन कुलकर्णी यांचा ‘Best Business & Motivational Coach’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. बी एस ई इन्व्हेस्टमेंटचे व्यवस्थापकीय संचालक श्री शंकर जाधव, अर्थसंकेतचे डॉ अमित बागवे व सौ रचना बागवे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मोटिव्हेशन व विक्री तंत्र या विषयावर डॉ चेतन कुलकर्णी यांनी १०० हुन अधिक प्रशिक्षण वर्ग घेतले आहेत. इन्शुरन्स क्षेत्रात गेली १० वर्षे ते कार्यरत आहेत. नातेसंबंध मार्गदर्शक म्हणून सुद्धा ते कार्यरत आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ‘कौटुंबिक उद्योग समिती’ वर ते मानद सल्लागार आहेत.

माजी पंतप्रधान डॉ मनोमोहन सिंग यांच्या हस्ते ‘इंदिरा गांधी प्रियदर्शिनी पुरस्कार’, माजी पंतप्रधान इंद्रजित गुजराल यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय उद्योग रत्न पुरस्कार’, आंध्र प्रदेशाच्या गृह मंत्र्यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय रतन पुरस्कार’, माजी केंद्रीय मंत्री श्री रमेश बाईस यांच्या हस्ते ‘मिलेनिअल पुरस्कार’, इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड रिसर्च कॉर्पोरेशन तर्फे ‘भारतीय उद्योग रत्न पुरस्कार’, इंटरनॅशनल इंटिग्रेशन अँड ग्रोथ सोसायटी तर्फे ‘उद्योग प्रतिभा पुरस्कार’, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक आंत्रप्रिनियरशिप कॉन्सिल तर्फे ‘रतन ज्योती पुरस्कार’ अशा विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

डॉ चेतन कुलकर्णी यांचा संपर्क -९२२४७८७८८०

Dr Chetan Kulkarni
Dr Chetan Kulkarni

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *