ऍक्सिस बँकला रु. ४११८/- कोटी नफा I Axis Bank profit of Rs. 4118/- Crore I
ऍक्सिस बँकला रु. ४११८/- कोटी नफा
ऍक्सिस बँकला चौथ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात वाढ
खाजगी क्षेत्रातील एक्सिस बँकेने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ५४% ची वाढ झाली आहे. बँकेने तरतुदीत घट व कर्ज वितरणात वाढ केली आहे. या तिमाहीत निव्वळ नफा रु. ४११८/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २६७७/- कोटी होती. निव्वळ व्याज उत्पन्न १७% ने वाढले असून हि रक्कम रु. ८८१५/- कोटी आहे. इतर उत्पन्न १९% ने वाढले असून रु. ४२२३/- कोटी आहे. निव्वळ व्याज मार्जिन ३.४९% आहे. मालमत्ता गुणवत्तेत बँकेने सुधारणा केली असून एकूण अनुत्पादित कर्ज प्रमाण २.८२% आहे. तरतुदीत ५४% ची घट झाली असून हि रक्कम रु. ९८७.२/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo