गोदरेज अँड बॉयसतर्फे भारतातील पहिले सेफ्टी अ‍ॅप ‘आय- रिपोर्ट’ भारतातील मटेरियल हँडलिंग क्षेत्रासाठी लाँच I

गोदरेज अँड बॉयसतर्फे भारतातील पहिले सेफ्टी अ‍ॅप ‘आय- रिपोर्ट’ भारतातील मटेरियल हँडलिंग क्षेत्रासाठी लाँच

~ हे अ‍ॅप २००+ ठिकाणी १००० पेक्षा जास्त प्रशिक्षित ऑपरेटर्सनी सुसज्ज

~ गोदरेज रेनट्रस्ट ही भारतातील सर्वात मोठी रेंटल इक्विपमेंट पुरवठादार कंपनी शॉप फ्लोअर आणि वेयरहाउसेसमधे सुरक्षेचा प्रसार करण्यासाठी लक्षणीय गुंतवणूक करणार                               

मुंबई, १ मे २०२३ – गोदरेज अँड बॉयस या गोदरेज समूहाच्या फ्लॅगशीप कंपनीने गोदरेज रेनट्रस्ट हा आपला व्यवसाय, भारतातील सर्वात मोठी वेयरहाउस रेंटल इक्विपमेंट कंपनीने नाविन्यपूर्ण सुरक्षा उत्पादन – आय- रिपोर्ट अ‍ॅप लाँच केले असून त्याच्या मदतीने भारतातील मालाच्या हाताळणी कामकाजातील सुरक्षा उंचावली जाणार आहे. मालाच्या हाताळणीशी संबंधित कामकाजासाठी लाँच करण्यात आलेले हे भारतातील पहिले सुरक्षा अ‍ॅप्लिकेशन आहे. हे अ‍ॅप या क्षेत्रातील सुरक्षा धोरणांमधे असलेल्या त्रुटी भरून काढण्यासाठी रिमोट व रियल टाइममध्ये घटनेची माहिती देणं, ऑडिट, प्रशिक्षण, ग्राहक व व्यावसायिक भागिदारांशी सल्लामसलत अशा प्रकारच्या सुविधांचा वापर करणार आहे. हे सुरक्षा अ‍ॅप २२ राज्यांतील २०० ठिकाणी उपलब्ध असेल आणि पूर्ण ७ दिवस, २४ तास १००० पेक्षा जास्त प्रशिक्षित ऑपरेटर्सद्वारे हाताळले जाईल.

गोदरेज मटेरियल हँडलिंग विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख श्री. अनिल लिंगायत म्हणाले, ‘कोणत्याही यशस्वी व्यवसायाचा पाया ग्राहकाभिमुखता आणि सुरक्षा व्यवस्थेत दडलेला असतो. शॉप फ्लोअरवर घडणाऱ्या आणि नोंदवल्या न जाणाऱ्या घटना या क्षेत्रासाठी काळजीचा विषय आहेत. हे चित्र आता बदलणार आहे, कारण सर्व भागधारकांना स्वतःहून धोके ओळखून काढून टाकता येतील. गोदरेज रेनट्रस्ट हे नाविन्यपूर्ण अ‍ॅप्लिकेशन भारतातील मालाच्या हाताळणी क्षेत्रात सुरक्षा उपक्रमांचा नवा मापदंड तयार करण्यासाठी आणि सर्व उत्पादन सुविधा तसेच वेयरहाउसच्या परिसरात तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी सज्ज आहे.’

Anil Verma Godrej
Anil Verma Godrej

गोदरेज रेनट्रस्टने गेल्या तीन वर्षांत नाविन्य, डिजीटायझेशन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीचा मोठा भाग वेयरहाउसेस आणि उत्पादन केंद्रांच्या सुरक्षिततेसाठी वापरण्यात आला आहे. भारतातील वेयरहाऊस बाजारपेठ तेजीत आहे. विशेषतः गेल्या काही वर्षांत सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या सुसज्ज व आधुनिक वेयरहाउसेसची मागणी वाढली असून जास्त उत्पादनक्षम कर्मचारी वर्गासाठी ते आवश्यक झाले आहे. वेयरहाउसमधील कामकाजात होणाऱ्या दुखापती कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्यासाठी धोकादायक आहेत व त्यामुळे कामाच्या प्रवाहात अडथळे येतात तसेच लक्षणीय खर्चही होतो.

सध्या भारतीय वेयरहाउस क्षेत्रात नोंदी ठेवणारी कोणत्याही प्रकारची डिजिटल यंत्रणा किंवा सुरक्षेचे नियम अस्तित्वात नसून त्यामुळे प्रतिबंध करणे शक्य असलेले अपघातही घडताना दिसतात. आय- रिपोर्ट सेफ्टी अ‍ॅप ही दरी भरून काढण्यातील महत्त्वाची पायरी असून त्यामुळे धोके ओळखणे आणि शॉप फ्लोअर तसेच वेयरहाउसमध होणारे अपघात कमी करण्यासाठी सुरक्षा उपाययोजनांची तरतूद करणे शक्य होणार आहे.

हे अत्याधुनिक अ‍ॅप १२ एप्रिल २०२३ रोजी गोदरेज अँड बॉयसमध्ये ३३ वा सेफ्टी फाउंडेशन डे साजरा करताना लाँच करण्यात आले.

या अ‍ॅपच्या मदतीने सर्व ठिकाणी कर्मचारी आणि ग्राहक प्रतिनिधी सहजपणे सुरक्षेला असलेल्या धोक्यांची माहिती नोंदवू शकतील, तर तीन सुरक्षा सुपरव्हायजर्स अ‍ॅपची देखरेख करतील. संबंधित धोका टळल्याची तसेच भविष्यात परत तशाप्रकारचा धोका उद्भवणार नसल्याची खात्री गोदरेज अँड बॉयसच्या अधिकाऱ्यांकडून केली जाईल व त्यानंतरच नोंदवलेली तक्रार बंद केली जाईल.

आय- रिपोर्ट हे अ‍ॅप विकसित करून कंपनीने या वेगाने विकसित होत असलेल्या ग्राहकाभिमुख क्षेत्राची सुरक्षा व ग्राहकाभिमुखता जपण्यासाठी असलेली बांधिलकी जपली आहे.

Godrej
Godrej

About Godrej & Boyce

Godrej & Boyce (‘G&B’), a Godrej Group Company, was founded in 1897 and has contributed to India’s journey of self-reliance through manufacturing. G&B patented the world’s first springless lock and since then, has diversified into 14 businesses across various sectors from Security, Furniture, and Aerospace to Infrastructure and Defence. Godrej is one of India’s most trusted brands serving over 1.1bn customers worldwide daily

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *